Saturday, November 12, 2022

--चिंतन--


*देवा तुझी लिला अगाध आहे.........रे*

*काय गंमत आहे बघा जगण्याची. माणसांमध्ये आपलं वैभव दाखविण्याची जणु स्पर्धाच लागली होती.*

*लग्नसमारंभ....*

*लाखो , करोडो रुपयांचा चुरा. लग्नात मोठमोठ्या राजकारण्यांचे आशीर्वाद . चमकदार देखावे. तुरे असलेले शेकडो फेटे , डीजेचा धिंगाणा तर विचारुच नका. मादक पेयांचा महापुर , जेवणातले विविध पदार्थ , त्यात अन्नाची प्रचंड नासाडी, विजेची रोषणाई. महागडे कपडे , दागदागिन्यांचं प्रदर्शन आणि श्रीमंतीचा माज काही आगळाच. बरं , यात गरीबही मागे नव्हते . कर्ज काढणं का होईना पण लगीन....थाटातच. आणि अशाच थाटापायी शेकडो कुटुंब आर्थिकदृष्ट्या देशोधडीला लागली. बरं सृष्टीकर्त्याच्या दृष्टितुन ही बाब सुटते थोडीचं. आता बघा ना...माणसं तीही फक्त ५०...जास्तीचा गाजावाजा नाही. शांततेत लग्न सोहळे पार पडताहेत. आता जनावरं सोबतीला चालतील पण माणसं नको रे बाबा अशी अवस्था झालीय. सगळा झगमगाट गळुन पडला. मादक पेयाने झिंगणारी तरुण पिढी काही अंशी का होईना थोडी थंड पडलीय. ना गाजावाजा ना हजाराची लग्नपत्रिका. तरीही लग्न होताहेतच ना...आता गरीब..श्रीमंत सगळे एकाच मापात. माणसांना खाडकन जागं केलंस रे....कलियुगाचा अंत तर नाही ना....देवा?????*

*सत्यनारायण..,जागरण गोंधळ*

*हे तर आता जवळ जवळ लोप पावत चाललय जणु. लग्न झालं की सुरु झालं सत्यनारायण आणि जागरण गोंधळाचा धडाका. ब्राम्हणांनी कमवले पैसे आणि टेचित तुप भातावर ताव मारताहेत. आणि आम्ही आपलं कण्हत कण्हत जगतोय पिठलं..चटणी खाऊन. मला कधी कधी विचार पडतो जगातील प्रगतीपथावर असलेल्या देशात सत्यनारायण , जागरण , गोंधळ अशा धार्मिक भानगडीत शास्रज्ञ गुंतले तर मग शोध कोण लावणार. जपान , अमेरीका , चीन , जर्मनी यासारख्या देशात कुठ आहे असल्या बारा भानगडी. तरीही देश प्रगतीपथावर ...आपण मात्र आपलं तोकडं यश दाखविण्यात मस्तवाल...पण आता सृष्टीकर्त्याच्या पुढं काय......बसावं लागतय ना घरात...*

*वास्तुशांती..*

*घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.....आपण मात्र सिमेंटचा चंकुबा उभा करुन बंगला अस नाव देऊन मोकळे झालो. लाखो कोटींचे महाल उभे राहीले. लोकांना घरातलं चकचकतं सगळं दाखविण्याची प्रचंड स्पर्धा. लाखांचे बेड , लाखांचे बाथरुम , बापरे...काय रंगरंगोटी विचारु नका. प्रचंड मोठी घरं बांधली. लोकांना फक्त आपली फुशारकी दाखविण्याचा प्रयत्न म्हणुन .....काय तर वास्तुशांती...अरे घरं जेवढी मोठी झाली ना...तेवढी माणसं लहान झाली. मोठमोठ्या घरात माणसं मात्र हरवली. लाखाचं टॉयलेट बांधलं. पण सकाळी तंबाखु खाऊन , सिगारेट ओढुन , मशेरी लावुन , गरम पाणी पिऊन , लिंबु पाणी पिऊन तासनतास बसतय तरी पोट साफ होत नाही. कारण जिथं मन साफ नसतं तिथं पोट कधीच साफ होत नाही. रस्त्यानं चालता चालता जनावरं आपलं पोट साफ करतात.. त्यांना कुठं तंबाखु , सिगारेट, मशेरी ...लिंबुपाणी , गरमपाणी प्यावं लागतं...तुम्ही लाख कोटी खर्च करुन बंगले बांधा. हवेच्या गाद्या आणा पण झोपेचं काय...रस्त्यावर तंबुतलं पोरगं ढाराढूर झोपतंय....ना पंखा ना एसी....तरी कोणताच रोग शिवत नाही...इथं कोटीच्या घरात मलेरीया डेंग्युचं थैमान....काय भयान वास्तव आहे. आता सागळंच बंद...देखावा दाखवायचा कोणाला....राजकारणी लोकांना आणण्याच्या शर्यतीचं काय?,?*

