*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।*
*गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।।
*
गुरु हा ब्रह्मदेव आहे. गुरु हा विष्णू आहे. गुरु हा शंकर महादेव आहे. या तिन्ही महान देवांचे सामर्थ्य गुरुच्या ठिकाणी प्रगट होते. गुरु हा साक्षात परब्रम्हच आहे. अशा या गुरूला नमस्कार असो...!!!*
गुरु हा ब्रह्मदेव आहे. गुरु हा विष्णू आहे. गुरु हा शंकर महादेव आहे. या तिन्ही महान देवांचे सामर्थ्य गुरुच्या ठिकाणी प्रगट होते. गुरु हा साक्षात परब्रम्हच आहे. अशा या गुरूला नमस्कार असो...!!!**
प्रार्थना -- प्रार्थना करणे म्हणजे करमणुकीचे साधन नसून देवाची करुणा भाकणे,देवाला आळविणे. भजन करणे म्हणजे देवाला भजणे, ध्यान, नामस्मरण, स्तुतीस्तोत्र गाणे...!!!*
प्रार्थना -- प्रार्थना करणे म्हणजे करमणुकीचे साधन नसून देवाची करुणा भाकणे,देवाला आळविणे. भजन करणे म्हणजे देवाला भजणे, ध्यान, नामस्मरण, स्तुतीस्तोत्र गाणे...!!!**
जीवनाचा मार्ग आक्रमित असताना कधी ना कधी प्रत्येकाला देवाच्या साहाय्याची अत्यंत जरुरी असते. देवाची आराधना ही शिदोरी असून ती जन्मभर पुरून उरणारी आहे. म्हणजे इहलोक सोडून जातेवेळी आपल्याबरोबर येणारी आहे...!!!*
जीवनाचा मार्ग आक्रमित असताना कधी ना कधी प्रत्येकाला देवाच्या साहाय्याची अत्यंत जरुरी असते. देवाची आराधना ही शिदोरी असून ती जन्मभर पुरून उरणारी आहे. म्हणजे इहलोक सोडून जातेवेळी आपल्याबरोबर येणारी आहे...!!!**
आपण रोज प्रत्येकाने नियमित देवाची प्रार्थना अत्यंत कळकळीने व प्रेमाने करावी.जोपर्यंत आम्हाला खायला प्यायला आहे तोपर्यंत आप्त,इष्ट,मित्र जवळ बोलावतात, पण कठीण परिस्थितीत कोणीही पाहण्यास तयार होत नाही.पण देव तसा नाही.कोणत्याही प्रसंगी तो मदतीला धावून येतो. करिता आपल्यावर संकटे येण्यापूर्वी त्याला संतुष्ट राखणे जरुरीचे आहे...!!!*
आपण रोज प्रत्येकाने नियमित देवाची प्रार्थना अत्यंत कळकळीने व प्रेमाने करावी.जोपर्यंत आम्हाला खायला प्यायला आहे तोपर्यंत आप्त,इष्ट,मित्र जवळ बोलावतात, पण कठीण परिस्थितीत कोणीही पाहण्यास तयार होत नाही.पण देव तसा नाही.कोणत्याही प्रसंगी तो मदतीला धावून येतो. करिता आपल्यावर संकटे येण्यापूर्वी त्याला संतुष्ट राखणे जरुरीचे आहे...!!!**
प्रार्थनेचे सामर्थ्य --कुसंस्काराचे निर्मूलन होते. पापाचे क्षालन होते.दुर्गुण नाश पावतात. सद्गुण अंगी येतात. पुन्न्याचा साठा होतो.मनुष्य पशु वृत्तीपासून सुटतो.अंगी मनुष्यपण येते. कोणत्याही परिस्थितीत मनाची अखंडता भंग पावत नाही. अलिप्तपणे जगात व्यवहार करता येतो...!!!*
प्रार्थनेचे सामर्थ्य --कुसंस्काराचे निर्मूलन होते. पापाचे क्षालन होते.दुर्गुण नाश पावतात. सद्गुण अंगी येतात. पुन्न्याचा साठा होतो.मनुष्य पशु वृत्तीपासून सुटतो.अंगी मनुष्यपण येते. कोणत्याही परिस्थितीत मनाची अखंडता भंग पावत नाही. अलिप्तपणे जगात व्यवहार करता येतो...!!!**
पथ्य -- पथ्य म्हणजे चोरी,चहाडी,अंगचोरपणा करणे,अप्रामाणिकपणा ईत्यादी दुर्गुणांना फाटा देणे. द्वेष टाकून सर्वांशी एकोप्याने वागणे.लोकांचा द्वेष केला आणि देव्हाऱ्यातील देवाची चार चार तास पूजा केली तरी ती पूजा देवाला पोहोचत नाही. केलेल्या सत्कर्माची वाच्यता करू नये. आहार घेण्यात नियमीतपणा असावा. फार झोप घेऊ नये. चांगली संगत धरावी. आळसाला थारा देऊ नये. प्रत्येकाने थोडातरी परोपकार करावा. मात्र प्रतिफळाची अपेक्षा धरू नये...!!!*
पथ्य -- पथ्य म्हणजे चोरी,चहाडी,अंगचोरपणा करणे,अप्रामाणिकपणा ईत्यादी दुर्गुणांना फाटा देणे. द्वेष टाकून सर्वांशी एकोप्याने वागणे.लोकांचा द्वेष केला आणि देव्हाऱ्यातील देवाची चार चार तास पूजा केली तरी ती पूजा देवाला पोहोचत नाही. केलेल्या सत्कर्माची वाच्यता करू नये. आहार घेण्यात नियमीतपणा असावा. फार झोप घेऊ नये. चांगली संगत धरावी. आळसाला थारा देऊ नये. प्रत्येकाने थोडातरी परोपकार करावा. मात्र प्रतिफळाची अपेक्षा धरू नये...!!!*
No comments:
Post a Comment