Wednesday, May 25, 2022

'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस, म्हणजेच.. 'मराठी भाषा गौरव दिन'

मायबोलीच्या अभिमानाची

 आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस, म्हणजेच..
 'मराठी भाषा गौरव दिन'

        *भाषा जी आत्मिय संवादाचं साधन तर आहेच पण संस्कृतीचे.. प्रवृत्तीचे प्रतिकही आहे. सभ्य संस्कृतीने प्रदान केलेले अंतःकरणातील भाव भाषेतून व्यक्त होतात. आम्ही भाग्यवान की आम्हांला मातृभाषा मराठी लाभलीय.*
        *आज जगात मराठीची पताका उंचावलीय ती आमच्या अतिशय गोड.. संतसंस्कारी.. जिव्हाळ्याच्या, वैभवशाली भाषेमुळेच. ही अमृतासम मराठीची गंगा तिच्यासंगे शेकडो बोली भाषांसह आनंदाने नांदतेय.*
        *जगातील साडेसहा हजार भाषा अन् त्याच्या कैकपटीने असलेल्या बोलीभाषांतही मराठी भाषेएवढे समृद्ध दालन विरळेच.*
        *मराठी भाषेला आमच्या ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ.. नामदेव.. रामदास आदि सर्वच संत मंडळीनी तसेच साहित्यिक.. कविनी जे जीवनाचे प्रगाढ तत्त्वज्ञान प्रदान केलेय ते समजण्यासाठी जगातील कित्येक पीढ्या खर्च होतील. या मराठी भाषेचे अमृत प्राशन केलेल्या व्यक्तींनी जगात इतिहास रचलाय.*
        *संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी. संस्कृत प्रमाणेच मराठीला एवढा मोठा शब्दाचा महासागर लाभलाय की उसनवारीची गरजच नाही.* 
        *इतिहास.. अध्यात्म.. विज्ञान असा एकही विषय नाही ज्याचे ज्ञान या भाषेत नाही. भाषा ही हृदयातील भाव सांगते. सहिष्णु मराठी भाषेने देशातील सर्वच भाषेशी भावनिक ऋणानुबंधाचे नाते निर्माण केलेय म्हणूनच आम्ही मराठी भाषीक आहोत यासाठी भाग्यवान समजतो. 'मी' मराठी हा अस्मितेचा नाही तर आत्मगौरवाचा.. अभिमानाचा विषय आहे.*
        *मराठी भाषेची जगाला खरी ओळख झाली ती आपल्या पराक्रमाने शुन्यातून स्वराज्य.. रामराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मराठी भाषेच्या नावाबरोबरच शिवाजी महाराजांच्या मुल्यांचा आदर्श मराठी भाषेला जोडला गेलाय.*
        *बंधुभावासाठी विश्वकल्याणाची प्रार्थना करणारी अशी ही आमची ज्ञानसंपन्न मराठी, अशा मराठीचे बाळकडु आम्हाला मिळाले. चौदा विद्या चौसष्ट कलांना कवेत घेत आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या या मायबोलीचे आम्ही आजन्म ऋणी आहोत.*

🌸🥀🌸📚🌺📚🌸🥀🌸

        *_माझ्या मराठीची गोडी_*
      *_मला वाटते अवीट,_*
    *_माझ्या मराठीचा छंद_*
  *_मना नित्य मोहवित._*

        *_ज्ञानोबांची तुकयाची_*
      *_मुक्तेशाची जनाईची,_*
    *_माझी मराठी चोखडी_*
  *_रामदास शिवाजीची._*

        *_'या रे, या रे अवघे जण,_*
      *_हाक मायमराठीची,_*
    *_बंध खळाळा गळाले_*
  *_साक्ष भीमेच्या पाण्याची._*

        *_डफ तुणतुणे घेऊन_*
      *_उभी शाहीर मंडळी,_*
    *_मुजर्‍याची मानकरी_*
  *_वीरांची ही मायबोली._*

        *_नांगराचा चाले फाळ_*
      *_अभंगाच्या तालावर,_*
    *_कोवळीक विसावली_*
  *_पहाटेच्या जात्यावर._*

        *_हिचे स्वरूप देखणे_*
      *_हिची चाल तडफेची,_*
    *_हिच्या नेत्री प्रभा दाटे_*
  *_सात्विकाची, कांचनाची._*

        *_कृष्णा गोदा सिंधुजळ_*
      *_हिची वाढवती कांती,_*
    *_आचार्यांचे आशिर्वाद_*
  *_हिच्या मुखी वेद होती._*

        *_माझ्या मराठीची थोरी_*
      *_नित्य नवे रुप दावी,_*
    *_अवनत होई माथा_*
  *_मुखी उमटते ओवी._*

🌹🔆🌺🚩🌻🚩🌺🔆🌹

  *गीत : वि. म. कुलकर्णी* ✍️
  *संगीत : प्रशांत कदम*
  *स्वर : विवेक नाईक, वैभवी कदम, पल्लवी पारगावकर, गणेश भगत, मंगेश शिर्के, शाकंभरी किर्तीकर आणि अमोल चव्हाण*


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...