*मिळालेल्या शरीराचे रूप,*
*आपल्याला काही बदलता येत नाही.*
*पण अवगुण टाकून,*
*चांगले गुण अंगी बाणता येतात.*
*मुर्खपणा सोडायचे म्हंटले,*
*तर सोडता येते.*
*आणि शहाणपण शिकायचे म्हंटले,*
*तर शिकता येते.*
*अभ्यास केला तर सर्व काही ध्यानात येते,*
*म्हणून जो दुसर्याला सुखी करतो,*
*तो स्वतः सुखी होतो.*
*पण जो दुसर्याला कष्ट देतो,*
*त्यास पुढे कष्ट भोगावे लागतात.*
*आपल्या शहाणपणाने,*
*जो जगाला सुखी करतो.*
*तो खरा भाग्यवान पुरूष होय.*
*म्हणून माणसाने जगाच्या उपयोगी पडावे.*
*अज्ञानी जगाला,*
*सज्ञान करावे...*
*आणि जीवनामध्ये,*
*भगवंताचे नामस्मरण,*
*नाम संकीर्तन,*
*नाम चिंतन नाम साधनात,*
*आयुष्य घालवले पाहिजेत.*
*जो देश काळ प्रसंग जाणतो,*
*दुसर्याचे अंतःकरण ओळखतो,*
*अशा चतुर पुरूषाला,*
*जगात कुठेही काहीही कमी पडत नाही.*
*हे अगदी सत्य आहे...!!*



*काय मागावे व कधी मागावे,*
*हे प्रत्येकाला कळतेच असे नाही.*
*तो कदाचित...*
*त्याचा हक्क म्हणूनही मागत असेल.*
*मात्र एक गोष्ट नक्की,*
*मागूनही प्राप्त झालं नाही की,*
*माणूस नक्कीच नाराज होतो.*
*परंतु मागणी मान्य झाली की,*
*खुश होतो....*
*आणि न मागताच प्राप्त झालं की,*
*खूपच खुष होतो...*
*जो दुसऱ्याच्या मनाचा विचार करून,*
*त्याला खुष ठेवण्याचा प्रयत्न करतो,*
*तो नेहमीच खुषीत असतो.*
*असे म्हटले जाते की,*
*जो माणूस एखादयाला,*
*संकटात आणण्यासाठी पुढाकार घेतो,*
*तेव्हा त्याचे असलेले चांगले कर्म,*
*परमेश्वर झीरो करून टाकतो.*
*मात्र जो माणूस..*
*संकटात पडलेल्या माणसांना मदत करतो,*
*त्याला संकटाच्या वेळी परमेश्वर,*
*कोणत्या ना कोणत्या रूपाने/,*
*मार्गाने निश्चितच मदत करतो.*
*कोणताही शब्द निवडताना,*
*खूपच काळजी घ्यावी लागते.*
*शब्दांची निवड चुकली की,*
*अर्थाचा अनर्थ होतो.*
*तसेच माणसाच्या निवडीचे आहे.*
*या निवडीला खूप म्हणजे,*
*खूपच महत्व आहे.*
*कारण...*
*ही निवड म्हणजे...*
*आयुष्यभराची साथ असते.*
*त्यामुळे ती निवड एकदा चुकली की,*
*पूर्णपणे आयुष्यच बिघडते...!!*



No comments:
Post a Comment