Friday, December 16, 2022

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी देशहितासाठी मनापासून वाचून किमान ७५ नागरिकांना पाठवायला च..च..च हवी अशी माझ्या व्हॉट्सॲप वर आलेली वर्तमानातील उत्कृष्ट पोस्ट

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


*जन मन की बात* : तर आम्ही ३६५ दिवस तिरंगा अभिमानाने घराघरांवर फडकवू !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने " घर घर तिरंगा " अभियानाचे स्वागतच आहे आणि त्यास प्रतिसाद म्हणून आम्ही नागरिक अत्यंत अभिमानाने तिरंगा फडकवणार आहोत .

 भारत हा जगातील लोकशाही असणारा सर्वात मोठा देश आहे याचा देखील आम्हा नागरिकांना सार्थ अभिमान आहे .

 देशातील १४० करोड नागरिकांना वर्तमानपत्रातील जाहिराती , टीव्हीवरील जाहिराती , विविध ठिकाणी बॅनर्स च्या माध्यमातून "हर घर तिरंगा " अभियानातंर्गत १३ ते १५ ऑगस्ट या ३ दिवसांसाठी तिरंगा लावण्याचे आवाहन करणाऱ्या सरकारी यंत्रणा , लोकप्रतिनिधी , मंत्री , विविध पक्षाचे कार्यकर्ते -नेते यांना आमचे सांगणे आहे की , *स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी अपेक्षित लोकशाही आपण जर प्रत्यक्ष कारभारात अंमलात आणली तर आम्ही नागरिक स्वयंप्रेरणेने २४X ७X ३६५ आमच्या घरांवर झेंडा फडकवण्यास आतुर आहोत*.

    भारत हा लोकशाही असणारा जगातील सर्वात मोठा देश आहे असे आपण सांगता . पण आमचा तुम्हाला हा प्रश्न आहे की , *कुठे आहे लोकशाही प्रत्यक्ष कारभारात*?

🇮🇳 ज्या देशात जनतेच्या पैशाने चालणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जनतेपासून गुप्त ठेवला जातो , त्या देशात लोकशाही आहे हे म्हणणे कितपत रास्त ठरते ?

🇮🇳 ज्या देशात शिक्षण संस्थांचा कारभार विद्यार्थी -पालकांपासून गुप्त ठेवला जातो , पालकांनी भरलेल्या शुल्काचा विनियोग कसा केला जातो हे गुपित ठेवले जाते... शिकवणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता दडवून ठेवली जाते त्या देशात लोकशाही व्यवस्था आहे असे म्हणणे निव्वळ धूळफेक नव्हे काय ?

🇮🇳ज्या देशातील राज्या राज्यातील राज्य सरकारी यंत्रणाचा कारभार हा ज्या जनतेसाठी राज्य कारभार चालवला जातो त्यांच्या पासून दृष्टीआड ठेवला जात असेल तर त्या देशात लोकशाही व्यवस्था आहे असे वारंवार सांगणे नागरिकांची शुद्ध फसवणूक नव्हे काय ?
 🇮🇳 ज्या देशावर सत्ता करणारा पक्ष व त्यांचे नेते " *पारदर्शक कारभाराचा*" डंका पिटतात, त्या देशातील जनतेला लोकशाहीची स्थापना होऊन तब्बल ७५ वर्षे झाल्यानंतर देखील केंद्रीय यंत्रणांचा कारभार पब्लिक डोमेनवर खुला करत जनतेसमोर मांडला जात नसेल तर त्या देशाची लोकशाही फसवी आहे असे म्हटले तर वावगे कसे ठरू शकेल ?

  🇮🇳लोकशाहीचा अमृत महोत्सव अशा पानभर जाहिराती देणाऱ्या , अमृत महोत्सवाच्या टीव्हीवर जाहिराती देणाऱ्या देशातील सर्व *प्रसार माध्यमांना* हा प्रश्न आहे की , जसा आम्हा नागरिकांना प्रश्न पडतो की , *कुठे आहे कारभारात लोकशाही* ? , तसा लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या तुम्हा प्रसारमाध्यमांना पडत नाही का ? 
 जोवर लोकशाही प्रत्यक्ष व्यवस्थेत उतरत नाही , कारभारात अंमलात आणली जात नाही तोवर लोकशाहीची दवंडी मिरवणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे असा प्रश्न पडून देखील आपण मूग गिळून बसणार असाल तर देशातील प्रसारमाध्यमांना टाळे लावलेले योग्य ठरणार नाही का ?

 किमान नकारात्मक गोष्टींचा प्रचार तरी थांबेल आणि समाजात शांती नांदेल , स्वास्थ लाभेल .
  एक गोष्ट प्रसारमाध्यमांनी लक्षात घ्यायला हवी की , तुम्ही एक मुखाने देशातील यंत्रणात प्रत्यक्ष लोकशाही अंमलात आणा अशी आग्रहाची मागणी केली तर या देशातील कुठलाच राजकीय पक्ष , राजकीय नेता "पारदर्शक कारभाराची " मागणी धुडकावण्याचे धाडस करणार नाही . तसे केले तर त्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल .
      असो !
🎙️प्रमुख मागणी🎙️ 
*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या महोत्सवाच्या निमित्ताने आम्हा जनतेचे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या मायबाप सरकार कडे हीच मागणी आहे की , ७५ वर्षे झाली आता तरी "लोकशाही प्रत्यक्ष कारभारात येऊ द्या* "?
 लोकशाहीतील यंत्रणांचा कारभार जनतेसाठी खुला करा !! देशाला भ्रष्टाचाराची लागलेल्या किडीचे मूळ आणि मुख्य कारण आहे ते व्यवस्थांचा अपारदर्शक कारभार !!!
    आम्हाला देश प्रेम आहेच आणि म्हणूनच आमच्या हृदयात -श्वासात -रक्तात असणारा तिरंगा आमच्या घराघरांवर फडकवत आहोत . तुम्हा लोकप्रतिनिधींना -नोकरशाहीला देशाविषयी *खरे प्रेम* असेल तर सर्व यंत्रणांचा कारभार जनतेसाठी पब्लिक डोमेनवर खुला करा .
तुम्ही *जन मन की बात* एकूण त्यास प्रतिसाद म्ह्णून लोकशाहीतील यंत्रणांचा कारभार पब्लिक डोमेनवर खुला केला तर आम्ही आमचा प्रिय तिरंगा ३६५ दिवस स्वयं प्रेरणेने घराघरांवर फडकवू . त्यासाठी जाहिराती देण्याची, बॅनर्स लावण्याची नक्कीच वेळ येणार नाही .

आपलाच :  
🙏
घरावर तिरंगा अभिमानाने फडकवणारा देशप्रेमी नागरिक .

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...