Monday, January 9, 2023

पाऊल व पाय

पाऊल व पाय दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..

पाऊल नाजूक ..व
मुलायम.. तर पाय भक्कम अन् मजबूत असावा लागतो..!

पाऊलखुणा* उमटतात तर पायांचे ठसे ...!!

*पाऊलवाटेवर* कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण *पायवाट* ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..!

*पाऊल जपून टाकायचे* असते; पण *पाय हा रोवायचा* असतो.. !!

काय कमाल आहे बघा..
नावडत्या व्यक्तीच्या घरी *"कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही"* असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र *आपला पाय लवकर निघत नाही..!!☺*

नको त्या ठिकाणी *पाऊल घसरते* तर बहारदार संगीत मैफिलीत *पाय रेंगाळत राहतो !*

 *पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !*

जीवनात किंवा व्यवसायात टाकलेले *पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो* तर येणार्‍या अनुभवांमुळे *आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट* ही अटळ व गरजेची असते... *...!*

बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही........
...........

जन्माला येताना स्वतःच्या *पावलांनी* न येणारे आपण ,...परत जातानादेखील आपल्या *पायांनी* मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत *साम्य* आहे...!
☺

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...