काही माणसं मैत्रीने खांद्यावर हात टाकतात, दु:खातही कायम साथ देतात.*
*काही माणसं गजबजलेल्या शहरासारखी असतात, गरज पडली तरच
आपला विचार करतात. बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.
*मात्र काही माणसं पिंपळाच्या पानांसारखी असतात. जाळी झाली तरी
मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवतात...!!!*
*जिथे आपल्याला ठेच लागते* *तिथूनच सवय लागते सांभाळून
चालायची* *मग ती पायाला असो किंवा मनाला* *
❝ समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये
याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे
चाललीय हे निश्चित समजावे..❞*
*माणसाला परके कोण हे*
*कळण्यापेक्षा आपलं कोण हे*
*कळायला जास्त वेळ लागतो*
*अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणुस एकदा अडकला,
की तो स्वतःच सत्व तत्व.. नाती गोती एवढच काय
माणुसपणही विसरून जातो.*
*❝समजूतदारपणा आणि सहनशीलता हे वयावर नाही तर
आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते...❞*
*क्षमतेपेक्षा जास्त धावलो कि दम लागतो आणि क्षमतेपेक्षा
जास्त धावायला पण दमच लागतो.*
*कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असे नाही,*
*तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार...*
*हे सुद्धा कमाई मध्येच मोजले जाते.*
*वाक्य लहान आहे*
*पण महान आहे.....*
*लोभासारखा कोणताही*
*आजार नाही,*
*आणि दयेसारखे*
*कोणतेही पुण्य नाही...*
_*ज्या क्षणी तुम्हाला जाणिव होते की, आपला प्रवास
एकट्याला करायचा आहे... तो क्षण तुमचे आयुष्य बदलवून टाकणारा असतो...!*
*प्रत्येक गोष्ट* *मनासारखी होत नसते* *म्हणून सुखापेक्षा*
*समाधान शोधा आयुष्य* *खूप आनंदात* *जाईल...!!!*
*पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही*
*आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही!*
*म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे...*
*झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही,*
*ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते!*
*तसच* *आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून.नवीन काय मिळवू शकतो,याचा विचार करा.!!*
*यातच जीवनाचा अर्थ असतो!!!*
No comments:
Post a Comment