Thursday, December 22, 2022

 डॉ . अकल्पिता परांजपे


अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू प्राणवायू कमी पडल्याने व फुफ्फुसांच्या त्रासाने होतो. काही रुग्णांना कोरोना बरा झाल्यावर सुद्धा श्वसनाचा त्रास होतो. कोरोना गेला. मग आता श्वास घ्यायला त्रास का?

सध्या जो महत्वाचा प्रश्न भेडसावतो आहे तो म्हणजे फुफ्फुसांच्या निष्क्रियतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा. लक्षात घ्या, ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो, त्या औषध प्रणाली मध्ये फुफ्फुसात जमलेले अवशेष काढण्याची क्षमता असलेले कोणतेच औषध उपलब्ध नाही. कृत्रिमरीत्या फुफ्फुसात प्राणवायू सोडला जातो. (vantilator). ही क्रिया तेथे साचलेले पेशींचे अवशेष तर काढू शकत नाही, पण त्या अवशेषांवर नको तो दाब मात्र वाढवू शकते.   
 
आता पुढचा प्रश्न: मग ही पडलेली घाण कशी साफ करायची. 
  आमच्या लहानपणा पासून ते आजतागायत कुठेही रक्त साकळले, जखम झाली सूज आली तर हळदीचा उपयोग करण्याची प्रथा आहे. तेंव्हा हि पारंपरिक औषधी घ्यायला कोणताच प्रत्यवाय नाही. एक तर ती सहज उपलब्ध असते. व ती आपण रोजच्या जेवणात वापरतो, म्हणजेच तिच्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत. . मग आम्ही हळदीचा अर्क घेण्याचे ठरवले. माझ्याकडे *ओली हळद* होती. त्यात तीन गोष्टी आढळल्या:

१ हळदीचा रंग जवळजवळ काळपट लाल होता. 
२ कोणत्याही प्रकारची कीड, बुरशी लागली नव्हती. 
३ अत्यंत सुगंधी होती.

मी त्याचा अर्क तयार केला. तो गहिरा केशरी आहे.

मग *आपण घरात वापरतो ती हळद पिवळी का दिसते?* आणि त्या हळकुंडांना सहज कीड लागते. आपण घरात वापरतो ती हळद आधी पाण्यात उकळून तुकडे करून सुकवून वाळवलेली असते. त्यामुळे पाण्याबरोबर त्यातील काही अंश वाहून जातो.

असो. *या हळदीचा अर्क व गोळ्या बाजारात मिळतात. त्याला करक्युमा लोंगा असे म्हणतात.* हा अर्क आम्ही *दररोज सकाळ संध्याकाळ दहा थेम्ब* घ्यायला सुरवात केली. *गरम पाण्या बरोबर*. अत्यंत चविष्ट आणि सुगंधी. दोन दिवसात फरक जाणवला. शिवाय बारीक ताप येत होता (९८.F ते ९८.५F) तो पण कमी झाला. ह्या वेळे पर्यंत शेतावरून कडुनिंबाची पाने पण आली होती. *वैद्य पल्लवी कानिटकरां*च म्हणणं होत की कडुनिंब जर रोज सेवन केला तर १५ दिवसात भारत कोरोना मुक्त होईल. त्यांच्या अनुभवावरून अगदी *कोरोना रुग्णांना हॉस्पिटल मध्ये इतर औषधांबरोबर कडुनिंबाची ४० पाने दिवसातून एकदा दिली तरी सुद्धा रुग्ण बरे होतात*. तेंव्हा आम्ही दोघांनी सकाळी व संध्याकाळी चहा पूर्वी कडुनिंबाच्या पानांची गुळात करून घेतलेली गोळी चावून खायला सुरवात केली. ह्यानंतर आमचे, SpO2 ९६-९७, नाडी ७२-७४ व ताप ९७C-९७.५C च्या दरम्यान यायला लागले. श्वसनाचा त्रास पण कमी झाला.

