*मी आहे तुझ्या सोबत,*
*असं म्हणणं खूप सोपं असतं,*
*पण जेव्हा सोबतीची खरी गरज असते,*
*त्यावेळी एकट्यालाच चालावं लागतं,*
*चेहऱ्यावरचं हसणं...*
*हा एक दिखावा असू शकतो.*
*म्हणून माणसांना वरवर बघण्याची नाहीतर,*
*आतून समजण्याचा प्रयत्न करा.*
*लोक धोका देऊन हुशार झाले,*
*आणि आपण मात्र विश्वास ठेवून,*
*मूर्ख झालो...*
*म्हणून वेळीच सावध रहा.*
*जिथे डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो,*
*तिथेच विश्वासघाताचा धोका जास्त असतो.*
*पोटात एक आणि ओठात एक,*
*अशी जगणारी माणसं विश्वासघातकी असतात,*
*लक्षात ठेवा सगळ्यांना चांगलं समजणं,*
*हे ही कधीकधी खूप अडचणीत टाकतं,*
*काही माणसं पैशाने नाही,*
*तर विचारांनी भिकारी असतात,*
*म्हणून तुमचा स्वभाव इतका पण चांगला ठेवू नका,*
*की तुम्ही लोकांना वाट दाखवित रहाल,*
*आणि लोक तुमची वाट लावत राहतील...!!*



*सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते,*
*तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते,*
*या दोन्ही परिक्षेमध्ये,*
*जो उत्तीर्ण होतो,*
*तोच माणूस जीवनात यशस्वी होतो.*
*आनंद वाटणाऱ्या ओंजळी,*
*कधीच रिकाम्या रहात नाहीत,*
*कारण...*
*त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान,*
*परमेश्वराकडून लाभलेले असते.*
*पोटाची भूक,,*
*पैशांची टंचाई,*
*तुटलेले मन,*
*आणि मिळालेली वागणूक,*
*जे काही शिकवून जाते,*
*ते कोणत्याही अभ्यासक्रमात,*
*शिकवले जात नाही...!!*



No comments:
Post a Comment