आज दिनांक १ जानेवारी २०२२. एक जानेवारी या तारखेस विशेष महत्त्व आहे. २०२२ सालातील हा प्रारंभ दिवस असल्यामुळे नववर्ष दिन म्हणून तो साजरा केला जातो. Happy New Year's Day आशाही शुभेच्छा विविध धर्मीयांकडून दिल्या जातात. ( गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तानिमित्त मात्र नव वर्षाच्या शुभेच्छा देण्यास हिंदू धर्मीय विसरतात हा भाग वैगळा ). ख्रिश्चन धर्मियांच्या नाताळ या पवित्र सणाची सांगता आज होत असून त्यांचा आज नववर्ष दिन ही आहे. १ जानेवारीला ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. ब्रिटिशांनी " कुलाबा " जिल्ह्याची निर्मिती १ जानेवारी १८६९ रोजी केल्यामुळे " कुलाबा " जिल्हा निर्मितीचा आज १५३ वा वर्धापन दिन आहे. रायगड जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॕ. ए. आर्. अंतुले यांच्या आदेशानुसार दि.१ जानेवारी १९८१ रोजी कुलाबा जिल्ह्याचे नामांतर " रायगड जिल्हा " झाले. त्या नामांतराचाआज ४१ वा वर्धापन दिन आहे.
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Wednesday, May 25, 2022
रायगड जिल्हा नामांतराचा वर्धापन दिन
भारतावर ब्रिटिश सत्ता असताना राज्य विस्तारासाठी "कुलाबा" संस्थानकडे त्यांचे विशेष लक्ष होते. ते संस्थान काबीज करण्याच्या हालचाली सुरू असताना दुसरा कान्होजी राजे यांचे निधन झाले ते निपुत्रिक असल्यामुळे. कुलाबकरांच्या गादीला वारसच राहिला नाही. या संधी चा फायदा घेऊन हे संस्थान ब्रिटिशांनी १८३९ साली खालसा केले , व सुव्यवस्थेसाठी तेथे पोलिटिकल सुपरिंटेंडेंची नियुक्ती केली. नंतर १८४४ साली त्यात बदल करुन पौलिटिकल एजंटकडे कारभाराची सूत्रे दिली. आणि प्रशासकीय सोईसाठी १८५३ साली या संस्थानला उपजिल्ह्याचा दर्जा दिला. व १८६६ साली उपविभाग अलिबाग , उपविभागाग पेण, उपविभाग रोहा , उपविभाग माणगाव आणि उपविभाग महाड हे उपविभाग असुनही हा उपजिल्हा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली होता. शेवटी प्रशासकीय सोईसाठी *दि.१ जानेवारी १८६९* रोजी "कुलाबा" जिल्ह्याची निर्मिती ब्रिटिशांना करावी लागली. व *आल्फ्रेड कैसर* पहिले जिल्हाधिकारी बनले.
*अलिबाग येथे जिल्हा मुख्यालय*
१८६९ साली नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर नूतन जिल्ह्यास कोणते नाव द्यावे याबाबत खलबते सुरू झाली. नूतन जिल्ह्यात पश्चिम किनार पट्टीचे अधिराजे सरखेल कान्होजींची राजधानी असलेला "कुलाबा" किल्ला असल्यामुळे या जिल्ह्यास ब्रिटिशांनी *"कुलाबा जिल्हा"* असे नाव दिले. सदर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे थाटावे याबाबतही विचार विनिमय झाला. सरखेल कान्होजी राजांची राजधानी अलिबाग जवळ होती. हे ठिकाण सागर किनारी आहे. जागतिक शहर असलेल्या मुंबई शहरानजिक असून सागर मार्गे हे अंतर ४० ते ४५ किलोमीटर आहे. ब्रिटिशांना सागर किनाऱ्याची आवड असल्यामुळे अलिबाग हे जिल्हा मुख्यालय ठरविले गेले.
या जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा पोलिस अधिक्षक , पोलिस निवासस्थाने , जिल्हा कोषागार , जिल्हा काराग्रुह , जिल्हा रुग्णालय , जिल्हा न्यायालय इ. जिल्हा स्तरीय कार्यालयांच्या इमारती बांधल्या गेल्या. तसेच अधिकारी वर्गासाठी निवास व्यवस्था केली गेली. यामुळे अलिबाग शहराचे महत्त्व फारच वाढले.
*जिल्ह्याचे विस्तारीकरण*
नूतन कुलाबा जिल्हा क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने छोटा होता. महसूलही मर्यादित होते. म्हणून विस्तारीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पनवेल व उरण तालुके १८८३ साली कुलाबा जिल्ह्यास जोडण्यात आले तर कर्जत व खालापूर हे तालुके १८९१ साली जिल्ह्यात विलीन झाले.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे संस्थाने विलिनीकरणाची मोहीम चालू झाली स्वेच्छेनुसार भोर व जंजिरा ही संस्थाने भारतात ( मुंबई राज्यात ) १९४८ साली विलीन झाली. पैकी भोर संस्थानातील सुधागड व जंजिरा संस्थानातील मुरुड , श्रीवर्धन व म्हसळा हे तालुके कुलाबा जिल्ह्यात जोडण्यात आले. म्हणून तत्कालीन कुलाबा जिल्हा अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड व पोलादपूर अशा १४ तालुक्यांचा बनला. त्यामुळे जिल्ह्याचा विस्तार झाला आणि महसुलातही वाढ झाली. क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने माणगाव हा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका होता. प्रशासकीय द्रुष्ट्या तालुका दंडाधिर्यास अडचणी उद्भवत असत. तसेच तळा विभागातील जनतेची वेगळ्या तालुक्याची अनेक वर्षाँची मागणी होती. म्हणून १९९९ साली माणगाव तालुक्याचे विभाजन करून *तळा तालुक्याची निर्मिती झाली.* त्यामुळे तालुक्यांची संख्या १५ झाली.
*जिल्हा मुख्यालय गैरसोईंचे आगर होते.*
कुलाबा - विद्यमान रायगड - जिल्ह्याचे मूख्यालय अलिबाग येथे ब्रिटिश काळापासून आहे. अलिबाग तालुका पूर्वी बेट होते. पूर्वेस धरमतरची खाडी , पश्चिमेस अरबी महासागर , दक्षिणेस रेवदंडा बंदर व उत्तरेस रेवस बंदर. असल्यामुळे फक्त जलमार्गाने दळणवळण होत असे. हे जिल्हा मुख्यालय रस्ता मार्गाने जोडले गेले नसल्यामुळे मुख्यालयात येणे फारच गैरसोईचे होते. जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी धरमतर खाडी पार करावी लागत असे. हा प्रवास लाॕच / तराफाने केला जात असे. ही सेवा सायंकाळी ६ ते सकाळी ७ पर्यत बंद असे. जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधिक्षक हे अति महत्त्वाचे अधिकारी अलिबाग येथे असल्यामुळे रात्री अपरात्री कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्यास निर्णय घेणे कठीण जात असे. जिल्हा रुग्णालय अलिबागला असल्यामुळे गंभीर स्वरुपाचे आजारी आणणेही शक्य होत नसे. म्हणून गैरसोईचे आगर असलेले जिल्हा मुख्यालय पेण अगर अन्य सोईस्कर ठिकाणी हलविणे बाबत प्रयत्न झाले.
पण पारतंत्र्य काळात यश आले नाही तसेच स्वातंत्र्य काळातही प्रयत्न असफल झाले.
