आटपाट नगरात कोरोना या नवीन नावाचा एक जुना व्याधी घुसला. एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी जाण्याचे चिह्न दिसेना. रोगाची तपासणी करावी तरी पंचाईत, न करावी तरी पंचाईत. काही जणांना लक्षणे अजिबात नाहीत, पण टेस्ट पाॅझिटीव्ह! तर काही जणांना लक्षणे दिसत असली तरी दोन लॅबमधे दोन वेगळेच रिपोर्टस.
या त्रिशंकू स्थितीतून बाहेर येण्यासाठी
काय करावे ? याचे उत्तर आयुर्वेदानुसार या लेखात मिळेल.
रोग शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर होत असतात.
यासाठीच तन-मन-आत्मा, या त्रिस्तरावर प्रत्येकी अकरा चिकित्सा सूत्रे सुचवली आहेत.
*आरोग्य एकादशी*
*•शारीरिक स्तर•*
१. नियमितपणे दोन्ही नाकपुड्यांमध्ये गायीचे तूप अथवा शुद्ध तीळ तेलाचे आठ आठ थेंब किंचीत कोमट करून सोडावे. नाकात थेंब घालण्या अगोदर कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. ( त्यात मीठ हळद नको. ) पाठीवर झोपून अथवा खुर्चीत बसून नाकात थेंब घालून दहा मिनीटे मान मागे सोडून द्यावी.
नाकात तुप घालणार त्यावेळी आपले दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासुन ते हलकेच कपाळपट्टी, तसेच नाकाच्या दोन्ही बाजूला अलगद ठेवलेत तर नैसर्गिक स्वेदनही होईल.
नस्याप्रमाणे जलनेती पण करावी. जवळील योगगुरूंकडून ती शिकून घ्यावी.
असे नियमितपणे सकाळ सायंकाळ दोन वेळेस करावे.
२ . नाकात तूप सोडून झाल्यावर दहा मिनीटांनी पुनः कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
गुळण्या करताना आवाज मोठा येईल असे पहावे. थोडासा कफ, चिकटपणा खाकरून बाहेर काढावा. जमल्यास छोटी उलटी झाली तरी किंवा उलटी केली तरी चालेल. जास्त फायदा होईल. असे सकाळी सायंकाळी दोन वेळेस करावे.
गुळण्या करताना एक कप कोमट पाण्यात दोन चमचे तीळ तेल घालून गुळण्या केल्या तर जास्त फायदा होईल.
३ . एक कप पाण्यात चार तुळशीची पाने, एक लवंग, चिमूटभर ओवा घालून उकळी आणावी. हवा असेल तर चिमूटभर गुळ घालावा. गरम गरम तुळशीचा चहा प्यावा. असा चहा दोनवेळा प्यावा. जमलं तर याच चहाची कोमट वाफ नाकात ओढून घ्यावी.
या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे धूमवर्ती तयार करून त्याचा धूर एका नाकपुडीवाटे आतमध्ये घ्यावा लगेचच तोंडाने बाहेर सोडावा. दुसऱ्या नाकपुडीतून पण तसेच करावे. असे सकाळ सायंकाळ आणि रात्री झोपताना करावे.
५ . घर आणि परिसर निर्जंतुक करण्यासाठी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळाव्यात. त्यामधे तूप, हळद, लवंग, वेलची, कापूर टाकावे. धूर चार पाच उदबत्या जाळल्यानंतर जेवढा होईल तेवढाच करावा. उगाच जास्ती नको. दहा मिनीटे तो सर्व घरामधे फिरवावा.
६ . असाच धूर गावामध्ये देखील देवालयाच्या बाहेर, बस स्टॅण्ड, पाणवठे, मार्केट, अथवा चौका चौकामध्ये जिथे नंतर खूप वर्दळ होते तेथे करावा. तिथे धूर थोडा जास्त प्रमाणात झाला तरी चालेल. असे दोन वेळेस करावे. शक्यतो सूर्योदय, सूर्यास्त या वेळेवर करावे. ( सध्या सकाळी सहा सव्वा सहा आणि सायंकाळी पावणेसात सात च्या दरम्यान )
७ . आहार मर्यादित ठेवावा. अरबट-चरबट खाऊन पचनावरील ताण वाढवू नये. रात्रीचे जेवण कटाक्षाने सातच्या आत संपवावे. पाणी गरजेपुरतेच, तहान लागेल तेव्हा, तहान भागेपर्यंत दोन घोट प्यावे. उगाचच ढोसू नये.
नेहेमीच्या पिण्याच्या पाण्यात दोन झेंडूची फुले कुस्करून/पाकळ्या रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून घ्यावे व जेवताना किंवा मधे घोट-घोट हे पाणी प्यावे.
