ओसंडून वाहणारा प्रतिसाद अगदी खळखळणाऱ्या पाण्यासारखा असतो.. आवड-निवड निर्माण झाली की जुन्या चौकटी मोडून अनेक नव्या बाबी रुजवत, अनेक पर्याय शोधत, आयुष्य उलगडू लागतं..
एक माणूस म्हणून अभिमानानं गोष्टी सांगताना दिसायला हव्यात.. मान्य की आपला दृष्टिकोन अगदी मोकळेपणाने लोकांसमोर मांडावा.. शेवटी तर्क हा समोरच्यांचा असतो, तसाच आपला ही असतो.. अनुभव ही ज्याचा त्याचा असतो.. मत मांडा असं विचारल्यास सगळ्यांच विषयांवर मतं मांडतात.. प्रतिमेला तडा जाईल असं वागायचं का नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे..
जगाकडे आणि स्वतःकडे आहे त्या नजरेने बघत.. अगदी स्वतःबद्दलदेखील मर्यादा राखत प्रवास चालू असतो पण अंतिम ध्येय ठाऊक नसते..
आत्मविश्वासाने टिकून राहणारेच यशस्वी होतात बोलतात.. अंगी तगण्याची क्षमता आली की जगण्याच्या विविध कल्पना निर्माण होतातच....

*************************************
*वेळ आली की तुमची आपलीशी वाटणारी माणसं तुम्हाला तुमची जागा दाखवून देतात. तुम्हि त्यांच्यासाठी कसे अजिबातच महत्त्वाचे नाही आणि इतरजणं कसे महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला पद्धतशीरपणे दाखवलं जातं.*
*ठरवून एखादी गोष्ट करायची वेळ आली की तुम्हाला बरोबर बाजूला केलं जातं. तुम्हाला आपलं ऊगाच वाटत राहातं तुम्हि त्यांचे आपले आहात.*
*खर तर तुम्ही त्यांच्यासाठी असता फक्त एक टाईमपासच साधन, इतर कोणी नसताना त्यांच मन रमवणारं. सतत तुम्हीच त्यांच्यासाठी सगळ अॕडजेस्ट करावं हे त्यांनी गृहीतचं धरलेलं असतं...*
*गैरसमज दूर व्हावा म्हणून एकदाही समोरून प्रयत्न केला नाहि त्यावेळी समजून जायच इथे फक्त आपलेपणाचा देखावा होता. वेळीच शहाणपण शिकायचं आणि तिथून मागे सरकायचं.....*
*आपली उर्जा वाचवण्याचा हा उत्तम मार्ग असतो. दिवा गंगेवर सोडायचा अश्या नात्यांचा, माणसांचा. आणि प्रवास सुरु करायचा स्वतः मधलं बेस्ट बाहेर काढायाचा....... बस इतकच.....*
वंदना मिलिंद प्रचल....
**********************************
*कधी-कधी फक्त गर्दीचा भाग बनून राहणेही ठीक पण थांबने हा पर्याय नाही, थांबला तो संपला ; काही ना काही करत राहणे, चालत राहायचं थोड़ का होईना...*
*कारण प्रयत्न सोडले की संपलं सगळं आशा तर ठेवावीच लागेल, संयम ठेवावाच लागेल, पण संयम शब्द जेवढा बोलायला सोप्पा आहे तेवढाच अनुकरणासाठी कठीन, पण पर्याय कुठयं...*
*आयुष्य प्रत्येकाचे थांबलेलेच आहे कुठे ना कुठे; पण प्रयत्न आणि संयमाशिवाय आहेच क़ाय हातात..*

No comments:
Post a Comment