Sunday, June 26, 2022

*कावळा आणि रामायणाचा संबंध*

*इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते. त्रेता युगात या जयंताने सीतेला चोच मारल्याने श्रीराम जयंतावर नाराज झाले होते.रामाने जयंताला बाण मारून त्याचा डोळा फोडला होता. मात्र या कृत्यानंतर जयंत प्रभू रामाला शरण गेला होता. त्यावेळी रामाने त्याला जीवात्मा दिसण्याच्या दृष्टीचे वरदान दिले. तसेच तुला अर्पण केलेले भोजन पितरांना लाभेल असेही सांगितले.त्यामुळेच आजही कावळ्याचा पिंडाला स्पर्श महत्वाचा मानला जातो.*


 *✍️कावळयाचा जन्म वैवस्वत कुळात झाला आहे व सध्या वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. जोपर्यंत हे मन्वन्तर आहे तोपर्यंत कावळा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून पिंडाला कावळ्याचा स्पर्श झाला म्हणजे आत्म्याला मोक्ष मिळेल,अशी हिंदु धर्मातील लोकांची मान्यता आहे.कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पाप नष्ट होते व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रास होत नाही, असे आपल्याकडे मानले गेले आहे.*

पितरांना मोक्ष मिळण्यासाठी पितृपक्षात त्यांच्या आवडीचे जेवण बनवून कावळ्यांना दाखवण्यात येते. कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्यास पितरांना मोक्ष मिळतो अशी धारणा आहे.पितृपक्षच्या कालावधीत आपले पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी भूतलावर येतात, यावेळी त्यांचे आवडीचे पदार्थ बनवून त्यांना नैवैद्य दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी पूर्वजांचे प्रतीक म्ह्णून प्राण्यांना भोजन दिले जाते, यामध्ये कावळ्याचा मान तर अधिक महत्वाचा असतो.*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...