आपण बडीशोप खातो. गरोदरपणानंतर सुद्धा स्त्री बडीशोप खात असते. आणि डिलिव्हरी झाल्यावर ओवा मिश्रित बडीशोप खाते. तेव्हा बडीशोप नेमके का खात असतो. त्याविषयी काही गुजगोष्टी.
तुम्हाला श्वसनाशी निगडीत त्रास होत असेल तर जेवणानंतर रोज बडीशेप खाल्लेली चांगली. शरीरातील अनावश्यक जीवाणू आणि विषाणूंचा नाश होण्यासाठी बडीशेप उत्तम काम करते.
तुम्हाला सारखी लघवी लागत असेल तर तिच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. याबरोबरच शरीरातील अनावश्यक विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे लघवीशी संबंधित तक्रारी दूर होतात.
शरीर शुद्धीबरोबरच बडीशेपमुळे रक्त शुद्धीकरणाचेही काम होते.
दररोज बडीशेप खाल्ल्यास त्याचा आरोग्याला अतिशय चांगला फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर होण्यास मदत होते. शरीरातील हॉर्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे बडीशेपमधील घटक परिणामकारक असतात.
बडीशेप खाल्ल्याने हृदयाशी निगडीत आजार दूर होण्यास मदत होते. बडीशेपमधील पोटॅशियममुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो.
No comments:
Post a Comment