Monday, May 23, 2022

व्यवहारात वापरले जाणारे काही सामान्य ज्ञान कोणते ?

१) घरात कोणाशी बोलताना उच्च स्वरात बोलू नये,

२) स्वयंपाक करताना अथवा जेवणं करताना मन प्रसंन्न असावे,

३) घरातील वस्तु संपण्या अगोदर दोन दिवस आणून घ्यावी,

४) घरातील वस्तु , कपडे भांडी वेळचेवेळी जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवावी,,

५) कोणाची उधारी बुडवू नये, रोजच्या रोज हिशोब लिहिण्याची सवय असावी,

६) दोन व्यक्ती बोलत असताना मध्ये च बोलू नये , समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांत ऐकून मग आपले म्हणणे मांडावे,

७) घरी येणाऱ्या लोकांशी हसून बोलावे आदरतिथ्य करावे, तिन्हीसांजेला घरात धूप दीप लावून वातावरण प्रसंन्न करावे,

८) एखाद्या व्यक्तीची स्तुती सर्वासमोर करावी पण दोष एकांतात सांगावे, .

९) लोकांच्या वापरायला घेतलेल्या वस्तु लगेच न विसरता परत कराव्यात विसरलो म्हणून कारणे देऊ नये,

१०) एखाद्या व्यक्तीला फोन फक्त दोनदा करा पुन्हा करू नका त्याच्या फोन ची वाट पहा , त्याला जाब विचारू नये,

११) कुणाला मुद्दाम त्याच्या त्रुटी विषयी विचारू नये, स्वतःच्या श्रीमंती च प्रदर्शन करू नये,

१२) स्वतःची स्तुती स्वतः करू नये, बढाया मारू नये, दुसऱ्याला अपमानास्पद बोलू नये,

१३) आई वडील यांचा आदर व घरातील महिलांचा सन्मान करावा, आपल्याच मुलांच्या समोर स्वतःची वागण्याची पद्धत चुकीची होऊ नये याची काळजी घ्यावी,

१४) आपले वय मर्यादा कर्तव्य यावर लक्ष देऊन रहाणीमान व बोलणे असावे उगाच स्वतःची किमंत करू नये,

१५) नेहमी च दुसऱ्याला काही मागू नये, दुसऱ्याचे च खाऊ नये , आपण ही तितकाच खर्च करावा जो समोरच्या व्यक्तीनी आपल्या साठी केला आहे,

१६) प्रवासाला जाताना कोणाला अनोळखी व्यक्ती समोर घरच्यां गोष्टी , व्यवहार, पत्ता , मोबाईल नंबर , घरातील कौतुक सांगू नये,

१७) मुलांशी मित्रत्वता असावी पण फाजील पणा नकॊ आपण आई अथवा बाप आहोत याचे भान ठेऊनच ,

१८) घरातील वाद मतभेद चार भिंती च्या आत, एखादी गोष्ट पटली नाही आवडली नाही तर त्या साठी आकडतांडब न करता समजून सांगावी, .

१९) स्वतःचा मूळ स्वभाव दर्शन कधीतरी एकदा उपयोगात आणावे जेणे करुन आजूबाजूच्या व्यक्ती आपला गैर फायदा घेणार नाही, टींगल टवाळी करणार नाहीत,

२०) मुलांना संस्कार आपल्या वागण्यातून मिळतात तेव्हा घरातील जेष्ठ व्यक्तीनी स्वतःचा व्यवहार , बोलणे पारदर्शक ठेवावे.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...