आयुष्यात दोन व्यक्तींपासून लांब रहावे . एक व्यस्त आणि दुसरा गर्विष्ठ . कारण व्यस्त माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलणार आणि गर्विष्ठ माणूस त्याच्या मतलबा नुसार आठवण काढणार
कुणाच्याही मागे जास्त धावू नका , तुमची किंमत कमी होईल . कारण आपण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते .
खोटी व्यक्ती कितीही गोड बोलली तरी एक दिवस ती तुमच्यासाठी " बिमारी " बनणार हे मात्र नक्की . परंतु खरी व्यक्ती कितीही कडू वाटली तरी एक दिवस ती तुमच्यासाठी " औषधी " बनून तुमच्या कामाला येणार ही गोष्ट मात्र पक्की.
डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो . आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळं करतो . या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका . स्वप्नात असा वा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले .
No comments:
Post a Comment