Monday, May 23, 2022

मुलांसाठी शिकवण

 🌹मुलांना आज काय शिकविण्याची गरज आहे पाहा*🌹🍃🍁 

*👍रात्री लवकरच झोपणे व सकाळी लवकरच उठणे.*

*👍किमान 5/10 मिनिटं एका जागेवर शांत बसणे , एकाग्रता वाढविणे .*

*👍सलग एक ते दोन तास एका जागेवर बसून वाचन ,* *लेखन अभ्यास करण्याची सवय लावणे*.

*👍चांगल्या व आवश्यक सूचना ऐकूण घेवून त्यांवर विचार करण्याची सवय लावणे .*

*👍घरातील लहान मोठ्या व्यक्तींशी चर्चा , संवाद साधने , विचारविनिमय करणे .*

*👍आपली मते घरांतील व्यक्ती , शिक्षक , सहकारी मित्र यांचे बरोबर व्यक्त करणे .*

*👍चांगले काय आणि वाईट काय याचा सारासार विचार करुन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे*
.
*👍खरे काय , खोटे काय याची वास्तवाशी सांगड घालून पडताळा घेणे व सत्याच्या मार्गानेच जाणे .*

*👍व्यवहारिक द्रुष्ट्या योग्य काय व अयोग्य काय याची समज येणे .*

*👍अंधश्रद्धा न मानता वीद्ण्यानाच्या आधारावर , प्रत्यक्ष पडताळा घ्यायचा प्रयत्न करणे*

*👍मोबाईल , T V , सोशियल मेडिया याचा कामापूरता व मर्यादित वापर करणे .*

*👍घरातील व घराबाहेरील कामे मनापासून करण्याची सवय लावणे*

*👍शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी नसून माणुस म्हणून जगण्यास लायक बनविण्यासाठी आहे हे रुजविणे.*

*👍नोकरी नाही मिळाल्यास कोणताही व्यवसाय करण्याची क्षमता प्राप्त करणे .*

*👍आपल्या कुटुम्बातील , समाजातील लहान मोठ्या व्यक्तींचा आदर राखण्यास शिकविण्यासाठी शिक्षण असावे.*

*👍जिवनात नेहमीच आशादायी व सकारात्मक द्रुष्टीकोण निर्माण करायला शिकविणे*
.
*👍आपली क्षमता पाहून स्पर्धा करणे आवश्यक , अनावश्यक स्पर्धा टाळणे, शिकणे आवश्यक .*

*👍दुसरे करतात म्हणून आपणही तेच न करता वेगळे करण्याचा प्रयत्न करायला शिकविणे.*

*👍विनाकारण दुसऱ्यांना कमी लेखने व टीकाटिप्पणी करणे टाळावे*

*👍प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात ते घेण्याचा प्रयत्न करायाला शीकवीणे.*

*👍परीक्षेत किती गुण मिळाले हे महत्वाचे नसून त्यांचेमध्ये किती नितिमुल्ये रुजली हे महत्वाचे आहे .*

*👍अब्राहम लिंकनने हेडमास्तर यांना लिहिलेले पत्र किमान आठवड्यातून एकदा वाचून दाखवून त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगणे .*

*👍साने गुरुजी यांचे शामची आई या व अशा कथा वाचुन त्याचा अर्थ समजून घेण्यास शीकवीणे .*

*👍चांगले इंग्रजी शिकला म्हणजे हुशार झाला असे नसून मातृभाषेतून संस्कार व व्यवहार शिकला म्हणजे हुशार झाला .आजकाल या व अशाच शिक्षणाबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे तर आणि तरच तो विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल आणि जिवन जगण्यास लायक होईल असे वाटते.*

*पालक वर्गाने यांवर जरूर विचार करावा असे वाटते*. 

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...