छोटेखानी विवाह झालेच पाहिजेत.लवकरच बदलाव झाले तर बरे !नाहीतर आपले काही नाही खरे..*
(असा कायदाच व्हावा ही काळाची गरज)
*आपणही उच्चभ्रू् समाजाचा आदर्श घेऊ या..*
कोरोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रम, अंत्यविधीला मर्यादा घातल्या, ही बाब आता लक्षात घेता आली पाहिजे.
1) शेतीचे उत्पन्न कमी होत आहे.
2) शेती मालाला भाव नाही.
3) नोकऱ्या सरकारी राहिल्या नाहीत.
4)खाजगी नोकरीत शाश्वती नाही.
5) मुलीच्या लग्नाला 100 रु खर्च येत असेल तर मुलालाही 80 रु खर्च येतो.
6) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या. आता तरी डोळे उघडले पाहिजेत.
7) विवाह हा सोहळा नाही तर तो संस्कार आहे. 16 संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे.
कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात. 9) आपण शेती विकून गुंठ्यावर आलो, तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकाने करत आहे.
10 ) इर्षा सोडा.
11) भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. लग्नात तर नकोच नको.
12 ) वर-वधु यांनी उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे.
13) वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत. आपल्यालाही मुलगी आहे, सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे. ही भावना रुजली पाहिजे.
14) जेवणावळी, मानपान वरील खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा.
15) हळद , वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी. स्वागत समारंभात साधेपणा आणावा.
16) अरे क्रिकेट 5 दिवसाचा, वन-डे वरुन 20-20 वर आला. तर आपण विवाह वन डे सगळं करायला काय हरकत.
17) मोजक्या लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो.
18) आजची बचत उद्याची निर्मिती.
19) *कोरोनाची मंदी, ही आपल्यात सुधारण्यासाठी संधी* 20)या साठी कायदा होणे गरजेचे आहे.ही क्रांती निश्चित होणे गरजेचे आहे.21)लग्नाला होणारा खर्च मुला मुलींच्या संसारा साठी फिक्स डिपाॅजिट करणे. 22)लग्ना साठी कर्ज काढणारा शेवट पर्यंत कर्जात जीवन जगतो. हळदिसाठी होणारा खाण्यापिण्याची सोय करणारा पाच वर्ष डोकवर काढत नाही. खाणारे खाऊन ऐश करुन जातात.23)कृपया-कृपया या बदलासाठी कायदा आपणच समाजात करायला लावा.

*एक पाऊल समाज सुधारण्यासाठी टाकू या.सोळा-अठरा वर्षापासून पिणारी तरुण पिढी वाह्यात चालली आहे.*
No comments:
Post a Comment