Wednesday, May 25, 2022

शनिदेवावर तेल का अर्पण करतात ??

 शनिवार हा शनिदेव च्या पूजे साठी उत्तम दिवस मानला जातो. शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी करण्या साठी व आशीर्वाद प्राप्त करण्या साठी वेगळे वेगळया पद्धतीने पूजन सांगितलं आहे. शनिवारी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये या बद्दल देखील माहिती असावी.*

*ज्योतिष शास्त्र अनुसार शनिवारी तेल खरेदी करू नये. असे केल्याने शनीचा कुप्रभाव, विपरीत प्रभाव आपल्या सम्पूर्ण घरावर हा पडत असतो. शनी कृपे साठी शनिवारी शनिदेवा वर तेल अर्पण करणे आवश्यक आहे. पुष्कळ लोक शनीवर कोणते ही तेल अर्पण करतात, परन्तु शनी च्या मूर्तीवर तिळाचे तेल अर्पण करावे. शनी कृपा प्राप्ती व्हावि म्हणून अनेक लोक शनी वर तीळाचं तेल अर्पण करतात, परन्तु या परंपरे मागे धार्मिक व ज्योतिषी महत्व आहे. धार्मिक मता नुसार तीलहन म्हणजे तीळ ही भगवान महाविष्णू च्या शरीरावरील मळ आहे. त्यामुळे तीळाचे तेल सर्वदा पवित्र मानले गेले आहे(विष्णू पुराण).*

*तीळ तेल वाहण्याचे धार्मिक महत्व (आनंदरामायण)*

*हनुमानावर शनीची ग्रह दशेला प्रारंभ झाला, त्यावेळी रामसेतू बांधण्याचे कार्य चालू होते. राक्षसगण पुलाला हानी पोहचवणार नाही याची आशंका सदैव असायची. पुलाचं संरक्षण करण्याची जवाबदारी ही रामभक्त हनुमानवर होती. शनिदेवाला हनुमानाच्या शक्ती, कीर्ती बद्दल माहिती होती. म्हणून पवनपुत्र वर ग्रह दशेच्या फेऱ्याची व्यवस्था चे नियम सांगताना आपला आशय सांगितला. त्यावर हनुमान म्हणाले की, प्रकृती च्या नियमांचे उल्लंघन करण्याची माझी इच्छा नाही. पण रामसेवा सर्वस्वी आहे. हनुमानाचे म्हणणे होते की राम कार्य पूर्ण झाल्यावर मी माझे शरीर सर्वसी तुम्हला अर्पण करेन. परन्तु शनी देवाला हे मान्य नाही त्यानी ते स्वीकारलं नाही आणि जसे शनी देव अरुप म्हणजे अदृश्य होऊन हनुमानाच्या शरीरावर आरूढ झाले, त्यावेळी हनुमानाने पर्वतांना ठोकर मारू लागले. शनी देव हनुमान च्या शरीरावर ज्या ज्या ठिकानी आरूढ होते, त्या त्या ठिकाणी हनुमानाने पर्वतांना ठोकर दिली. त्याचे फलस्वरूप शनिदेव खूप घायाळ झाले. शरीरातील प्रत्येक अंग असह्य वेदनांनी जर्जर झाले व त्यानी हनुमानाची माफी मागितली. त्यावेळी हनुमानाने शनी देवाकडून वचन घेतले, की त्यांच्या भक्तांना ते कधी कष्ट पीडा देणार नाही. असे वचन दिल्या नंतर शनीला हनुमानाने तिळ तेल दिले. ते शनिदेवाने सर्व अंगाला लावले व त्यांची पीडा कमी झाली. त्यावेळ पासून शनीला तेल अर्पण करतात.*

*तीळांच तेल अर्पण करण्या मागचे ज्योतिष महत्व ज्योतिषशास्त्र अनुसार शनीचा धातू सिसं व लोखंड (लोह) आहे. याला संस्कृत मध्ये नाग म्हणतात, या धातूपासून शेंदूर ची निर्मिती होते. शिसं धातू एक विष देखील आहे. तंत्र शास्त्रात देखील याचे उपयोग आहे. शेंदूरवर मंगळ ग्रहाचे अधिपत्य आहे. लोखंड पृथ्वी मधून निघते व मंगळ ग्रह भूमी पुत्र आहे. मंगळ ग्रहाचा धातू तांबा जरी असला, तरी लोखंड सुद्धा मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले गेले आहे. लोखंड आणि तेल यांचा मित्र भाव आहे. तेल लोखंडला सुरक्षित देखील ठेवते. लोहाला गंज लागू देत नाही. म्हणजे जर मंगळ ग्रह प्रबळ असेल तर शनीचा दूषप्रभाव हा कमी होतो. म्हणून शनी ग्रहाला शांत करण्या साठी तिळाचे तेल अर्पण करावे.*

*हेमेन्द्र पंचभाई.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
[12/19/2020, 11:50 AM] +91 95036 45430: -------------------------
*निमगाव-खंडोबा*
--------------------------

निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव , निमगाव हे ग्राम नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्या साठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे, जुन्याकाळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते, त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव – नागना असा होत असे, काळाचे ओघात नागना गाव उध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसरया गावावरून हे गाव निमगाव – दावडी या नावाने प्रसिद्ध झाले, आत्ता हे गाव निमगाव – खंडोबा या नावाने रूढ होत आहे, पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते त्यामुळे या गावास ऐत्यासिक महत्व ही होते. हे गाव भीमा नदी काठी वसलेले आहे तेथील भग्न अवस्थेतील घाट, वाडे आपल्या पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत .

