Saturday, November 12, 2022

एसटी कामगारांचा संताप व संप..!

*आपणास माहीत आहे का..???*


*एसटी कामगारांचा संताप व संप..!*

*मुद्दा क्र 1*
        2014 पासून दिवाकर रावते परिवहनमंत्री झाल्यावर ते आतापर्यंत प्रत्येक तिकिटामागे 1 रुपया अधिभार लावला जातोय दररोज किमान 65 लाख प्रवासी प्रवास करतात आणि गणित असे असते बघा.
6500000 x 365 x 7 वर्षे
डोके फिरण्याची वेळ आली ना.. ? आता विचार करा.. कुठल्या योजनेत हा सर्वसामान्य जनतेकडून वसूल केलेला पैसा खर्च केला गेला.. ? कोणाच्यातरी नावाने सुरू केलेली योजना दाखवतील. मग त्या योजनेचा किती जनतेला लाभ झाला.. ?

*मुद्दा क्र 2*
        तसेच 1992 पासून मृत्यूफन्ड म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 40 रुपये आता ते 45 रुपये कापले जातात, आपण 40 रुपये धरूया, पहा त्याचं गणित.
40 x 12 = 480 रुपये असे 29 वर्षे 13920 रुपये प्रत्येक कामगाराच्या पगारातून कापले गेले व जाताहेत, आपण 14000 रुपये समजुयात. किमान 100000 कामगार आहेत असं धरलं तर
100000 x 14000=1400000000 रुपये
गरगरलं ना डोकं.. ? किती कामगारांना मृत्यूनंतर लाभ मिळाला, किती कामगारांची कर्जे मृत्यूनंतर माफ झाली (कर्जे माफ होत नाहीत PF मधून व मृत्यू फंड मधून वसुली केली जातात)

*मुद्दा क्र.3*
        राज्य सरकारचा डिझेलवर प्रति लिटर ३५/- रू. व्हॅट आहे. दिवसाला एसटी महामंडळाला कोट्यावधी लिटर डिझेल लागते. त्यावर सरकारच्या तिजोरीत अब्जावधी रूपये जमा होत असतात. 

*मुद्दा क्र. 4*
        तसेच प्रत्येक प्रवाशाने काढलेल्या तिकिटावर सरकारचा १७.५% प्रवासी कर आहे. म्हणजे कंडक्टर ने  १ रू. चे तिकीट फाडले की १७.५ पैसे  प्रवासी कर सरकारला मिळतो. शंभर रूपयाचे तिकीट असेल तर १७.५ रू. कर सरकारला मिळतो..!

*मुद्दा क्र. 5*
        या व्यतिरिक्त रोड टॅक्स (वाहन कर) सरकारला मिळतो तो वेगळाच. १४,५०० गाड्या × वाहन कर =  करून बघा ! जागे व्हा.

*मुद्दा क्र. 6*
        एसटीची आर्थिक कागदपत्रे पहा. जमेची बाजू 96651.4 कोटी तर खर्चाची बाजू 104671.7 कोटी आहे. अर्थातच तोटा आहे आणि तो 8020.3 कोटी आहे. झाले तर मग एसटी तोट्यात आहे! पण तोट्यात जाताना खर्चाच्या बाजूला काय काय आहे ते पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की प्रवाशी कर,टोल व घसारा या शीर्षाखाली किती पैसे आहेत. प्रवाशी कर 11524.8 कोटी आहे, टोल 1541.7 कोटी आहे आणि घसारा 3315.1 कोटी आहे. हे तिन्ही आकडे एकत्रित घेतले तर सुमारे 16381.5 कोटी होतात. आता हे आकडे वेगळे का घेतले? तर घसारा हा काय कुणाला प्रत्यक्ष द्यायला लागत नसतो. समजा एका गाडीची पहिल्या दिवसाची किंमत अमूक रु. आहे. तर तिचे आयुष्य ठरलेले असते आणि त्यानुसार घसारा दरवर्षी खर्चाच्या बाजूला येत राहतो. म्हणजे प्रत्यक्षात पैसे कुणाला द्यायला लागत नाहीत. मात्र मालमत्ता त्या प्रमाणात कमी होत जाते. शिवाय एखाद्या वस्तूचे आयुष्य संपले किंवा मालमत्तेत तिची किंमत शून्य झाली तरी वस्तू वापरात असू शकते. उदा.फर्निचर,इलेक्ट्राॅनिक वस्तू(कम्प्युटर वगैरे).

