Wednesday, May 25, 2022

आयुष्यात काय शिकले पाहिजे ?

*आयुष्यात खूप म्हणजे खूप गोष्टी आहे ज्या शिकायलाच हव्यात….*

*१) शांत राहायला शिकायला हवे*
 खूप खूप प्रयत्न करून काही गोष्टी ठीक नाही झाल्या पण जेव्हा थोडा वेळ शांत राहिले तेव्हा आपले आपणच मार्ग सापडत गेले . कदाचित म्हणूनच असे म्हणतात कि , शांतता आणि संयम अभूतपूर्व आयुष्याचा पाया आहे..
*२) हसतमुख राहायला शिका .*
सर्व परिस्थिती मध्ये चेहऱ्यावरची हास्य नावाची जी लकीर असते ती ढळता कामा नये..हसतमुख राहायला शिका थोडक्यात स्माईल मस्ट आहे.. हसऱ्या चेहऱ्याचा विसर सहसा लवकर कोणाला होत नाही.. 
*३) रडायला शिका :*
 रडून मन हलके करा रडल्याने सर्व दुख संपत नाही पण मन हलके जरूर होते…
*४) व्यक्त व्हायला शिका :-*
 व्यक्त होणे म्हणजे बोलणेच असे नाही व्यक्त म्हणजे तुमचे आवडी छंद जोपासा आणि त्यातून स्वतः ला व्यक्त करा..
*५) स्वतः ला सतत बिझी करायला शिका कारण , रिकामे डोके हे शैतानाचे*
*६) सर्वांसोबत एकदम छान* हसतमुख राहायला शिका अनोळखी लोकांसोबत सुद्धा कारण , कधी कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन खूप मोठा बदल करेल हे सांगता येत नाही .
*७) चूक असेल तर माफी मागा*
 आणि त्याचबरोबर माफ हि करायला शिका. *माणूस आहे चुका तर होणारच न…*
 
आणि माणूसच तर आहे माफ करायला असे कित्ती पैसे लागतील न…
*आणि शेवटच आयुष्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या बाबतीत नवीन आणि पूर्णपणे वेगळा असतोच त्याला तितक्याच आनंदाने जगायला शिका.प्रत्येक वेळी समस्या वेगळी असते कदाचित अगोदरच्या पेक्षा मोठी असते परंतु प्रत्येक समस्या हि त्यावरचा उपाय घेऊनच येत असते , असे ऐकले आहे..*

*आनंदी राहा , खुश राहा नि कायम हसतमुख राहा*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...