*मायबोलीच्या अभिमानाची आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस म्हणजेच.. 'मराठी मातृभाषा दिन'*
*भाषा हे केवळ संवादाचं साधन नाही तर संस्कृतीचे.. प्रवृत्तीचे प्रतिकही आहे. अंतःकरणातील भाव त्यामुळे पोहोचतात पण भाषा त्या संस्कृतीचे श्रेष्ठत्वही सांगते.*
*परा.. पश्यन्ती.. मध्यमा.. वैखरी यामुळे प्राप्त होते वाणी. वाणीतून शब्द प्रकटतात. शब्दांची तयार होते भाषा. प्रत्येक प्रांताची ही भाषा वेगळी. जगात तर साडेसहा हजार भाषा अन् त्याच्या कैकपटीने कित्येक बोलीभाषा.*
*भाषा हा तर साहित्यिक सामाजिक.. राजकीय.. सांस्कृतिक जीवनाचा आरसाच. आम्ही भाग्यवंत. मराठीला ज्ञानेश्वर माऊली "अमृताते पैजा जिंकणारी" सुमधुर भाषा म्हणून गौरवितात. या भाषेच्या सौंदर्याने आणि या मराठी भाषेचे अमृत प्राशन केलेल्या व्यक्तींनी जगात इतिहास रचला. संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी. संस्कृत प्रमाणेच मराठीला एवढा मोठा शब्दाचा महासागर लाभलाय की उसनवारीची गरजच नाही.*
*इतिहास.. अध्यात्म.. विज्ञान असा एकही विषय नाही ज्याचे ज्ञान या भाषेत नाही. सहिष्णु मराठी भाषेने देशातील सर्वच भाषेशी भावनिक ऋणानुबंधाचे नाते निर्माण केलेय. जगभर मराठीचा सन्मान होतो. भाषा ही हृदयातील भाव सांगते. मराठी भाषेच्या गोडव्याने मराठी भाषिकांच्या संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त मिळलेय. आम्ही मराठी भाषीक आहोत यासाठी भाग्यवान समजतो. "मी" मराठी हा अस्मितेचा नाही तर अभिमानाचा विषय आहे.*
*जगात बंधुभावा साठी विश्वकल्याणाची प्रार्थना करणारी अशी ही आमची ज्ञानसंपन्न मराठी, अशा मराठीचे बाळकडु आम्हाला मिळाले. चौदा विद्या चौसष्ट कलांना कवेत घेत आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या या मायबोलीचे आम्ही आजन्म ऋणी आहोत..*
*गीतकार सुरेश भट यांच्या लेखणीतून साकारलेली प्रतिभाशाली एक रचना :*
*-लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी_*
*-जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी_*
*_धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी_*
*_एवढ्या जगात माय मानतो मराठी_*
*_आमुच्या मनामनात दंगते मराठी_*
*_आमुच्या रगारगात रंगते मराठी_*
*_आमुच्या उराउरात स्पंदते मराठी_*
*_आमुच्या नसानसात नाचते मराठी_*
*_आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी_*
*_आमुच्या लहानग्यात रांगते मराठी_*
*_आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी_*
*_आमुच्या घराघरात वाढते मराठी_*
*_आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी_*
*_येथल्या फुलाफुलात हासते मराठी_*
*_येथल्या दिशादिशात दाटते मराठी_*
*_येथल्या नगानगात गर्जते मराठी_*
*_येथल्या दरीदरीत हिंडते मराठी_*
*_येथल्या वनावनात गुंजते मराठी_*
*_येथल्या तरुलतात साजते मराठी_*
*_येथल्या कळीकळीत लाजते मराठी_*
*_येथल्या नभामधून वर्षते मराठी_*
*_येथल्या पिकांमधून डोलते मराठी_*
*_येथल्या नद्यांमधून वाहते मराठी_*
*_येथल्या चराचरात राहते मराठी_*


*२७.०२
No comments:
Post a Comment