*डरो ...ना*
डर के आगे धंदा है ....समजो ना
*क्रॉसलाईन*
दैनिक लोकाशा 9613331111
चूप बस रडू नको देवबाप्पा कानात उडी मारून गप बसवण्याचे सूत्र आम्हाला पाळण्यात गळी उतरवले जाते आणि आम्ही केवळ भीतीने आखले जातो . इंग्लंड चे प्रिन्स गाडी तून उतारताच त्यांचा साहेब सेक द्यायला हात पुढे करतात मात्र तत्काळ मागे घेऊन भारतीय नमस्कार करतात , डोनाल्ड तात्या देखील कोपराला कोपर लाऊन जगाला आमची किती फाटली आहे हेच दाखवतात मात्र जेव्हा डोनाल्ड यांच्या तोंडाला मास्क नसतो मग संसर्ग केवळ हातात हात न दिल्याने होणार नाही का ? मास्क नसल्याने तो होणारच आहे मग हातात हात न घेण्याचा सोपस्कार का ? कारण अमेरिकेचा राष्ट्रपती भितो म्हणजे आपण देखील घाबरले पाहिजे ना ? सामान्य लोकांना पार हलवून सोडणारा आणि जगाला एका रांगेत ( म्हणजे मृत्यूची भीतीने) आणणारा कोरोना ११० देशाच्या अर्थ व्यवस्थेला प्रभावित करून गेला आहे .
देशात १५ अर्थव्यवस्था अत्यंत प्रभावित झाल्याचे युनायटेड नेशन्स कोन्फ्रांस ओन ट्रेड and डेव्हलपमेंट ने जाहीर केले आहे त्यात भारताचा नंबर आहे , तब्बल ३४.०८ कोटी डॉलर चा फटका बसला आहे . कर्नाटक मधील एक वृद्ध त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडल्याने आणि र्ह्द्यरोग असल्याने दगावला . भारतात चक्क सरकारी खोटी परिपत्रके तयार करून का व्हायरल केली जातात , याचा फायदा कुणाला होतो याचा विचार करण्याची गरज आहे . भारतातच नाही तर संपूर्ण जगात या कोरोना नावाच्या व्हायरस ने मानवी जमात मृत्युच्या भीतीच्या खाईत लोटली आहे , अनेक सरकार यावर काळजी करण्या पेक्षा भयभीत होऊन लोकांना वेगळ्या कृष्णविवरात घेऊन जाण्यात धन्यता मानत आहे . कोरोना नाही असे अजिबात नाही तो व्हायरस असेल मात्र लागण होणे म्हणजे मृत्यू हा समज कुणी पसरवला , तो सरकारांनी का पसरवू दिला यावर देखील चर्चा झाली पाहिजे , लोकमनाचे अवधान हस्तातरीत करण्याची मानसिकता जागतिक पातळीवर समुहाने तडीस जावी , हि कसली समस्या आहे . कोरोना बद्दल सर्वाधिक फटका बसलेला चीन आपली अर्थव्यवस्था का बिघडवू देत नाही आणि भारतात केवळ ८० समीप लक्षणे असलेले रुग्ण सापडले कि ११ लाख कोटीचा फटका याचा अर्थ काय यावर आम्ही विचार केला पाहिजे . चीन मधील ४४००० हजार रुग्णाचा अभ्यास केला तर ८० टक्के रुग्ण पूर्वीचेच गंभीर आजारी होते , आणि ७० टक्के रुग्ण ६० वर्षा पेक्षा अधिक वयाचे आहेत . जगातल्या १००० रुग्णात ९ लोकांचा मृत्यू होत असला तरी ९९१ रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याचे देखील आम्ही पाहितले पाहिजे . कोरोना बद्दल काळजी घेतली पाहिजे मात्र त्याच्या भीतीने आमचे व्यवसाय आणि व्यवस्था कोलमडणार नाही याची काळजी कुणी घेणार आहे का नाही . जग किती भोळे भाबडे आहे त्याला मृत्यूची भीती दाखवा म्हणजे ते आपले सर्व प्रश्न सोडून घरात बसू शकतात हे दाखवून देण्यात कोरोना हा व्हायरस निमित्त ठरला आहे , अफवा पसरवन्यासाठी नेमकी कुठल्या यंत्रणा व कोण प्रयत्न का करत आहे हे समजून घेतले पाहिजे . सार्स नावाचा व्हायरस जगात आला तेव्हा भारताचे काही देखील झालेले नव्हते हा संदर्भ देखील दिला जातोय . स्वच्छता हि काळजीचा विषय असला पाहिजे तो भीतीचा नसावा या साठी लोकांनी देखील आपण मूर्ख नाहीत हे सिद्ध करावे लागेल .
.........
*गेल्या दोन महिन्यात किती मृत्यू कुठल्या रोगाने*
कॉमन कोल्ड - मृत्यू ६९ ६०२
मलेरिया - मृत्यू १लाख ४० ५८४
आत्महत्या - मृत्यू १लाख ५३ ६९६
रोड अपघात - मृत्यू १लाख ९३ ४७९
एड्स - मृत्यू२ लाख ४० ९५०
अल्कोहोल - मृत्यू३लाख ५८ ४७१
स्मोकिंग =मृत्यू ७ लाख १६ ४९८
कर्करोग - मृत्यू ११ लाख ७७ १४१
आणि कोरोना - मृत्यू ३३६०
..........................
*कोरोनामुळे काही होणार नाही शपथपत्रावर लिहून देतो - डॉ अनिल पाटील ( एम .डी .)*
केएम हॉस्पिटल मुंबईचे डॉ अनिल पाटील ( एम .डी .) यांनी भारताचे कोरोना काही नुकसान होणार नसल्याचे म्हटले आहे , कुठलाही व्हायरस भारतात खूप वेळ टिकत नाही , चीन ने जगाला दिलेला हा रोग नाही तर धंदा आहे , मास्क चे , व्हाईक्षण तयार केले जातील अन ते विकले जातील असा कयास त्यांनी लावला आहे . २६ डिग्री तापमानात हा व्हायरस जिवंत राहूच शकत नाही त्यामुळे भारतात तर घाबरण्याची गरजच नाही . मिठा सह गरम पाण्याने गुळण्या केल्या , किवा अर्धा चमचा हळद टाकून गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर कोरोनाची मजल नाही . तुळशीच्या पानाचा काढा प्या असे सांगताना डॉ अनिल पाटील यांनी कोरोना मुळे आपलेच काही होणार नाही असे सांगताना आपण हे शपथ पत्रावर लिहून देऊ शकते असे त्यांनी सांगितले आहे .
...........................
No comments:
Post a Comment