८ . तीनवेळा नाहीतर किमान दोन वेळा तरी आंघोळ करावीच. आवडते तसे थंड कोमट गरम पाणी वापरावे. साबण शाम्पू नको.
९ . बाहेरून घरात येताना कटाक्षाने हात-पाय कोपरा-ढोपरा पर्यंत धुवावेत. शक्यतो बाहेरून आल्यानंतरचे कपडे वेगळेच ठेवावेत. नेहेमीच्या कपड्यांवर लावू नयेत. स्वतःचा टॉवेल / नॅपकीन स्वतःच वापरावा. तो स्वतःजवळच ठेवावा. बेसिनजवळ टॉवेल, नॅपकीन अजिबात ठेवू नये.
१० . कंगवा, फेसपावडर, परफ्युम, काजळ, टिकली, आदी सौंदर्य कीट स्वतःचेच वापरावे. कॉमन वापरू नये.
११ . अंगात कणकण, सर्दीची लक्षणे, खोकला, डोकेदुखी वाटली तर महासुदर्शन काढा मोठ्या व्यक्तींनी चार चमचे तीन वेळेस जेवणानंतर घ्यावा. लहान मुलांना निम्म्या प्रमाणात द्यावे. वास न येणे, चव न लागणे याची फार वाच्यता करू नये. जवळच्या भरवशाच्या डॉक्टरला फोन करून तात्पुरता उपाय करावा. वरील उपाय केलेत तर लक्षणात वाढ होत नाहीच. उगाच हौसेने, पॅनिक होऊन, मुद्दामहून कोरोनाची तपासणी करायचे धाडस दाखवू नका. ही लक्षणे कोरोनाचीच आहेत, असे गृहित धरून, फार ताण न घेता, घरातच फुकटची विश्रांती घ्यावी. कुठेही घराबाहेर पडू नये. सर्व सरकारी नियमांचे पालन करावे.
आयुषने सांगितलेला कोरोनासाठीचा काढा लक्षणे असतील तरच प्यावा. नाहीतर नको. उष्णता वाढते.
आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेने पोस्ट कोवीड क्लिनिक सुरू केली आहेत. त्याची लिंक आणि डॉक्टरांचे पत्ते वेबसाईटवर दिले आहेत. गरज वाटल्यास ते कृपया जिल्ह्यानुसार शोधावेत. आणि तिथे जाऊन स्वतःची प्रत्यक्ष तपासणी करून वैद्यकिय सल्ला घ्यावा.
*•मानसिक स्तर•*
कोरोना से डरोना !
१ . दिवसाची सर्व कामे नीट मन लावून करावीत. कोरोना विसरून जावा. त्याला आठवत बसलात तर तो सारखा जवळपास येणार.
२ . कोरोना हा सर्दीचाच एक प्रकार आहे, माझी प्रतिकारक्षमता उत्तम आहे, त्यामुळे मला काही झालेले नाही, मला काहीही होणार नाही, असे मनाला वारंवार बजावावे.
३ . ज्यांना त्याचा त्रास होतोय, तो त्यांच्या कर्मानुसार किंवा प्रारब्धानुसार होत आहे, त्यापासून मला कोणताही त्रास होत नाही, होणार नाही. असे सात आठ वेळा आठवावे. मनावर बिंबवावे.
४ . टीव्हीवर मॅच पहावी, आपण खेळावे, व्यायाम करावा, प्राणायाम करावा, जमल्यास योगासने करावीत. इंद्रिय ध्यान करावे. याचा स्वतंत्र व्हिडिओ युट्युबवर आहे.
५ . ज्यांना आपल्याला मदत करणे शक्य आहे, तेवढी मदत मनापासून करावी, पण वर सांगितल्याप्रमाणे सुरक्षित अंतर ठेवावे.
६ . फोनवरून एकमेकांच्या संपर्कात रहावे. पण जी मंडळी कायम नकारार्थी विचार करतात त्यांचे फोन स्विकारू नयेत, अथवा नंतर फोन करतो असे काहीतरी सांगून बोलणे टाळावे.
७ . काही विनोदी पुस्तके वाचावीत. व्हॉट्सॲप, फेसबुकवर खूप छान मनोरंजन करणाऱ्या पोस्ट अथवा व्हिडिओ असतात, ते जरूर पहावेत. मनमोकळे मनसोक्त हसावे.
८ . मनात येणारे चांगले वाईट विचार डायरीमधे लिहून ठेवावेत. नंतर कधीतरी वाचताना चांगली करमणूक होते.
