Friday, December 16, 2022

    *आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही*...

    *साडीतलं सौदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणा सारखं सौदर्य नाही*...
   *कितीही कलमं करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तरं आणा जुई आणि मोगऱ्याची सर नाही*...
   *शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही*...
  *भाजीभाकरीची चव पिझ्झा बर्गर ला नाही आणि ग्राउंड ची सर जिमला नाही*...
   *स्वता सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जीवनांत प्रेम करणा-या जोडीदारासारखा आधार नाही*...
   *कितीही tally वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी-निमकीची मजा कॅलक्युलेटरमधे नाही*...
   *कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कुणाचंच चालत नाही*...
   *कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही कितीही पैसे असुद्या पण माणसांशिवाय काही भागत नाही*...
   *खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही आपल्या आवडत्या व्यक्तिबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळे होत नाही*
   *अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही*...
   *मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही*...
   *शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही*...
  *स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही*...
   *सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतंच नाही*...
   *भक्त्ती सारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कुणीच नाही*...
   *घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटूंबाशिवाय कुणीच नाही*....

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...