*मुद्दा क्र.7*
       आता टोलकडे येऊ. मुळात रस्ते, इथल्या सामान्य माणसाच्या वतीने सरकारच्या मालकीचे आहेत. म्हणजे खरं तर सामान्य माणसाची मालकी रस्त्यांवर आहे. सरकारने आपले नाकर्तेपण लपवण्यासाठी रस्ते बिल्डरांना दिले. हे जे बिल्डर आहेत, ते कोणी साधू महात्मे नाहीत. ते व्यावसायिक आहेत. त्यांनी पैसा कमवण्यासाठीच ही कंत्राटे घेतली. रस्ते बनवून दिले आणि टोल वसुलीचे हक्क मिळवले. त्यांनी लावलेल्या पैशाच्या कितीतरी पट पैसा टोलमधून वसूल होतो. तो त्यांच्या हुशारीचा,अकलेचा, धाडसाचा आणि व्यवसायाचा तकाजा आहे. पण रस्ता सरकारचा आहे. सरकार सामान्य माणसाचे आहे. व्यावसायिकाने आपल्या आर्थिक फायद्यासाठी सरकारकडे करार करून काम मिळवले आहे. तर मूळ मालकाकडून टोलची वसुली का केली जाते? "तू असशील मूळ मालक. रस्ता तुझाच आहे. पण मला टोल दिल्याशिवाय तू रस्त्यावर येऊ शकणार नाहीस!" ही तर चक्क धमकी झाली! माझीच मोरी पण मुतायला चोरी! एसटी नावाच्या सरकारी सेवेला टोलच्या जिझियातून मुक्ती मिळाली पाहिजे. आमदार, खासदार, मंत्री वगैरे लोकांना टोलमुक्ती कशासाठी? एसटीचा प्रवास टोलमुक्त व्हायला हवा. त्यामुळे एसटीचे हजारो कोटी रुपये वाचतील. त्यातूनही कर्मचा-यांना द्यायला कांही पैसे उपलब्ध होतील.

*मुद्दा क्र. 8*
       एसटी साठी तकलादू व बोगस स्पेअर पार्टस पुरवठा करणारे ठेकेदार कोण आहेत..? ड्रायव्हर सीट पासून प्रवासी सिट्सची अवस्था काय असते..? दोरी बांधून जोडलेले पत्रे, पावसाळ्यात कोसळणारे पाणी, मोडक्या तुटक्या खिडक्या, याला कोण जबाबदार आहेत..? व ही कोणत्या प्रकारची सेवा आहे..? हेडलाईट्स विरहित, स्टेपनी टायर विरहित वाहने ड्रायव्हर च्या ताब्यात दिली जातात, या पापाचे धनी कोण आहेत..? वारंवार डिझेल तुटवड्यामुळे काही महत्वाच्या फेऱ्या रद्द केल्या जातात, रस्त्यावर रात्री अपरात्री एसटी बंद पडते, अशावेळी ड्रायव्हर कंडक्टर सह प्रवाशांचे जे हाल होतात त्याला कोण जबाबदार असतो..? 
            
*मुद्दा क्र.9*
            एसटी च्या गाड्या खटारा असल्याचे सिद्ध करून शिवशाहीच्या नावाने स्वतःच्या खाजगी बसेस भरमसाठ भाड्याने एसटी कडे देणारे शिवशाही पुरवठादार कोण आहेत..??? एसटी कामगारांना रोजंदारी वेठबिगारी पद्धतीने भिकेला लावून एसटीच्या नफ्यावर कोण माजले आहेत..? ते जनतेला कळूदे...! एसटीचे परिवहन मंत्रालय ताब्यात पाहिजे, एसटी चे सर्व ठेके पाहिजेत..! एसटी चे सर्व कर पाहिजेत..! एसटीचे सर्व फायदे पाहिजेत..! मग एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्याची जबाबदारी सुद्धा घ्यावीच लागेल, 

*मुद्दा क्र.10*
            एसटीकडे अवाढव्य जमीन आहे. तिथे काॅम्प्लेक्स वगैरे उभारता येऊ शकतात. तालुक्याच्या ठिकाणी बरीच सरकारी कार्यालये खाजगी जागेत आहेत. एसटीच्या स्थानकाचे नियोजनबद्ध बांधकाम झाले, तर ही कार्यालये त्या जागेत स्थलांतरीत करता येतील. स्टॅन्डवर उतरुन पुन्हा दुस-या ठिकाणी जायला नको! शिवाय सरकारी खात्यांची बिले नीटपणे येत राहतील किंवा adjust होत राहतील. त्यातूनही तोटा कमी होत जाईल. महाराष्ट्र सरकारच्या एकूण बत्तीस महामंडळांपैकी एकतीस महामंडळे वेतन आयोगाप्रमाणे वेतन घेतात. सर्वांत श्रीमंत असलेल्या सिडको महामंडळाला कांही श्रीमंत आहे, म्हणून वेतन आयोगापेक्षा जास्त पगार नाहीत! मग सतत सेवेत असणा-या एकट्या एसटी महामंडळालाच वेतन आयोगाच्या कक्षेत का आणायचं नाही? त्यांनी सामान्य माणसाला दिलेल्या व नेहमी देत आलेल्या सेवेचा विचार करा आणि त्यांना वेतन आयोगाच्या कक्षेत आणा. 

