विशेष वृत्त
" आजचं वृत्तपत्र ही उद्याची रद्दी असते " असं म्हणून वृत्तपत्रिय लेखनाला कायम कमी लेखलं जातं. तसं तर आपण लिहीत असलेला साहित्य प्रकारच कसा सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्याची या साऱ्यांची शर्यत खूपच स्पृहणीय असते. ते असो. पण मी मात्र वृत्तपत्रातून सदर स्वरूपातच नाही तर विस्कळीत पणेही जे लिहिले त्याचीही पुस्तके झाली. प्रकाशकांनीच ती पुढाकार घेऊन काढली. ते सारं वाचक मित्रांना एकदा सांगायचे आहे.
मी 1996 पासून लोकसत्तेच्या चतुरंग पुरवाणी साठी लिहीत होतो. 1998 साली त्यांनी त्यांच्या लेखकांचे एक संमेलन भरवले होते. तिथे मला बातमीदार म्हणून काम करायला विचारले. मी होकार देऊन लगेच कामाला सुरवातही. केली. मी लोकसत्तेचा रसायनी चा वार्ताहर होतो.
पण लवकरच मला routine बातमीदारी करायचा कंटाळा आला. कुठल्या म्हशीला तीन पायाचं रेडकू झालं आणि कोण गाव पुढारी काय म्हणाला हे लिहिण्यात माझं स्वतः च असं काहीच नव्हतं. याचं काळात मी सामना, कृषिवल, सकाळ अश्या बऱ्याच पेपरात स्वतंत्र पणे लिहीत होतो. सदर चालवत होतो. साप्ताहिक चित्रलेखेचा मी कोकण विभागचा प्रतिनिधी होतो. खुद्द लोकसत्तेतही चतुरंग पुरवणीत लिहिणे चालूच होते. त्यामुळे माझं बातम्या पाठवणे हळू हळू कमी झाले व थांबले.पत्रकार म्हणून मिरवणे, परिषदांना उपस्थित राहणे किंवा तत्सम कुठल्याही गोष्टीत मला रस नव्हताच.
याचं काळात माझ्या असे लक्षात आले कि आपण विशेषवृत्त केले तर ते आपल्या नावासकट छापून येते. श्रेय मिळते. मला ते आकर्षक वाटले. मी तश्या प्रकारची विशेषवृत्ते तयार करू लागलो. मला विषयही मिळू लागले. विविध पेपर्स ना मी ते पाठवू लागलो. छापूनही येऊ लागले. आज त्यातील विषयानकडे पाहिलं तरी आश्चर्य वाटते. ओरोगामीतून गणित शिकवणारे रवींद्र केसकर, स्वतंत्रसंग्रामाचा इतिहास संग्रहीत व फोटो बद्ध करणारे उरण चे सुधाकर पाटील, चरीच्या संपाचा अनोखा इतिहास, नावालाई ची भाषा बोलणारे कोरलाई वासीय, मातीचे डॉक्टर, केश्यालंकाराचे अभ्यासक एक ना अनेक विषय. मालिकाच सुरु झाली. खरं तर आम्ही बातमीदारांनी आपापल्या विभागातील केवळ बातम्या पाठवणे गृहीत धरलेले असते पण मी संपूर्ण रायगड, ठाणे मुंबई सह रत्नागिरी सिंधुदुर्गत ही त्या साठी फिरू लागलो. अर्थात घर संसार अपडाउन ची नोकरी सांभाळून मी हे कसे केले त्यासाठी काय मेहनत घेतली हा सांगण्याचा नाही तर समजून घेण्याचा विषय आहे. ते नन्तर कधीतरी
अर्थात माझी मेहनत वाया गेली नाही लोकसत्ते पाठोपाठ मला कृषिवल व सकाळ मधून या साठी विचारणा झाली आणि मुख्य म्हणजे पुण्याच्या पायल पब्लिकेशनच्या मिलिंद माने यांनी स्वतः हून विचारणा करुन हे पुस्तक तयार केले. पुढे अनेक वृत्तपत्रानी त्याची दखल घेतली.
विशेषवृत्त
श्रीनिवास गडकरी
पेण रोहा 09130861304
No comments:
Post a Comment