Monday, May 23, 2022

होळीची कथा

हिरण्यकश्यपुचा मुुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णुचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपुने त्याचा छळ केला. प्रल्हादाने परमेश्वराचे नांव घेऊनये म्हणून हिरण्यकश्यपुने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपुची बहिण म्हणाली, "मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही, मी जळणार नाही, मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते." त्याप्रमाणे हिरण्यकश्यपुची बहिण हुंठा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य...! वर मिळालेली हुंठा अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतुन सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते.... ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुध्द बनले. प्रल्हादाची जणू ही अग्नीपरिक्षाच होती. त्याची आठवण म्हणून होळी पेटविली जाते, तीच ही होळी. यासाठी होळीचे महत्व आहे.*


सारांश : होळीचा सण, उत्सव, फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा, वसंतातही संयमाची दिक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजविणारा व मानव मनात, समाजात असलेल्या आसुरी वृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे.*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...