*अंत्यविधी...दशक्रीया*

*एकदा असंच वाचनात आलं होतं की एका गावात एका पठ्ठ्यानं आईचं प्रेत सरणावर ठेवलं तरी पेटवुन द्यायला गडी तयार नव्हता. कारण तो म्हणत होता थांबा आमदार साहेब आल्याशिवाय अग्निडाग द्यायचा नाही...काय हा अतिरेक...लग्न ..इतर समारंभात भाई...दादा...नेते....साहेब मिरवायचे पण आता स्मशानभुमीचा पण ताबा घेतलाय बहादरांनी. समाज मोठेपणा मिरवण्यात कोणत्या थराला जाईल भरवसाच नाही. पण आता फक्त २०...तरी काही महाभाग बापाला घरी ठेवतील पण आईच्या मयताला साहेबांना बोलावतील भरवसा नाही रे बाबा...देवा आता तुच वाचव..*

*वाढदिवस....*

*आयुष्यातलं एक वर्ष संपलं...तो दिवस म्हणजे वाढदिवस. पुर्वी स्वतःलाच माहीत नसायचं आपण कधी झालो. पण आता एक नवीनच फॕड घुसलय टाळक्यात...वाढदिवस धुमधडाक्यात झाला पाहीजे. किलोकिलोचे केक....पार तलवारीने कापण्यापर्यंत मजल...छत्रपतींना सुध्दा हे पाहुन किळस वाटत असेल...कुठं माझा ताना..बाजीप्रभु....आणि आताचे हे आधुनिक मावळे. फेसबुक आणि व्हॉटसअॕपवर झळकण्यासाठी किती चढाओढ...पण आता तेही जवळ जवळ बंद होण्याच्या मार्गावर....*

*देवा तुझी लिला अगाध आहे...विज्ञानानं भयंकर प्रगती केली. पुर्वी पायात चपला नसायच्या तरी पायाला काटा रुतत नसायचा आणि आज पायालाच वात झोंबलाय तर घरातच चपला घालायची वेळ आलीय...मिक्सरचा गरगोट खाऊन किळस आली की काय..परत बायका पाटा वरवंटा शोधायला निघाल्यात. चुलीचा धुर नको म्हणणारे आता चुलीवरचं खाणं किती छान हे दाखवायला पुढं सरसावलेत. काम करुन करुन पोटं पाठीला चिकटलेली असताना कधीच सकाळीच उठुन पळायची वेळ येत नसायची. आता जो तो सकाळी सकाळी भल्या मोठमोठ्या ढेरी हालवत पळताना दिसताहेत...देवा तुझी लिला अगाध रे बाबा...ज्या घरात कोणता पदार्थ खायला निवडावा हा प्रश्न तिथं मात्र पोरांची वाणवा आणि रस्त्यावर तंबुत वर्षाला पाळणा हलतोय.*

*लोप पावत चाललेल्या सायकली पुन्हा बाहेर निघायला लागल्यात. लाखो करोडोच्या अलिशान गाड्या सोडून लोकं सायकलवर यायला लागलेत...खरंच देवा तुझी लिला अगाध आहे.. लाखो..करोडोची शहरात घरं असुनही आता खेड्यात फार्म हाऊस बांधायला निघालेत....*

*आज होळी....रंगांची उधळण....खरं तर वाईट विचारांची होळी करण्याची गरज असुन ..अहंमभाव रुपी रावणांचं दहन करुन माणुसकीच्या रंगाची उधळण करत जगण्याची गरज आहे.....खरंच देवा तुझी लिला अगाध आहे.....*

