Sunday, December 11, 2022

 🌺 

*संकल्प ही फार मोठी शक्ति आहे.*
*इच्छा जर खरोखर अती प्रबळ झाली,*
*तर ती वस्तूला,*
*आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही.*
*तसेच,भगवंताच्या प्राप्तीसाठी,*
*प्रबळ इच्छा धारण केली,*
*तर भगवंत भेटतो.*
*प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या,*
*तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे,*
*त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही.*
*याच्या उलट, भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे,*
*आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन,*
*त्या क्षीण बनतात,*
*आणि नंतर आपोआप नाहीशा होतात.*
*म्हणून नेहमी भगवंत मला हवा,*
*अशी इच्छा करीत जावे.*
*त्याचे नाम घेणे, म्हणजे तू मला हवास' असे म्हणणेच होय.*
*खऱ्या प्रेमाने जर आपण,*
*आपला भार रामावर टाकला,*
*तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर,*
*गोष्टी घडवून आणतो.*
*आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो,*
*ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे,*
*म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही.*
*नामात एक विशेष आहे.*
*विषयाकरता जरी नाम घेतले,*
*तरी विषय प्राप्त होऊनही,*
*ते आपले काम, म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे,*
*ते करीतच असते,*
*म्हणून कशाकरता का होईना,*
*नाम घ्या.*
*पण निर्विषय होण्याकरिता घेतले,*
*तर काम शीघ्र होईल...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*जीवन म्हणजे...*
*सरळमार्गी पार पाडणारी स्पर्धा नसून,*
*ती एक विचित्र शर्यत असली,*
*तरी प्रत्येकाला भाग घेतलाच पाहिजे.*
*परंतु जिवाचा आटापिटा करून जिंकलो तर,*
*आपली माणसं मागे राहतात.*
*आणि हरलो तर सोडून जातात,*
*ही खंत सतत मनाला भेडसावत रहाते.*
*त्यामुळे मनातली तळमळ,*
*आणि ओढ लावणारी भावना,*
*आपल्या माणसांसाठी ही गुंतागुंतीची ठरते.*
*हे आपणाला आतून माहीत असलं तरी,*
*ते प्रत्येकाला समजेलच असं नाही.*
*पण तुमच्यावर ज्यांनी मनापासून प्रेम केलं,*
*किंवा तुमच्या मनाच्या जवळ असतील तर,*
*त्यांना तुमच्याबद्दलचे आपलेपण,*
*कळल्या शिवाय रहाणार नाही...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...