आपल्याच विश्वात गाढ झोपलो होतो आपण आणि आता एका वेगळ्याच विश्वात आपल्याला जाग आलीय.
अकस्मात डिस्नेची सगळी जादू ओसरलीय. पॅरिसचा सगळा शृंगार विस्कटलाय. न्यूयॉर्कचा दिमाख उतरलाय. चीनची अभेद्य भिंत पूर्ववत नाही राहिली आणि मक्का ओस पडलीय.
चुंबने ,आलिंगने जणू शस्त्रे बनलीत संहारक आणि आईवडिलांना ,मित्रांना भेटायलासुद्धा न जाणे हीच प्रेमाची निशाणी बनलीय.
अचानक आपल्याला कळून चुकलंय की सत्ता,संपत्ती आणि सौंदर्य या गोष्टी कुचकामी आहेत. ज्यासाठी आपली प्राणांतिक धडपड चाललीय तो प्राणवायू काही या गोष्टी आपल्याला पुरवू शकत नाहीत.
विश्वाचा गाडा मात्र पूर्ववत चालूच आहे. त्याचे सौंदर्य अबाधित आहे. त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना . मला वाटतं निसर्गाने यातून आपल्याला एक संदेश दिलाय :-
" ही पृथ्वी, जल, वायू आणि आकाश तुम्ही नसला तरी सुखात असतात. तुमच्यावाचून काही अडत नाही त्यांचं . आता परताल ना तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा.
पाहुणे आहात तुम्ही माझे,
मालक नव्हेत!"
No comments:
Post a Comment