*अमृत महोत्सव कशाचा करताय?
मोदीजी तुम्हाला नैतिक अधिकार नाही.*
मोदींनी देशाची चेष्टा चालवली आहे.
'भारत 2014 साली स्वतंत्र झाला, आमची आझादी मोदी पंतप्रधान झाले तेंव्हा सुरु झाली.' असे म्हणणाऱ्या *कंगवा राणावत या चित्रपट नटीला* देशातील सर्वोत्तम झेड सुरक्षा देणाऱ्या केंद्र सरकारला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का? तुमचे स्वातंत्र्य तर फक्त आठ वर्षांचे आहे !
'महात्मा गांधी भिकारी होता, 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे इंग्रजांनी गांधीच्या कटोऱ्यात टाकलेली *'भिख'* होती.' असे जाहीरपणे बोलणाऱ्या कंगना राणावतला स्टार प्रचारक घोषित करणाऱ्या भाजपाच्या केंद्रातील सरकारला या भिकाऱ्यांच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
'नथुराम गोडसे आमचे आदर्श आहेत, गांधीचा खून करुन त्यांनी पुण्याचे काम केले.' असे म्हणणाऱ्या *साध्वी प्रज्ञा ठाकूर* हिला खासदार बनविणाऱ्या भाजपाच्या केंद्रातील सरकारला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
ज्यांनी 70 वर्षे आपल्या कार्यालयावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवला नाही त्या *'आरएसएस'* ला आपली मातृसंस्था मानणाऱ्या भाजपाच्या केंद्र सरकारला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
स्वातंत्र्याच्या आंदोलनात ज्या पक्षाचा एकही नेता सहभागी नव्हता त्या भाजपाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
भारतीय जनतेने मागील 70 वर्षात बलशाली राष्ट्र निर्माण केले. कष्ट करुन, घाम गाळून देशात पायाभूत सुविधा निर्माण केल्या व विविध उद्योगांची उभारणी केली. भारताला नववैभव प्राप्त करुन दिले. देशाच्या मालकीची ही सर्व संपत्ती कवडीमोल किमतीत विकून *देशाला दुबळे करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या कंगाल बनवणाऱ्या विद्यमान मोदी सरकारला* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
'भारतीय संविधान हे परदेशी संविधानांची चोरलेली आवृत्ती आहे.' असे म्हणून *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या भाजपाला* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
भारतातील सर्व धर्माच्या व जातीच्या लोकांना समान अधिकार व 1947 साली भारतात राहिलेल्या सर्वांना नागरिकत्वाचे हक्क देणारे *संविधान मान्य नसलेल्या भाजपाला* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ मानून *वर्णव्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपाला* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
राजकारणासाठी धर्माचा वापर करता येणार नाही असे सांगणारे संविधान बासनात गुंडाळून केवळ *सत्तेसाठी धार्मिक व्देष भडकवणाऱ्या भाजपाला* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
आधीच महागाईच्या चटक्यांनी होरपळलेल्या जनतेला अन्नधान्यावर जीएसटी कर लादून लुटणाऱ्या मोदी सरकारला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का?
अत्यंत खोटं बोलून भारतातील जनतेची क्रूर चेष्टा करणारे मोदी सरकार या देशातील जनतेची फसवणूक व पिळवणूक करीत आहे. गेली 75 वर्षे या देशात धर्माधर्मात व जातीजातींमध्ये द्वेषाची बीजे पेरण्याचे काम करीत असलेल्या भारतीय जनता पार्टीला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही.
*अमृत वर्षात खरी गरज आहे पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही राजवटीतून देश व जनतेला भयमुक्त करण्याची.*
No comments:
Post a Comment