*देवा, मी पापी आहे' असे म्हणावे तर तुमच्या पायाचे चिंतन करतो. अर्थात मी पुण्यवान असल्याशिवाय माझ्याकडून चिंतन कसे होईल? मग माझा आता उद्धार करण्यास काय हरकत आहे, आणि जर तुम्ही मला पापी मानत असाल, तर तुमच्या चिंतनापेक्षाही पाप प्रबल झाले काय?।।१।।*
*'मी पापी आहे' या विपरीत समजुतीने स्वतःला बंधन घालून, खोटा प्रतिबंध निर्माण करून हे चक्रपाणी, तुम्ही निश्चल आहात काय? माझी उपेक्षा करीत आहात काय?।।२।।*
*पण देवा, तुम्हाला असे उदाहरण दाखवितो की, महापातकी असलेल्या अजामिळाने पुत्राच्या निमित्ताने एक वेळ नाम घेतले. एवढ्याच कारणाने तुम्ही त्याचे दुःख घालविले. त्या वेळी त्याचा अधिकार न बघता तुम्ही त्याचा उद्धार कसा केला ते सांगा? मी तर त्याच्या इतका महापातकी खास नाही. शिवाय, तुमचे रात्रंदिवस चिंतन करीत आहे.।।३।।*
*जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अहो वैकुंठनायका, तुमच्या भक्ताला उद्धाराची चिंता असणे योग्य आहे काय? याचा तुम्हीच विचार करा.।।४।।*
*। ॐ विष्णवे नमः।*
जयहरि माऊली 
No comments:
Post a Comment