Wednesday, May 25, 2022

जागतिक जल दिन

 *🪴🪣🚰...२२/३/२०२२ जागतिक जल दिन पाणी हेच जीवन आहे...पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तु महत्त्व जाण....🌴🪣🚿🌳

पाणी पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे.
संपूर्ण सजीव सृष्टीची उत्पत्ती पाण्यामुळे झाली आहे.
सजीवांच्या जीवनात प्राणवायू व पाणी यांना जास्त महत्त्व दिले जाते.
म्हणूनच पाण्याचा वापर खूप काटकसरीने केला पाहिजे.
*(सोसायट्या,मुंबई स्लम ऐरीया,गांव खेडे,हाँटेल, ईतर ठिकाणी)
 पाणी हा नैसर्गिक स्तोत्र असला तरी त्याचे समान वितरण, वाढती मागणी व व्यवस्थापना अभाव यामुळे सध्या त्याची टंचाई जाणवू लागली आहे. पृथ्वीच्या पाठीवरील वाढत्या लोकसंख्येला पाण्याची अत्यंत अवश्कता आहे....
*पाण्याच महत्त्व..*
*पाण्याविना नाही प्राण...*

पाणी म्हणजे जल आणि जल हे जीवन आहे.ह्या यावरूनच पाण्याचे जीवणात कीती अनन्य साधारण महत्त्व आहे.हे समज सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे.
सर्व सजीवांना जीवंत रहाण्यासाठी पाण्याची अवश्यक्ता आहे.
जर सजीवांचा शरीरातून १०%टक्के देखील पाणी कमी झाले तर कोणताच सजीव जगु शकत नाही.
माणूस काही आठवडे अन्नाशिवाय जीवंत राहू शकतो.पण पाण्याशिवाय सात दिवसा पेक्षाही जास्त दिवस जगु शकत नाही.
पाणी हा मानवी जीवनाचा मुलभूत घटक आहे.अन्नपदार्थ ग्रहण करणे आणि विष्ठेच्या रुपात बाहेर टाकण्यासाठी पाण्याचा उपयो होतो.
हे शरीरातील भागातील वंगणाचे काम करते.आपल्याला येणारा घाम,मूत्र आणि विष्ठेतून पाणी शरीरातून बाहेर उत्सर्जित केले जाते.
पाणी नसेल तर पीकांना पाणी मिळणार नाही.शेतकरी राजा हवालदिल होतो.धरतीवर ७१% टक्के पाणी आहे.
पण त्यातले फक्त २%टक्के च पाणी गोड आहे.व आपल्याला ते वापरण्यासाठी उपयुक्त आहे.
त्यामुळे आपण पाणी जपून वापरले पाहिजे.
पावसाचे पाणी साठवले पाहिजे.
*"पाणी आडवा पाणी जिरवा"*

ही म्हण रुढ झाली पाणी नसेल तर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्वात धोक्यात येईल.
*आजोबांनी पाहिले ते नदी मध्ये*
*वडीलांनी पाहिले ते विहिरी मध्ये*
*आपण पहातोय ते नळा मध्ये*
*आपली मुले पाहतील ते बाटली मध्ये*
*नातवंडे पाहतील ते कँप्सूल मध्ये*
*जर आता आपण दुर्लक्ष केले तर यापुढे पाहू अश्रूंन मध्ये...😭*
मग आपण भविष्यात म्हणू पाणी वापरायची माहिती नाही...
*पाणी वेस्ट म्हणजे पैसा नाहक वेस्ट..*
*जाणूनबुजून पाणी वाया वेस्ट घालवणाऱ्यांनी पैसा नाहक होतो हा सिध्दांत आहे....🚰*
 पाणी वेस्ट घालवल्यानंतर भविष्यात अश्रूंची 😰😭😰फुलेच होणार...हे नक्की..

*🌴🌳झाडे जगवा,पाणी जिरवा...आँक्सिन कमवा....*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...