










*शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करताना केली जाणारी लांबलचक घोषणा कोणती? त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे? ही घोषणा कुणी आणि कधी लिहिली?*
*मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार घोषणा तयार केल्यात . पण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केली गेलेली घोषणा,.मराठीत तिला गारद असे म्हटले जाते. ती खालील प्रमाणे.*
*आस्ते कदम*
*आस्ते कदम*
*आस्ते कदम*
*महाराsssssज*
*गडपती*
*गजअश्वपती*
*भूपती*
*प्रजापती*
*सुवर्णरत्नश्रीपती*
*अष्टवधानजागृत*
*अष्टप्रधानवेष्टित*
*न्यायालंकारमंडित*
*शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत*
*राजनितिधुरंधर*
*प्रौढप्रतापपुरंदर*
*क्षत्रियकुलावतंस*
*सिंहासनाधिश्वर*
*महाराजाधिराज*
*राजाशिवछत्रपती*
*महाराजांचा विजय असो.*
*छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ.*
*गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज.*
*गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.)*
*भूपती प्रजापती – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.*
*सुवर्णरत्नश्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.)*
*अष्टावधानजागृत – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.*
*अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.*
*न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.*
*शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज.*
*राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.*
*प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.*
*क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.*
*सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.*
*महाराजाधिराज – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.*
*राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.*
*(संकलित.)*











No comments:
Post a Comment