*धरमतर पुलाची पायाभरणी*
अलिबाग येथील जिल्हा मुख्यालय रस्तामार्गे जिल्ह्यास जोडण्यासाठी धरमतर खाडीवर पूल बांधणे हा एकमेव पर्याय होता. पण धरमतर येथे पूल झाल्यास अलिबागचे जिल्हा मुख्यालय पेण येथे हलविता येणार नाही. तसेच अलिबागचे महत्त्व आणखी वाढेल. म्हणून धरमतर पुलास काहींचा विरोध होता. पण अलिबागचे सुपुत्र, काँग्रेस नेते नानासाहेब कुंटे व दुसरे सुपुत्र आणि काँग्रेस नेते बाबासाहेब लिमये हे एकाच वेळी अनुक्रमे मुंबई विधान सभेचे सभापती व विधान परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यामुळे शासन दरबारी त्यांचे "वजन" होते. या जोडगोळीला थोर अर्थतज्ञ, रोह्यास बालपण गेलेले, भारताचे अर्थमंत्रीपद भूषविलेले रिझर्व्ह बॕकेचे पहिले भारतीय गव्हर्नर डाॕ. सी. डी. देशमुख यांची साथ मिळाली. त्यामुळे वादग्रस्त धरमतर पुलास शासनाकडून निधी मंजूर झाला. प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही मिळाली. म्हणून धरमतर पुलाचा पायाभरणी समारंभ *डाॕ. सी. डी. देशमुख यांच्याहस्ते दि. २४/ ११ /१९५१ रोजी पार पडला* तर उद्घाटन मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री *यशवंतराव चव्हाण* यांच्या हस्ते दि. ०९ /६ /१९५८ रोजी होऊन सदर पूल वाहतुकीस खुला झाला. त्यामुळे जिल्हा मुख्यालयातून पेण, पनवेल व महाडसह मुंबई, पुणेकडे थेट वाहतूक चालू झाली. तसेच रेवदंडा खाडीवर साळाव येथे पूल झाल्यामुळे मुरुड , म्हसळा व श्रीवर्धन तालुकेही जिल्हा मुख्यालयास रस्तामार्गे जोडले गेल्यामुळे *जिल्हा मुख्यालय हे गैरसोईंचे आगर या टिकेस कायमचा पूर्णविराम मिळाला.*
*शिव छत्रपतींच्या राजधानीचे महत्त्व वाढाले*
कुलाबा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे अधिराजे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची कुलाबा किल्ला ही , राजधानी याच जिल्ह्यात आहे. तसेच , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्लाही याच जिल्ह्यात आहे.
शिव छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व रायगड चे सुपुत्र बॕ. अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड जिल्हा असे *दि.१ जानेवारी १९८१* रोजी केले. पण महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्हा गॕझेटिअर ( संपादक डाॕ. वि. का. चौधरी ) १९९३ साली प्रकाशित केले. त्यात नामकरणाची तारीख *१ मे १९८१ अशी छापली असून ती सदोष आहे*. ती सदोष आहे.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात १८६९ सालापासून आजपर्यंत जिल्हाधिकारीपद भूषविलेल्या अधिकार्यांचे नाव व कालावधी दर्शविणारा नामफलक आहे. त्यात भास्करराव पाटील कुलाबा जिल्ह्याचे शेवटले जिल्हाधिकारी ( दि.३१ /१२ /१९८० ) व रायगड जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी भास्करराव पाटील ( दिनांक - १ / १/१९८१ पासून ) असे लिहिले आहे. पण महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्हा गॕझेटियर ( संपादक डाॕ. वि. का. चौधरी ) १९९३ साली प्रकाशित केले आहे. त्यात पान क्र.१ वर शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या स्म्रुतीप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाने १ मे १९८१ रोजी नामांतर करून जिल्ह्यास रायगड जिल्हा असे नाव दिले. पण नामांतराची तारीख सदोष असून ती १ जानेवारी १९८१ आहे.
आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने *१ जानेवारी* या तारखेस विशेष महत्त्व आहे. कारण कुलाबा जिल्हा निर्मितीचा आज ( १ जानेवारी २०२२ ) १५३ वा वर्धापन दिन आहे तर रायगड जिल्हा नामांतराचा ४१ वा वर्धापन दिन आहे.
-लेखक - बळवंत वालेकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला, कप सांभाळत पडल्यामुळे, हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोड...
No comments:
Post a Comment