Saturday, November 12, 2022


*🌹प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाने फळ मिळत असते*🙏

*🌺 कर्म व त्याचे परिणाम, कर्माचे परिणाम हे मानवालाच नव्हे, तर पशुपक्ष्यांनाही भोगावे लागतात. इतकेच नव्हे, तर देव, योगी, सिद्ध कोणीही कर्माच्या परिणामापासून, पळवाट काढू शकत नाही...!!!*

*🌺 पुष्कळवेळा सत्पुरुष, कर्माचे परिणाम हे आपल्या सोयीनुसार भोगतात; परंतु कर्माचे परिणाम कोणालाही टाळता येत नाहीत...!!!*

*🌺 पूर्वजन्मातील सत्कर्मांमुळे, माणसाला वैभव, ऐश्वर्य, कीर्ती, मानसन्मान, यश, इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. मानवाजवळ जेव्हा या गोष्टी असतात, तेव्हा त्याने हे सर्व आपल्या पूर्वजन्मींच्या सत्कर्मांचे फळ आहे, याची जाणीव ठेवा...!!!*

*🌺 पुढील जन्माची बेगमी करून, ठेवायला हवी. सर्व प्रकारच्या दुर्व्यसनापासून दूर राहायला हवे. जर असे केले नाही, तर पूर्वजन्मींच्या सत्कर्मांमुळे, प्राप्त झालेली पुण्याई संपून जाते, व माणसाला दुर्बुध्दी होऊ लागते, व अधोगतीच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो...!!!*

*🌺 पुण्याईच्या बळावरच मनुष्य मृत्यूनंतर दिव्य लोकात प्रवेश करतो. पुण्य इहलोकी सुख देते, व मृत्यूनंतर दिव्य लोकात प्रवेश प्राप्त करून देते. माणसाचे सत्कर्मच माणसाला मदतनीसाच्या रूपाने उभे राहते, वाटाड्याच्या रूपाने उभे राहते, देवाच्या रूपाने उभे राहते...!!!*

*🌺 मनुष्य हा कुटुंबवत्सल असल्याकारणाने, कुटुंबातील अनेक माणसांचे प्रारब्ध एकत्रित होऊन, घराण्याचे प्रारब्ध तयार होते,व संपूर्ण घराण्याला चांगल्या वाईट कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. हे लक्षात ठेवून कुटुंबातील प्रत्येकाने चांगली कर्मे करून, घराण्याच्या प्रारब्धाचा तोल सांभाळणे, अतिशय आवश्यक असते...!!!*

*🌺 घराण्यातील माणसे जर बरोबर वागली नाहीत, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण घराण्याला भोगावे लागतात. स्वार्थी, कंजूष व स्वतःपुरतेच जगणाऱ्या माणसाच्या पोटी, जी संतती निर्माण होते, ती कमनशिबी असते. अशा संततीला दारिद्रय, व अपयश भोगावे लागते, व ही परंपरा पुढे अनेक पिढ्या चालत राहते...!!!*

*🌺 याकरिता मानवाने कोणत्याही प्रकारच्या वैभव प्राप्ती झाल्यानंतर, सत्कर्मे करण्याचे कधीच सोडू नये. सतत सत्कर्मे करीत राहिले पाहिजे. परोपकार व जमेल ते दानधर्म करून, पुण्य मिळवीत राहायला पाहिजे. आपणास जमेल तसे जप व ध्यान करून, आपण ईश्वराच्या जवळ जाण्याचा, प्रयत्न केला पाहिजे...!!*🙏🏻🌹🙏🏻



🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...