*एसटीचे राज्य शासनात विलीनकरण झाल्यास जनतेचा होणारा फायदा*
*17% प्रवाशी कर रद्द होईल.* हा राज्य शासनाचा कर आहे. एसटीला फायदा होवो की न होवो प्रत्येक तिकिटामागे 17% कर हा सरकारला द्यावाच लागतो. या नंतर शिल्लक राहिलेला नफा हा एसटीचा असतो. हा कर रद्द झाला तर शंभर रुपयांमागे सतरा रुपयांनी तिकिटाचे दर कमी होतील. मात्र खाजगी वाहनांना असा कर द्यावा लागत नाही.
*एसटीला टोल टॅक्स द्यावा लागणार नाही म्हणजेच एसटीचे वर्षाला 3500 कोटी रुपये वाचतील.* खाजगी वाहनाप्रमाणे एसटी देखील टोल टॅक्स, रोड टॅक्ससह सर्व प्रकारचे कर भरते. एसटीला फुकट काहीही मिळत नाही. उलट एसटी बस अल्पवयीन मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी यांना प्रवासी तिकिटात घसघशीत सवलत देते.
*डिझेल वरील कर जो की महाराष्ट्र सरकारचा 27% आहे तो रद्द होईल.* एसटीच्या 17000 बसेससाठी 10 रुपये प्रति लिटर इतकी जरी डिझेल सबसिडी मिळाली तरी एसटीला वर्षाला सुमारे 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त फायदा होईल.
*वरील सर्व पैसा वाचला म्हणजे तिकीट दरात जवळपास 40% कपात होऊ शकते.*
*म्हणजेच जिथे 100 रुपयाचे तिकीट आहे तिथेच 60 रुपयेच द्यावे लागतील.*त्यामुळे प्रवासी मायबाप जनतेचा या महागाईच्या काळात एवढा पैसा वाचणार असेल तर, आपणही आपल्याला जमेल त्या प्रमाणे शासन दरबारी ही गोरगरीब जनतेची हक्काची असलेली एसटी चालू रहावी यासाठी आवाज उठवला पाहीजे.
*एसटी बससेवा राज्य शासनात विलीन करण्यासाठी हातभार लावावा आणि आज एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरून जो लढा लढत आहे त्या लढ्याला पाठिंबा द्या.*प्रवाशी बांधवानो आज जर आपली ही लालपरी वाचली नाही तर खेडपाड्यातील जनतेचा विविध शहराशी असलेला संपर्क तुटेल आणि आणि भविष्यात होणाऱ्या विकासपासुन सुद्धा आपण खूप लांब राहू.
कारण ही एसटी म्हणजे फक्त एक दळणवळणाचे साधन नाही तर महाराष्ट्रातील 12 कोटी गोरगरीब जनतेचे एक हक्काचे वाहन आहे. त्यामुळे हे काहीही करून एसटी टिकलीच पाहिजे. कारण खेड्यातील प्रत्येक व्यक्ती स्वतःची चारचाकी गाडी घेऊ शकत नाही.
त्यामुळे यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा जेवढा फायदा आहे तेवढाच फायदा सर्व सामान्य जनतेचा पण आहे.
सध्या कर्मचाऱ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनामुळे, आम्ही ज्या प्रवाशांना आमचे दैवत मानतो त्या सर्व जनतेचे नक्कीच हाल होत आहेत, त्यांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळं एक लाख एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेची माफी मागत आहोत.
*कृपया करून एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना एक माणूस म्हणून माणुसकी या नात्याने समजून घ्या.*





No comments:
Post a Comment