Wednesday, May 25, 2022

*नारायण नागबली*

हा विधी घराण्याच्या ,वंशाच्या पितृदोष निवारण्यासाठी केला जातो..हा विधी तीन दिवसाचा असून पती पत्नी या दोघांनी मिळून करावयाचा असतो.विवाह न झालेला पुरुष अगर मुंज न झालेला पाच वर्षांवरील मुलगाही आई वडील हयात असतानाही करू शकतो. *पत्नी सुध्दा सासरी येताना तिच्या माहेरचा पण 50% पितृदोष घेऊन येते.* त्यामुळे संबधित कुटुंबाने पत्नीच्या भावाकडून अगर आई वडिलांकडून करून घेणेही फायद्याचे ठरते.
या विधिबाबत बरेच गैरसमज आहेत.हा.विधी करताना घराण्याच्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीने त्र्यंबकेश्वर ला येण्याची गरज नाही फक्त संबधित पती पत्नी ने अगर व्यक्तीने या विधीसाठी यावे. संबधित कुटुंब नियमित श्राद्ध कर्म करीत असेल तरी त्यांनाही हा विधी करणे आवश्यक आहे.कारण *नारायण नागबली संकल्पात संबधित कुटुंबाच्या मृत पूर्वजांना जाणता अजाणता अनेक स्वाजातीच्या अगर दुसऱ्या जातीच्या धर्माच्या लोकांचा छळ अन्याय करून जे शाप तळतळाट घेतलेले असतात, त्यामुळे ते स्वाजातीचे अथवा पर जातीचे मृतआत्मे त्यांच्या पुढील वंशजांना सुड बुध्दीने छळत असतात.तेव्हा त्यांच्या या छळ पासून मुक्त होण्यासाठी..त्यांनाही सद्गती प्राप्त होण्यासाठी संकल्पित प्रार्थना असते*..
त्यामुळे आम्ही नियमित वर्ष श्राद्ध करतो आम्हाला नारायण नागबली ची गरज नाही असे म्हणणे चुकीचे आहे. हे जर योग्य रीतीने समजून घेतले नाही तर ते कुटुंब त्यांच्या पुढील वंशाच्या हानीस जबाबदार ठरेल 
एकदा नारायण नागबली केल्यास पुन्हा करायची गरज नाही ही चुकीची समजूत आहे कारण कुटुंबाच्या श्राद्ध कर्मावर अधिकार सांगणारे शास्त्र नुसार अनेकानेक त्या कुटुंबाचे नातेवाईक असतात.काही वेळा पहिल्या नारायण नागबली त काही मृत आत्म्यानी पिंड स्वीकारलेला नसेल तर त्यांनी पुन्हा करावा.याशिवाय नात्या गोत्यात जन्म मृत्यू या घटना चालूच असतातच.
     नारायण नागबली ची सांगता स्वगृही आल्यावर स्वगृहीचे अन्न खाल्ल्यावर होते. व पर अन्न नातेवाईकांकडे, माहेर कडे,मित्राकडे इत्यादी ठिकाणी घेतल्याने त्यांच्याकडे नारायण नागबली चे 100% पुण्य ज्यांचे अन्न खाल्ले त्याला जाते. शाकाहारी हॉटेल मध्ये अन्न खाल्ल्याने पर अन्न होत नाही कारण ते अन्न तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेले असल्याने तुमच्या मालकीचे असते .परंतु त्याचे पैसे दुसऱ्याने कोणी दिले असल्यास त्या अन्नास पर अन्न चा दोष लागतो.
     नारायण नागबली वरून आल्यावर सात महिन्यात सात श्री गुरु चरित्र चे पारायणे करावी त्याबरोबर स्वामींची नित्य सेवा 11 माळी जप आणि श्री स्वामी चरित्र सारा मृत चे क्रमशः तीन अध्याय रोज करावी.
घरी रोज पंच महा यज्ञ करावा.

..🌷 श्री स्वामी समर्थ🌷

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...