*होळी आणि धुळवडीच्या मनःपुर्वक शुभेच्छा......💐*

*लेखक....श्री. किसनराव बाजीराव पावडे-पाटील*
*शिक्षण निरीक्षक*
*बृहन्मुंबई महानगरपालिका*

*हा मेसेज स्वलिखित असुन आपण कॉपी पेस्ट केला तरी चालेल पण आवडला तर नक्कीच इतरांना पाठवा.....काय सांगावं....विचार बदलुही शकतील...पण खरंच देवा तुझी लिला अगाध आहे....धन्यवाद*

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹


*🌹प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाने फळ मिळत असते*🙏

*🌺 कर्म व त्याचे परिणाम, कर्माचे परिणाम हे मानवालाच नव्हे, तर पशुपक्ष्यांनाही भोगावे लागतात. इतकेच नव्हे, तर देव, योगी, सिद्ध कोणीही कर्माच्या परिणामापासून, पळवाट काढू शकत नाही...!!!*

*🌺 पुष्कळवेळा सत्पुरुष, कर्माचे परिणाम हे आपल्या सोयीनुसार भोगतात; परंतु कर्माचे परिणाम कोणालाही टाळता येत नाहीत...!!!*

*🌺 पूर्वजन्मातील सत्कर्मांमुळे, माणसाला वैभव, ऐश्वर्य, कीर्ती, मानसन्मान, यश, इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. मानवाजवळ जेव्हा या गोष्टी असतात, तेव्हा त्याने हे सर्व आपल्या पूर्वजन्मींच्या सत्कर्मांचे फळ आहे, याची जाणीव ठेवा...!!!*

*🌺 पुढील जन्माची बेगमी करून, ठेवायला हवी. सर्व प्रकारच्या दुर्व्यसनापासून दूर राहायला हवे. जर असे केले नाही, तर पूर्वजन्मींच्या सत्कर्मांमुळे, प्राप्त झालेली पुण्याई संपून जाते, व माणसाला दुर्बुध्दी होऊ लागते, व अधोगतीच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो...!!!*

*🌺 पुण्याईच्या बळावरच मनुष्य मृत्यूनंतर दिव्य लोकात प्रवेश करतो. पुण्य इहलोकी सुख देते, व मृत्यूनंतर दिव्य लोकात प्रवेश प्राप्त करून देते. माणसाचे सत्कर्मच माणसाला मदतनीसाच्या रूपाने उभे राहते, वाटाड्याच्या रूपाने उभे राहते, देवाच्या रूपाने उभे राहते...!!!*

*🌺 मनुष्य हा कुटुंबवत्सल असल्याकारणाने, कुटुंबातील अनेक माणसांचे प्रारब्ध एकत्रित होऊन, घराण्याचे प्रारब्ध तयार होते,व संपूर्ण घराण्याला चांगल्या वाईट कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. हे लक्षात ठेवून कुटुंबातील प्रत्येकाने चांगली कर्मे करून, घराण्याच्या प्रारब्धाचा तोल सांभाळणे, अतिशय आवश्यक असते...!!!*

*🌺 घराण्यातील माणसे जर बरोबर वागली नाहीत, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण घराण्याला भोगावे लागतात. स्वार्थी, कंजूष व स्वतःपुरतेच जगणाऱ्या माणसाच्या पोटी, जी संतती निर्माण होते, ती कमनशिबी असते. अशा संततीला दारिद्रय, व अपयश भोगावे लागते, व ही परंपरा पुढे अनेक पिढ्या चालत राहते...!!!*

*🌺 याकरिता मानवाने कोणत्याही प्रकारच्या वैभव प्राप्ती झाल्यानंतर, सत्कर्मे करण्याचे कधीच सोडू नये. सतत सत्कर्मे करीत राहिले पाहिजे. परोपकार व जमेल ते दानधर्म करून, पुण्य मिळवीत राहायला पाहिजे. आपणास जमेल तसे जप व ध्यान करून, आपण ईश्वराच्या जवळ जाण्याचा, प्रयत्न केला पाहिजे...!!*🙏🏻🌹🙏🏻



🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो..☘️🌺🙏

जिवन सुंदर तर आहेच तर ते जगाता आले पाहिजे व जगुन् दिले पाहिजे*🙏

*झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं.*

*मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, "काही त्रास नाही ना झाला ?"*

*सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा प्रयत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. काही क्षण असेच गेले.*

*आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, "झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?"*

*म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं. फुल म्हणालं,* *"निमिषार्धासाठी वाईट वाटलं. कारण झाडाशी, पानांशी,गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं. पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला.*

*जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा. कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं.*

*पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो. "*

*"तू आता स्वतंत्र झालास खरा पण आता तू क्षणा क्षणाला कोमेजत चाललायस. आता काय करणार ?" - मातीचा प्रश्न.*
 
*दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, "आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन.*

*वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन. मग एकेक पाकळ्या झडतील, देठा पासून तुटून पडेन. पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजा साठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या झाडा वर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !"*

*फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले.*

*काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली.*

*आपलं आयुष्यही असंच आहे. संसार कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं.*

*मग सुरु होतो एका जीवाचा एकाकी सफर, जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो.*

*आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.*

 *नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्प गुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो ! जीवन सुंदर तर आहेच पण ते अर्थपूर्णही आहे !*



🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🌻चांगले "कर्म" सिद्ध करावे लागत नाही, मन सर्व काही जाणते...!!!* 🌹🙏
       
*🍁आपल्या मनात आणि बाहेर जे काही घडत असते, त्यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही. जसे करावे तसे भरावे, जे देऊ तेच वाढवून मिळते, जे पेराल तेच उगवेल. हाच कर्म सिद्धांताचा आधार आहे. दहा ज्ञानेंद्रिये-कर्म इंद्रिये यांनी केलेल्या प्रत्येक कार्याची एक निश्चित परिणाम होतो, नाहक काहीही घडत नाही. कामाचे स्वरुप आणि गंभीरतेला अनुसरुन कर्त्याला प्रतिफळ मिळते. या प्राकृतिक विधानाकडे दुर्लक्ष केल्याने आपली सुख, शांती आणि समृद्धीची कवाडे बंद होतात. आपल्या कर्मासाठी अन्य कोणीही जबाबदार नसते. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळते...!!!*
           
*🍁दुसऱ्यांचा आदर करायचा की, तिरस्कार करायचा, त्यांना समाधान द्यायचे की, त्रास द्यायचा, त्यांना गरजेच्या वस्तू द्यायच्या की, त्यांच्याकडे असलेल्या वस्तू हिसकावून घ्यायच्या हा निर्णय आपला असतो. आपले कार्य किंवा व्यवहारामुळे इतरांवर काय आणि किती संकट ओढवेल, हे त्याच्या विवेकावर अवलंबून असते. प्रामाणिकपणा, प्रेम, आदर, दया उदारतेसारखे भाव सत्कर्म श्रेणीत येतात, त्यामुळे त्यांचा व्यवहार पूर्ण होतो. याउलट दुराचार, स्वार्थ, घृणा, प्रतिशोध, र्इष्या, वैमनस्य यामुळे दु:ख होते. चांगले कर्म किंवा प्रामाणिकपणा हा एक दृष्टीकोन आहे. हे ढोल वाजवून सांगता येत नाही...!!!*
           
*🍁चांगुलपणा एखाद्या मंचावर सिद्ध करावा लागत नाही, कारण सर्वात मोठे न्यायालय आपल्यातच सामावलेले आहे. घोषणा तेव्हांच केल्या जातात जेंव्हा चांगले व्यक्तीमत्त्व दाखवायचे असते. स्वत:ला सिद्ध करायचे असते. आत्मिक स्पष्टीकरण का द्यायचे. दिखावा आणि लंगूलचालन संशयास्पद निष्ठांचे द्योतक आहे. नामवंत लेखक अँड्रयू कार्नेगी यांच्या मते, कोणी आपली इतकी काळजी घेते की, त्याचे आकलन आपल्याला शब्दात नाही तर त्याचा व्यवहार आणि हावभावातून कळते...!!!*
         