या काळात माझी पोस्ट यावाचून बरेच फोन येत होते. त्यांना वैद्य कानिटकर व वैद्य प्रमोद कलोसे यांनी दिलेली औषधे व त्यांचा घेण्याचा क्रम कळवला. पण त्यात तीन वयस्क व्यक्ती (वय ६७, ७३ व ९०) जे दवाखान्यात होते त्यांच्या नातेवाईकांचे फोन आले. एक गृहस्थ ICU व इतर दोघे oxygen वर. या सर्वांना तेथील डॉक्टरांच्या संमतीने *कडुनिंबाच्या गोळ्या व curcumen longa Q* घेण्यास सांगितले. आनंदची गोष्ट म्हणजे दोन दिवसात दोघांच SpO2 सामान्य झाल व त्यातील दोघांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आल. ICCU मधील आजोबा general ward मध्ये आले.

या सर्वातून आपण काय निष्कर्ष काढायचा?

१ मी व माझे यजमान डॉ श्रीनिवास यांचे सर्व पॅरामीटर्स कडुनिंब व हळद अर्काच्या सेवनाने नॉर्मल झाले. 
२ ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होता तो दोन दिवसात कमी झाला व ते धोक्याच्या बाहेर आले. 
 ३ *कडुनिंबाची पाने उपलब्ध नसल्यास किंवा रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती असल्यास कडुनिंबाच्या व curcumin longa च्या गोळ्या chemist कडे उपलब्ध असतात.*

वैद्य कानिटकरांच्या म्हणण्या प्रमाणे आपण जर रोज १० कडुनिंबाच्या पानांचे सेवन केले तर कोरोना पासून लांब राहू व संसर्ग झाला तर ४० कडुनिंबाची पाने सकाळी सेवन केल्यास या रोगाच्या प्रादुर्भावातुन मुक्त होऊ. 
आपण वैज्ञानिक दृष्ट्या ही गोष्ट सिद्ध झाली असे म्हणू शकत नाही, पण आत्तापर्यंतच्या अनुभवाने त्याला दुजोरा मिळतो असे आपण म्हणू शकतो. शिवाय झालाच तर फायदा पण नुकसान काही नाही. आमचा असा दावा नाही की यांनी सर्वांना कोरोनापासून लगेच मुक्ती मिळेल. परंतु बिन पैशाचा आणि हजारो वर्षांचा अनुभूत योग असल्याने करून बघितला तर झालं तर फायदा व नुकसान काही नाही. 
कडुनिंब आणि हळदीचा अर्क हे कोरोना संबंधीच्या तक्रारी दूर करून या विषाणूच्या संसर्गातून बाहेर पडायला मदत करतील अशी अपेक्षा आहे. प्रयत्न करणे आपली हाती आहे. तो आपण करूया.  
 
आम्हाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही मार्गदर्शना करीता कधीही फोन करू शकता.आपल्याजवळ असलेल्या उपचार डॉक्टरशी आपला सम्पर्क करून दिला जाईल. एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर तस आम्हाला कळवा. आपल नाव, पत्ता, फोन क्रमांक द्या. आणि या देशहिताच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. 
 
जय हिंद. जय भारत. 
आपले कार्यकर्ते 
*अकल्पित परांजपे ९३२२२६४८१५* नवी मुंबई, पनवेल 
रश्मी जोशी ९८१९५९९८५१ दक्षिण मध्यमुंबई
*मिलिंद कोतवाल ९८३३०५१५६७ ठाणे* 
श्रीनिवास परांजपे ९८६९०५१५४६ नवी मुंबई, पनवेल 
*उदय वैद्य ९८२१०६३४४० कल्याण डोंबिवली 
नीलम वैद्य ९८३३०२९१९२ कल्याण डोंबिवली* 
विजया दुनाखे ९८६०३१८६९८ लातूर 
*रविंद्र रघुवंशी ९९३००२००१६ पश्चिम मुंबई*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...