द् काश्मीर फाईल्स विषयीची ही पोस्ट.... अभिषेक माळींची .....मुद्दाम इथं फारवर्ड... केली... सत्यशोधनासाठी...
सिनेमा आणि सिनेदिग्दर्शक.... सिनेमा हा इतिहास नसतो... तरी.... सिनेमा च्या आत काय दडलंय पहा...
-प्रेमानंद गज्वी
११ तारखेला दि काश्मीर फाईल्स म्हणून चित्रपट येतोय.
हा चित्रपट पाहण्यापूर्वी काही ऐतिहासिक तथ्ये जी कोणीही नाकारू शकणार नाहीही तत्थ तपासली तर भाजपची लबाडी आणि प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची गलिच्छ वृत्ती नक्की समजेल आर्थात जो स्वतःची अक्कल वापरेल त्यालाच ते कळू शकत
काश्मिरी पंडितांचे जबरदस्तीने विस्थापन झाले १९ जानेवारी १९९०ला सुरू झाले. ते मार्च १९९० पर्यंत सुरूच होते.
तेव्हा तिथं राष्ट्रपती राजवट लागू होती, म्हणजेच राज्य सरकार बरखास्त करण्यात आलं होतं आणि सर्व कारभार केंद्र सरकारच्यावतीने नियुक्त गव्हर्नर जगमोहन मलोहत्रा पाहत होते. सैन्य जानेवारीतच तैनात करण्यात आलं होतं. सप्टेंबर १९९०ला अफस्पा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट) लावण्यात आला. याच तत्कालीन गव्हर्नर जगमोहनना नंतरच्या काळात भाजपकडून चार वेळा (१९६, १९९८-९९ आणि २००४) लोकसभेची उमेदवारी देण्यात आली, त्यात त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांविरुद्ध निवडणुका लढवल्या. प्रधानमंत्री वाजपेयींच्या एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मिनिस्टर (१९९९-२००४) बनविण्यात आलं. शहर विकास आणि पर्यटन मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे होता.
केंद्रामध्ये प्रधानमंत्री प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांचं जनता दलाचं सरकार होतं. त्या सरकारला भारतीय जनता पक्षाने समर्थन दिलेलं होतं. त्यांच्या पाठिंब्यानेच ते सरकार स्थापन झालेलं होतं. काश्मिरी पंडितांचे जबरदस्तीने विस्थापन झाल्यावरही भाजपचा केंद्र सरकारला पाठिंबा कायम होता, जो त्यांनी नोव्हेंबर १९९०ला अडवणींना बिहारमध्ये रथयात्राप्रकरणी अटक झाल्यावरच काढून घेतला. म्हणजेच काश्मिरी पंडितांचे जबरदस्तीच्या विस्थापनाविरोधात गप्प बसणारा भाजप त्यावेळी मंदिर-मशीद राजकारणात लोकांना भडकवत होता.
काश्मीरमध्ये तणाव निर्माण होण्यामध्ये एका घटनेचा महत्वाचा भाग होता. ती घटना म्हणजे मुफ्ती मुहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईद हिचं जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट संघटनेच्या इस्लामिक दहशतवाद्यांकडून अपहरण. मुफ्ती मुहम्मद सईद त्यावेळी व्ही पी सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांच्या मुलीच्या अपहरणामुळे केंद्र सरकारवर दबाव आणून पाच आतंकवाद्यांना सोडायला भाग पाडण्यात आलं. ह्या अतिरेक्यांना सोडण्यात आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी हजारोंचा जमाव जमलेला. ह्याच मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या दुसऱ्या कन्येसोबत म्हणजे डॉ रुबिया सईदची बहीण मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी(पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी)सोबत युती करून भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये २०१६-१८ सत्ता उपभोगली आहे.
थोडक्यात: काश्मिरी पंडितांचे इस्लामिक दहशतवाद्यांकडून जबरदस्तीनं विस्थापन होत असतांना केंद्र सरकारमध्ये सामील असणाऱ्या आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या भाजपनं कारवाईसाठी दबाव आणला नाही. उलट त्यावेळी गव्हर्नर असलेल्या जगमोहनना नंतरच्या काळात मंत्रिपद देऊन त्यांचा गौरव केला. तणावाला कारणीभूत असणाऱ्या मुफ्ती सईद यांच्या पक्षाशी युती करून सत्ता उपभोगली.- अभिषेक माळी
No comments:
Post a Comment