परिस...
एका व्यक्तीला कळले कि एका साधु जवळ परिस आहे. तो परिस मिळवण्यासाठी तो व्यक्ती साधुंची सेवा करु लागला. एके दिवशी साधु म्हणाले, मी गंगा स्नानाला जात आहे. परत आल्यावर मी तुला परिस देइन. असे म्हणुन साधु निघुन गेले. आता त्या व्यक्तीला परिसाबद्दल उत्कंठा वाढली. साधुच्या अनुपस्थीतीत त्याने सर्व झोपडी हुडकली, पण त्याच्या हाती परिस काय सापडला नाही. साधु परत आल्यावर त्यांना सर्व कल्पना आली.
साधू म्हणाले, काय रे इतका धीर नाही का? परिस तर मी त्या डबीत ठेवला आहे. असे म्हणून साधुने एक डबी काढली, ती डबी लोखंडी होती. मग ही डबी सोन्याची का झाली नाही?
साधु थट्टा करित आहेत.
त्याने साधूला विचारले महाराज ही डबी लोखंडीच आहे, सोन्याची का झाली नाही? ती लोखंडाची का राहीली? साधू म्हणाले, तेव्हा परिस कापडात गुंडाळुन ठेवला होता. कापडाच्या आवरणाने तो त्या डबीला सोन्याची बनवु शकला नाही.
आशारितीने जीव व ईश्वर एकाच ठिकाणी राहतात, परंतु दोघांमध्ये वासनेचा पडदा आडवा आहे. म्हणुन दोघांचे ऐक्य होत नाही. म्हणजेच जीव ईश्वराला ओळखत नाही आणि जीवाचे ईश्वराशी ऐक्य होत नाही.
जीवात्मा डबी आहे, तर ईश्वर परिस आहे. दोघांच्यामध्ये असलेला मायेचा पडदा दूर सारायचा आहे. अहं व ममतारुपी जाळ दूर सारण महत्त्वाच आहे...
**************************************************
:
*जेव्हा मन कमकुवत असतं,*
*तेव्हा परिस्थिती समस्या बनते.*
*जेव्हा मन संतुलित असतं,*
*तेव्हा परिस्थिती आव्हान बनते.*
*जेव्हा मन खंबीर असतं,*
*तेव्हा परिस्थिती एक संधी बनत असते.*
*सर्व खेळ मनाचा आहे,*
*मन खंबीर बनवा.*
*उल्हसित मन, प्रफुल्लित चेहरा,*
*आणि वैचारिक प्रगल्भता,*
*हेच खरे सौंदर्याचे मापदंड असतात.*
*रागात बोललेला एक शब्द सुद्धा,*
*एवढा विषारी असतो की,*
*प्रेमाने बोललेल्या हजारो गोष्टींना,*
*एका क्षणात संपवून टाकतो,*
*म्हणून जवळच्या माणसांचा राग आला,*
*तरी बोलताना शब्द जपूनच वापरावे.*
*When you find no solution to a problem,*
*it is probably not a problem to be solved,*
*but rather a truth to be accepted.*
*निरागस,निष्पाप,निर्भेळ, सुहास्य,*
*हाच चोवीस कॅरेट दागिना,*
*सगळ्यात मौल्यवान असतो.*
*किसीं को गलत समझने से पहले;*
*एक बार उसकी हालात समझने की कोशीश जरूर करो;*
*क्योकि हम सही हो सकते है;*
*लेकिन हम सही होने से सामनेवाला;*
*गलत नही हो सकता;*
*कोणतेही नाते,*
*हे वॉरंटी कार्ड घेऊन येत नसते,*
*नाते बिघडले तर ते नम्रतेने सुधारायचे असते,*
*आणि जुने झाले तर पुन्हा पुन्हा,*
*भेटून टवटवीत करायचे असते.*
*जीवन मे हर समस्या ट्रॅफिकके लालबत्ती की तरह होती है-*
*यदि हम थोडी देर प्रतीक्षा कर ले;*
*तो वह हरी हो जाती है;*
*धैर्य रखे, प्रयास करे, समय बदलताही है;*
*वो लोग जो अक्सर दुसरों को उनके कठीन समय में सलाह देते है;*
*वे खुद अधिकतर समय;*
*समस्याओं से उलझे रहते है;*



No comments:
Post a Comment