Thursday, June 30, 2022

देवतीर्थ

मंदिरातील गाभाऱ्यात असणाऱ्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी, दुध, मध, दही, वेलचीपूड, कापूर, केसर, लवंग तेल, तूप, साखर, तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो, तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो.


हे मिश्रण "तीर्थ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते. ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते, केसर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कपूर श्वास दुगंधी नाहीशी करतो.

चुंबकीय शक्तीने भरलेले हे “तीर्थ” रक्तशुद्धी करते. हे प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. म्हणूनच हे “तीर्थ“ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. ह्या मुळेच आपण दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी, ज्यायोगे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत होत असे.

ह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा भक्तांना वाटते की, मंदिरातील पुजारी आपल्या (अध्यात्मिक) ताकतीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील, पण असे होत नाही. जेव्हा मंदिरात “दीपाराधना“ केली जाते, किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभाऱ्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात, तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात. मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात.

-
---------------------------------------------
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
---------------------------------------------

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...