Sunday, June 26, 2022

*चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय*


1. आलं पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे आल्याचा आहारात वापर करावा. आलं इतरही समस्यांसाठी उपयुक्त असल्याने त्याचा अपाय होत नाही. मात्र पदार्थामध्ये आलं घालण्याबरोबरच आलं आणि तुळस घातलेला चहा आरोग्याला जास्त चांगला असतो.
2. जवळपास सर्व भारतीय स्वयंपाकघरात मूगडाळ असते. या डाळीमध्ये ए,बी,सी आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. याशिवाय कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशिअम यासारखी खनिजेही मूग डाळीतून मिळतात. याशिवाय मूग डाळीत प्रथिने आणि फायबरचे प्रमाणही जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मूग डाळीने लवकर पोट भरते त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. याचा वजन आणि विशेषतः पोट कमी होण्यास उपयोग होतो
3. जेवणानंतर जीरं, ओवा आणि बडिशेप यांची पूड खावी. त्यामुळे अन्नपचन चांगले होऊन वजन कमी करण्यास मदत होते. हे मिश्रण कोमट पाण्यातून घेतल्यास त्याचा जास्त चांगला फायदा होत
Cp

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...