*
सवयी बदला व कोरोना टाळा
*
*1) आपण कोणत्याही दुकानात, दवाखान्यात गेल्यावर तेथील कोणत्याही वस्तूला बिनाकारण स्पर्श करू नका. आपली कोणतीही वस्तू म्हणजे मोबाईल, चाबी, चष्मा तेथिल टेबल, खुर्ची, फर्निचर वर ठेऊ नका याच्याने कदाचित कोरोना तुमच्या बरोबर घरी येऊ शकतो.*
*2) बिना कारण कोणाच्या गाडीवर बसू नका, वा गाडीला म्हणजे आरसा, हॅन्डलला हात लावू नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.*
*3) बऱ्याच लोकांना गप्पा मारतांना हाताची टाळी मारणे, खांद्यावर हात ठेवणे अशी सवय असते याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.*
*4) ऑफिस मध्ये एकाच वेळी जेवायला बसला असाल तर शक्यतो कोणाचाही डब्बा शेअर करू नका. आपला डब्बा आपणच खा. एकाच पाण्याच्या बाटलीने सर्वांनी पाणी पिऊ नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.*
*5) ऑफिस, बँक मध्ये फॉर्म भरतांना कोणाचाही पेन मागू नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.*
*6) कोणत्याही परिस्थितीत हात स्वच्छ धुतल्याशिवाय तोंडाला, नाकाला, डोळ्यांना स्पर्श करू नका.*
*7) बिना कारण घराबाहेर जाऊ नका. घरात तुंम्ही एकटे नाही आहात तुमच संपूर्ण कुटुंब आहे त्यात सर्व वयो गटाचे व्यक्ती आहेत. प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती वेग वेगळी असते हे पण लक्षात ठेवा.*
*8) कोरोना आपल्याला होणारच नाही ह्या भ्रमात राहू नका सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांच तंतोतंत पालन करा.*








No comments:
Post a Comment