*आता याचा सारांश पहा..!*
        सामान्य माणूस अजूनही एसटी कर्मचा-यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेला दिसत नाही. त्याने एसटी बंद पडल्यानंतर काय होईल, याची कल्पना करून पाहावी. एसटी नसेल तर प्रवास आपल्या आवाक्यात राहणारच नाही. आजचा पाचशेचा प्रवास एसटी नसेल तेव्हा दोन हजाराचा होईल. एसटीच्या स्टॅन्डवर किमान सावली असते. ऊन पाऊस यांच्यापासून संरक्षण असते. खाजगी गाडीसाठी तुम्ही किती वेळ उघड्यावर थांबणार? समजा एखादी गाडी मुंबईस जाते आहे. तर आपण मधल्या स्थानकांवर एसटीने सहज जाऊ शकतो. पण खाजगी गाडीने नाही! कारण एसटी सेवा आहे, ती नेईल! पण खाजगी व्यवसाय आहे, त्याला अधिक भाडे देणारा हवाय! आपल्यामध्ये आता कुठे ग्रामिण भागातल्या शिक्षणाला वेग आलाय. त्याच्या पाठीमागेही एसटीच आहे. उद्या सवलतीचे पास बंद झाले, तर अर्धी मुले काॅलेज सोडतील! परवडणार आहे का आपल्याला? परवडणार आहे का महाराष्ट्राला? मानापमान, पैशाची सहज न होणारी उपलब्धता, युनियनच्या अविवेकी मागण्या आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची घाणेरडी वृत्ती या सर्वांना टाळून एसटी वाचली पाहिजे. एसटीचा कामगार वाचला पाहिजे. पैसा सहज उपलब्ध होत नाही. होणार नाही. मोजक्या उद्योगपतींना नऊ लाख करोड की काय ते एनपीए करून माफ करणारे लोक याच देशात राहतात. हाच देश चालवतात. तोच देश, त्याच देशाच्या बॅन्का एवढी जमीन बाळगणा-या एसटीला कर्ज का देऊ शकत नाहीत? का एसटी पण  विकायची आहे? प्रत्येक गावातून पुढाऱ्यांच्या खाजगी बसेस धावताहेत पण हे नुकसनीतील मार्गावर बसेस चालवणार नाहीत, तेथे मात्र ST हवी, सरकार जेष्ठ नागरिकांना , विध्यार्थी , पत्रकार, आमदार, खासदार याना  बसच्या  भाड्यात सवलत देते हा भार ST वर का..? खाजगी बसेस ला हे लागू नाही..? विचार करा ST बंद झाली तर सर्वसामान्यांना प्रवास करणे अवघड होईल.
        खरे पहाल तर एसटी च सरकारला पोसत असते, सरकार एसटी ला पोसत नाही. तरीही एस टी तोट्यात ? कमाल आहे. 
एसटी हे सर्वात मोठे महामंडळ व सर्वात मोठे कुरण आहे.
        अजूनही अशी बरीच कांडे आहेत म्हणून ही अंडी देणारी कोंबडी स्वतःकडे संभाळण्यासाठी नकोय, तर ती दुसऱ्याकडे ठेवून स्वतःचे नियंत्रण दाखवून ओरबाडून लुटायला हवी आहे. म्हणून सत्ताधारी राज्यकर्त्यांना एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण नको आहे. पण काळ बदलला आहे..! एसटी नफ्यात आहे की तोट्यात आहे हे एसटी कामगार पूर्ण ओळखून आहेत, लुटीचे अर्थसंकल्प एसटी कामगारांनी पाहिले आहेत. म्हणून कर्मचारी जागृत होऊन एकजूट झाला आहे. जिवंतपणी मरणयातना सोसलेला कर्मचारी आता मरणासही घाबरत नाही, शासनास नमावेच लागेल, एसटी चे विलीनीकरण करावेच लागेल..!

*कृपया सर्व ग्रुपवर टाका सर्व सामान्य जनतेला माहीत व्हायला हवं*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...