Monday, May 23, 2022

डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड माहिती

डेबिट कार्डच्या मागे असलेला तीन अंकी 'सीवीवी' (CVV) नंबर महत्वाचा का आहे ? तो कार्डच्या मागे का लिहिलेला असतो ?


१) डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वेगवेगळे असते. दोघांचा उपयोग एकाच पद्धतीचा असला तरी कार्य निरनिराळे असते.

२) डेबिट कार्डाचा सांकेतिक क्रमांक (ATM PIN) आणि वरती नमूद केलेला CVV Code ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकमेकांना पर्याय (Substitute) म्हणून नसतात.

३) डेबिट कार्डाच्या पुढे असलेला सोळा अंकी नंबर हा वेगळा आणि पाठीमागचा सही करायच्या जागेच्या बाजूला असलेला तीन अंकी CVV Code हा वेगळा असतो.

४) डेबिट कार्डाचा सोळा अंकी क्रमांक हा जास्त ठळक आणि उठावदार (Embossed) असतो तर CVV Code हा फक्त छापील (Printed) असतो. दोघांवर हात फिरवून फरक लक्षात येतो.

आता तुमच्या प्रश्नाबद्दल बोलू.

डेबिट कार्डला दोन बाजू असतात. असे धरून चालूया की तुमचे डेबिट कार्ड हे एका व्यक्तीच्या नजरेस पडले. त्या व्यक्तीने तुमच्या कार्डवरील सोळा अंकी नंबर टिपून घेतला. तसेच त्याखाली असलेली मुदतीची तारीख (Expiry Date) हीसुद्धा टिपून घेतली. आता जर त्या व्यक्तीला तुमचे नाव माहिती असेल किंवा त्या व्यक्तीने तेही कार्ड वरून टिपून घेतले असेल (हो, नावही कार्डवर छापलेले असू शकते. आपण आपल्या बँकेला आपले नाव असलेले डेबिट कार्ड देण्याची विनंती करू शकतो) तर अशा परिस्तिथीत ही व्यक्ती तुमच्या बँक खात्यामधून परस्पर व्यवहार करू शकते. तुमच्या नकळत तुमच्या खात्यामधून पैसे काढू शकते. तुम्ही जर कधी ऑनलाईन व्यवहार केला असाल तर तिथेही कार्ड वरून पैसे देताना कार्डचे तपशील द्यावे लागतात हे आपणांस माहिती असेल. अशा वेळी कार्डधारकाचा त्यावर ताबा राहावा म्हणून CVV Code ही सोय असते.

परंतु हा क्रमांक करतो तरी काय?

जेव्हा कार्ड वापरून एखादा व्यवहार केला जातो तेव्हा हा क्रमांक त्या कार्ड धारकाचे अस्तित्व पटवून देण्याचे काम करतो. असं बघा, एखाद्या ऑनलाईन बॉटद्वारे तुमच्या खात्यात गैरव्यवहार करायचा प्रयत्न झाला तरी तो पूर्ण होऊ शकणार नाही कारण हा CVV Code विचारला जाईल. तो दिल्याशिवाय बँक तुमच्या खात्यातून पैसे वजा करूच शकत नाही. त्या बॉटला त्या ठिकाणीच थांबवले जाईल.
हा क्रमांक म्हणजे वापरकर्त्याची ओळख असते. जेव्हा हा क्रमांक दिला जातो तेव्हा समोरील Online Merchant ची खात्री होते की तुम्ही मानव आहात आणि कोणतीही System किंवा Robot/Bot किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नाही.

CVV Code किती अंकी असतो?

हा क्रमांक (CVV Code) किमान तीन अंकी असतो. तुमचे कार्ड कोणत्या कंपनीचे आहे त्यावर हा क्रमांक किती अंकी असू शकतो हे ठरलेले आहे. उदा. व्हिसा, मास्टर कार्ड, डिस्कव्हर ह्या कंपनीच्या कार्डांचे क्रमांक हे तीन अंकी असतात तर अमेरिकन एक्सप्रेस कंपनीचे चार अंकी असतात. आपलं कार्ड कोणत्या कंपनीचे आहे ते आपण कार्डवर पुढील बाजूला असलेले चित्र पाहून ओळखू शकतो.

CVV Code किती असू शकतील?

प्रत्येक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा नंबर हा सोळा अंकी असतो आणि CVV Code हा किमान तीन अंकी असतो. कधीही सारखेच नंबर असलेली डेबिट व क्रेडिट कार्ड ही अजिबात असू शकत नाहीत, तशी काळजी कार्ड तयार करताना घेतलेली असते. विचार करा सोळा आकडे असे फिरवायचे ज्यातून प्रत्येक वेळी नवीन क्रमांक तयार होईल. अशा किती शक्यता तयार होतील ज्यात सोळाच्या सोळा आकडे समसमान येतील? (Permutation Combination केलं तरी)
परंतु CVV Code हा तर किमान तीन अंकी असतो. मग त्यात तर जास्तीत जास्त म्हणजे ९९९ क्रमांक होतील. म्हणजे कालांतराने दोन सारख्याच CVV Code ची कार्ड दिली जाणार. हे कसे टाळायचे? तर ह्यावर उत्तर म्हणजे CVV Code ही कार्ड धारकाची अस्तित्व पटवून देण्याची खूण असते. तो काही एकमेव क्रमांक नसतो आणि सोळा आकडी कार्ड क्रमांक, मुदतीची तारीख, नाव आणि CVV Code हे सगळे एकत्र ठेवले तर अशी कोणतीही दोन कार्ड तुम्हाला सापडणार नाहीत ज्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी सारख्याच असतील.

CVV Code चं पूर्ण नाव काय किंवा त्याला अजून काही म्हणतात का?

CVV Code: Card Verification Value Code
CVC: Card Verification Code
CVD: Card Verification Data
CSC: Card Security Code

CVV Code हा चोरी होऊ शकतो का?

ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवहार करायचा आहे परंतु कार्डची माहिती ही हाताने भरायची आहे, कार्ड यंत्रावर घासून नाही अशा ठिकाणी हा क्रमांक कायम लागतो. विविध यंत्रणा ह्याची खात्री देतात की तुमच्या कार्डची माहिती आम्ही पुढच्यावेळी तुमच्या सोयीसाठी जपून ठेवतो परंतु हा क्रमांक आम्ही कधीही लक्षात ठेवत नाही (Save Card details for future use). आता ह्यात कितपत तथ्य आहे ते माहिती नाही परंतु आता तर कार्डनेसुद्धा एखादा व्यवहार करताना एकल वापरासाठी परवलीशब्द (OTP) येतो त्यामुळे ही पद्धत विश्वासार्ह म्हणावी लागेल.

सूचना: आपल्यास कोणीही आपल्या कार्डबद्दल कोणतीही माहिती विचारली तर त्यास बँकेच्या संबंधित ब्रँच मध्ये येऊन भेटण्यास कळवावे मग तो मनुष्य बँकेचा असो वा नसो.
(काय आहे नेहमी तेच तेच सांगितलं जातं की आपली कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका तरी फसणारे निघतात म्हणून जरा वेगळ्या शब्दात सांगितलं.)

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...