९ . नेहेमी चेहरा हसतमुख ठेवावा. कपाळपट्टीवर आठ्या येत असतील तर सतत ताणलेल्या भुवया काढून टाकाव्यात. हसण्यासाठी ओठ बंद करून गाल मागे न्यावेत. ( करून पाहिलेत ना? असं दिवसातून पंधरा-वीस वेळेस करावे. )
१० . टीव्ही, मिडीया, केबल, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर इ. वरील कोरोनाविषयक कोणतीही माहिती वा पुरस्कृत चर्चा पाहू नये, वाचू नयेत, वाचल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. मनातून डिलीट करावे.
११ . जे होतंय ते चांगलंच आहे, जे होणार ते अधिकच चांगलं होणार आहे , यावर विश्वास ठेवून असावं.
*•आध्यात्मिक स्तर•*
१ . सर्वश्रेष्ठ परमेश्वर माझ्याबरोबर आहे. त्याच्या रेंजमधे मी कायम आहे, भगवंताच्या इच्छेने, माझ्या प्रारब्धात जे असेल ते होणारच आहे, ते मी आनंदाने स्वीकारणार आहे, असे स्वतःला सांगावे.
२ . सतत नामस्मरण करावे. कुलदेवी माहित असल्यास कुलदेवीचा अथवा श्रीराम जयराम जय जय राम असा जप करून लढण्याची ताकद त्यांच्याकडूनच मागावी. देव देण्यासाठीच नियतीकडून नियुक्त झालेले आहेत.
३ . सदगुरू वामनराव पै यांची ‘हे ईश्वरा..’ ही विश्वप्रार्थना म्हणावी.
४ . प. पू. गोंदवलेकर महाराजांची ‘प्रवचने’ नावाचे पुस्तक आहे. तारखेनुसार रोज एक प्रवचन वाचावे.
५ . घरात सायंकाळनंतर शुभंकरोती म्हणावी. रामरक्षा पठण, गणपती स्तोत्र, हनुमान स्तोत्र अथवा हनुमान चालीसा असे स्तोत्र म्हणावे. घंटा वाजवून, निरांजन लावून, देवाची आरती करावी.
६ . आस्तिक वृत्तीने, भावपूर्ण, श्रद्धा ठेवून जेव्हा आपण भगवंताला शरण जातो, तेव्हा तो येतो आणि आपणाला सूक्ष्मातून मदत करून जातो, असा भाव ठेवावा.
७ . आपण विचारांनी नास्तिक असलो तरी एक शक्ती, एक सकारात्मक उर्जा, (पॉझिटीव्ह एनर्जी) म्हणून मनापासून तिला शरण जावे. ब्रह्मांडामधे सर्व व्यवहार नीट होण्यासाठी जी शक्ती सतत कार्यरत असते, तिला कोणतेही नाव न देता, हात जोडण्याचे कर्मकांडही न करता, मनोमन शरण जावे.
८ . घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करून बाहेर पडावे, या कृतीने त्यांचे आशीर्वाद ( त्यांच्या मनातील आपल्या विषयी सकारात्मक लहरी ) आपले संरक्षण करीत असतात.
९ . कोणतेही काम करताना, मुखात भगवंताचे नाम असावे.
१० . वैयक्तिक उपासनेबरोबर सामुहिक उपासना पण आवश्यक आहे. समुहात एकत्र बसून केलेली प्रार्थना आपली आध्यात्मिक शक्ती त्याच पटीने वाढवीत असते.
११ . माझ्यासोबत कोणी असोत वा नसोत, मला विरोध करणारे किंवा विघ्न निर्माण करणारे कोणी असोत वा नकोत, याच्या पलीकडे जाऊन, मी माझे दैनंदिन काम करणारच आहे, त्यासाठी सर्व शक्तीमान परमेश्वर मला मदत करतो आहे, हा भाव मनात नित्य ठेऊन, सतत प्रार्थना करावी.
_*सर्वेऽपि सुखिनः सन्तु*_
_*सर्वे सन्तु निरामयाः*_
_*सर्वे भद्राणि पश्यन्तु*_
_*मां कश्चिद दुःख माप्नुयात् ||*_
_*वैद्य सुविनय दामले*_
*आयुर्वेदाचार्य (मुंबई विद्यापीठ)*
_*कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र*_
आयुवेद व्यासपीठ माजी उपाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी
साांडू आयुवेद भूषण पुरस्कार २०१७
वस्तुविनिमय व्दारा उपचाराची लिम्का बुक आँफ रेकॉर्ड नोंद २०१३
वैद्य खडीवाले संस्थेचा आयुर्वेद रचनात्मक कार्य पुरस्कार २०११
पंचकर्म व संमोहन तज्ञ
No comments:
Post a Comment