मित्रांनो.... इतकं मनमोकळं जगा जोपर्यंत मृत्यू तुम्हाला कवटाळत नाही... व्हा साऱ्या ताणतणावापासून मुक्त.. विसरून जा त्या सगळ्यांना ज्यांनी तुम्हाला तुमच्याआयुष्यात काही दुःख दिलंय... गरज नाही कोणाशी बरोबरी करण्याची... जगात परमेश्वराने मुबलक प्रमाणात प्रत्येकाला काही ना काही दिलंय.. क्षमा करा अथवा माफी मागा त्या सर्वांची... कुठे जायचंय हा अहंकार आणि गर्व घेऊन ...जगायला आयुष्य थोडच राहिलय ....बिघडलेल्या नातेसंबंधांना तंदुरुस्त करा...ज्याने तुमचं काही वाईट केलं असेल तर ,वरचा "तो" त्याचा ताळेबंद मांडायला समर्थ आहे.. तुम्ही मस्त आनंदात जगा.. जग काय म्हणेल याचा तुम्ही विचार करत बसला तर जगाला तुम्हाला काय म्हणायचे ते त्या- जगासाठी सोडून द्या आपल्या सारे नाद छंद मनापासून पूर्ण करा.. विसरा जगाला.. विसरा समाजाच्या निती नियमांना.।. जगात वीस वर्षांचा म्हातारा ही आहे आणि 90 वर्षाचा तरुण देखील..। सख्या सोबत्यांना भेटा...




No comments:
Post a Comment