*निमगाव – खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे- नासिक मार्गावरील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर पासून ६ किमी अंतरावर आहे. निमगावचे उत्तरेस १.५ किमी अंतरावरील टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे. येथे थेट गाडी मार्ग मंदिरा जवळ जातो. पायरी मार्गानेही येथे पोहचता येते.*

कोटाचे दक्षिण बाजूने सुमारे १०० पायरी चढून कोटा पर्यंत जाता येते. पायरी मार्गाचे सुरवातीस एक पूर्वाभिमुख भैरवनाथाचे मंदिर आहे

कोटाचे पुर्व बाजूने ही पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाचे दक्षिण बाजूस मंदिराचे कोटाचे पुर्व बाजूस हेगडी प्रधानाचे पश्चिमाभिमुख मंदिर असून मंदिरात हेगडीची बैठी दगडी मूर्ती आहे.

समोरच मंदिराच्या कोटाचे पुर्व प्रवेशद्वार दिसते या द्वारावर नागखाना बांधलेला आहे
पुर्वद्वाराचे दोन्ही बाजूस छोट्या मंडपी असून त्या मध्ये दक्षिण बाजूस गणपती व उत्तर बाजूस हनुमान मूर्ती आहेत.
मंदिराचा कोट मजबूत दगडी बांधकामाचा असून चारही बाजूस बुरुज आहेत. या तटाची उंची सुमारे २५ फुट आहे कोटाचा पश्चिम दरवाजा कायम स्वरूपी बंद केलेला आहे. कोटास आतील बाजूने ७६ ओवारी आहेंत कोटाची फरासबंदी लांबी १९५ फुट व रुंदी ११८ फुट आहे या कोटाचे काम ईस १७६९ मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आहे .

पुर्वाद्वारातून कोटात प्रवेश केला की दरवाज्याचे उत्तर बाजूस दोन घोडे व वृंदावन आहे मंदिराचे समोर तीन भव्य दिपमाळा व दोन दिपमाळाचे चोथरे आहेत.

मंदिराचे समोर एका मेघदंबरीत नंदी प्रतिमा आहे.
समोरच दिसते ते खंडोबाचे पूर्वाभिमुख मुख्यमंदिर मंदिराची रचना सदर, मंडप, गर्भगृह, अशी आहे सदर पंचकमानी असून दोन्ही बाजूचे कमानीत सोफे आहेत मधील कमानी समोर मंडपाचे प्रवेशद्वार आहे.
मंडप घुमटकर असून आठ कमानी युक्त खांब विरहित आहे, मंडपास पुर्वाद्वारा बरोबर दक्षिण व उत्तरे कडून ही दरवाजे आहेत. दक्षिण व उत्तरद्वाराचे दानही अंगास प्रत्येकी दोन खोल्या आहेत दक्षिण बाजुस देवाचे शेजघर आहे.

मंडपाचे पश्चिम बाजुस गर्भगृह आहे गर्भगृहात मध्यभागी एका योनीत खंडोबाची पंचलिंगे आहेत ती पितळी मुखवट्याने झाकलेली असतात, यांचे मागे चोथर्यावर धातूच्या बानाई, खंडोबा, म्हाळसा व खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेत. या उत्सवमुर्तीचे पाठीमागे भिंतीत उभी बानाई बसलेला खंडोबा व म्हाळसा यांच्या मोठ्या मूर्ती आहेत.
हे मंदिर निमगाव खंडोबाचे तिसरे स्थान होय, देव अरुडमल येथील धामणटेक येथे प्रथम व नंतर मुख्य मंदिरामागील टेकडीवर व तेथून येथे प्रगट झालेचे मानले जाते. या ठिकाणी रविवार दि. २६ नोव्हेबर १४२४ मार्गशीर्ष ५ रोजी देव लिंगरूपाने प्रगट झाले व ग्रामस्थानी तेथे मंदिर बांधले, पुढे ईस १७३८ मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. मंदिराचे गर्भगृह मंडप यावर शिखरे आहेत.

मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहच्या पाठ भिंतीस एक पश्चिमाभिमुख देवडी असुन त्या मध्ये म्हाळसाबाई शिळा व महिषासुर मर्दिनी भवानीची दगडी मुर्ती आहे.
मंदिराचे परिसरात मंदिराचे दक्षिण बाजुस एक थडगे आहे ते खंडोबाची निस्सीम भक्त असलेल्या मुरुळीचे असल्याचे सांगितले जाते.
मंदिराचे कोटाचे सज्यावर जाणेसाठी उत्तर व दक्षिण बाजुने पायरी मार्ग आहे. कोटाचे सज्या व नगारखान्या वरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
मंदिराचे कोटाचे पश्चिमेस एक छोटी टेकडी दिसते या टेकडीवर एक पूर्वाभिमुख देवडी आहे यात पंचलिंग असुन समोर नंदी आहे. या देव्डीस कडेपठार असे म्हणतात खंडोबाचे हे मंदिरातील स्थाना अगोदरचे दुसरे स्थान या ठिकाणाहून देव आजचे मंदिराचे ठिकाणी आल्याचे मानले जाते,
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी ©*
----------------------------------------------------

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...