*क्रॉसलाईन*
दैनिक लोकाशा 9613331111
इडी कोर्ट या दोन संस्था व राज्यपाल शिवाय फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीला शून्य किंमत आहे , दिल्लीचा पुरेपूर वापर करण्यात फडणवीसांना पैकीच्या पैकी द्यावे लागतील , तीन पक्षाच्या आघाडीला अनैसर्गिक म्हणणारे , त्याच आघाडीतल्या इडी नोटीसा गुंडाळून ठेवणारे भाजप देखील धुतल्या तांदळाचे राहिलेले नाही . त्यामुळे येऊ घातलेली सत्ता भाजपला सत्ताधीश बनवते सोबतच निसर्गाचा आरोपी देखील , ज्या बाळासाहेबांनी कमळाबाईला महाराष्ट्रात नांदवले त्या भाजपच्या वंशजांनी बाळासाहेबांचा वारस अपमानास्पद खेचला . २००० सीआरपीएफ मुंबईत आणून दिल्लीने आपले मनसुबे तडीस सत्तेला अघोरी बनवले आहे .
जनतेनं फक्त विज्ञान, तंत्रज्ञान, कला, निसर्ग, यांच्यात रमून आयुष्याचा श्रेयस आनंद घ्यावा, आपल्या रिकामचोट छिछोरेगिरीमुळे त्यांना डिप्रेस वाटू नये याची पक्की खबरदारी घेणारे राजकारणी पुढे आले पाहिजेत. लोकशाहीच्या पुढच्या इन्कल्यूझिव टप्प्याकडे त्यांनी आपली शासनयंत्रणा नेली पाहिजे.एका जरी माणसावर अन्याय होत असला तरी त्याच्या हक्कासाठी त्यांनी उभ्या जगाशी लढलं पाहिजे. इतिहासाशी बेईमानी नाही, वर्तमानाशी लबाडी नाही, आणि भविष्याची धोरणपेरणी त्यांनी केली पाहिजे.माझं एक स्वप्न आहे. जगातली कोणतीही शक्ती आली तरी लॉजिक, करुणा, धर्मनिरपेक्षता, जातीअंत, लिंगभेदाचा अंत, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, न्याय या मूल्यांशी कणभरही तडजोड न करणारे सरकार आलेलं पहायचं आहे. संपूर्ण बहुमतातलं एक सामान्य नागरिक म्हणून माझीही हि भावना आहे . काल निखिल वागळे यांनी एक पोस्ट केली , " आता फडणवीस परत येतील.पण त्यांची पूर्वीची प्रतिमा धुळीला मिळाली आहे.कारस्थानी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि ते बनवतील हपापलेल्या बोक्यांचं सरकार , मात्र सत्ता हि सत्ता असते , पैसा शक्ती हि त्यातून मिळत असते , सत्तेसाठी नैतिकतेचे निकष बहुदा कुणी लावत नाही , फरक फक्त एवढाच कि भाजपने मर्यादा आणि पातळी सोडली .
एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल उद्धव ठाकरे भाजप सोबत जाऊन सत्तेत कायम राहू शकत होते आणि आजही राहू शकले असते. त्यांनी हार मानली नाही, माघार घेतली नाही. दिलेल्या शब्दाला जागणे म्हणजे काय याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ,ज्या माणसाची मुख्यमंत्री पदाची खुर्ची बाळासाहेब ठाकरेंनी एका फोन वर वाचवली होती त्या माणसाने बाळासाहेबांच्या मुलाची खुर्ची काढून टाकली. काल भले फडणवीसांनी महाराष्ट्राची सत्ता जिंकली असेल मात्र महाराष्ट्राचे मन बाळासाहेब पुत्राने जिंकले आहे , बंडखोर आमदारांना देखील सत्तेच्या शय्येवर आपण काय केले याची आठवण कूस बदलवत झोपू देणार नाही
No comments:
Post a Comment