*🍁सदाचारी व्यक्तींच्या सानिध्यात राहणे आणि त्यातून आपला परमार्थ साधणे हाच खरा सत्संग आहे. याचे फळ चांगलेच मिळते.याच्या विरूद्ध दुराचारी व्यक्तीच्या संगतीने चांगले फळ मिळत नाही. गत काळाचे आकलन केल्यास आपल्या लक्षात येईल की, ज्यांनी स्वार्थीपणे आपले जीवन व्यतीत केले, सगळ्यांच्या संमत्तीकडे दुर्लक्ष करत सर्व गोष्टी केल्या. इतरांच्या मतांचा अनादर केला, त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येत नाही. तिरस्कार, विद्वेश, शत्रुता, वैमनस्य, प्रतिशोधासारखे नकारात्मक भाव मनात साठवून ठेवल्यास कर्म सउधारत नाही. ज्याला योग्य आणि अनुकरणीय मानतो त्याच दिशेने आपण पुढे जातो...!!!*
    
*🍁जीवनात दिशा आणि दशेत सकारात्मक बदल न केल्यास हा कर्मफल सिद्धांताचा आशय नाही. योग्य निष्ठेने संपल्प करणे आणि मन त्या दिशेने जायला हवे. वर्तमानात ज्या मार्गावर आपण चालत आहोत, जर प्रामाणिकपणे त्याची समीक्षा केली आणि त्यात योग्य ते बदल केले तर कर्म सुधरते. यासाठी विचार, व्यवहार आचरण आणि सवयी बदलायला हव्यात, जे कठीण आहे, पण अशक्य नाही. मनाची अदेभूत इच्छा शक्तीचा उल्लेख करताना अमेरिकन लेखक नेरोलियन हिल म्हणतात, कोणताही हेतू किंवा विचार निष्ठेने मनात आणल्यास आयुष्यात हवा तो बदल होऊ शकतो...!!!*
  
*🍁कर्माचा मार्ग निवडणे महत्त्वाचे आहे. जो निवडण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. पण जो मार्ग निवडाल त्याच्यापासून दूर जाऊ नका. आज ज्या ठिकाणी तो संपला, उद्या त्याची सुरूवात तेथूनच करा...!!!*
                   


🌹☘️🌻🌹☘️🌻🌹☘️🌻🌹

*निसर्गात उमटलेला ध्वनि जसा प्रतिध्वनी होऊन आपल्याला परत ऐकू येतो, त्यानुसार आपल्या वास्तुमध्ये उच्चारलेला शब्द प्रतिध्वनी होऊन आपल्यावर काम करतो. म्हणून वास्तूमध्ये बोलताना अतिशय सांभाळून बोला, कारण वास्तुपुरूष नेहमी तथास्तू म्हणत असतो, ही आपली पूर्वापार श्रद्धा आहे आणि तसे घडतेही. याबाबत वास्तुशास्त्रज्ञ काही उपाय सांगतात...!!!*

*ज्या घरत सतत भांडणे होतात, नकारात्मक चर्चा होते, लोकांना नावे ठेवली जातात, त्या घरात नकारात्मक स्पंदने असतात. अशा वास्तूत आपल्याला जावेसेही वाटत नाही. यासाठी आपणही आपल्या घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करण्यासाठी अपशब्द टाळले पाहिजेत...!!!*

*सतत वाईट गोष्टी, उणिवा, अधुरी स्वप्न यांची चर्चा न करता सकारात्मक बोलत राहिले पाहिजे. जसे की, माझे सगळे चांगलेच होणार आहे, माझ्या घरात सुख शांती समृद्धी नांदणार आहे, माझ्या मुलांची प्रगती होणार आहे, आमचे दांपत्य जीवन आनंदात जाणार आहे, माझे आजार दूर होणार आहे, मी कर्जमुक्त होणार आहे, या सकारात्मक लहरींचा प्रभाव वास्तूवर होतो आणि या लहरी परिणामकारक ठरून घरातल्या सदस्यांना सकारात्मक ऊर्जा देतात...!!!*

*घरात स्वामी मंत्र, रामरक्षा मंत्र, गायत्री मंत्र, गणेश मंत्र इ. मंत्रांचे, स्तोत्रांचे मोठ्याने पठण करावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तूपुरुष आपल्याला सद्बुद्धी देऊन वाईट विचारांपासून दूर ठेवतो. तसेच बाजारात एक इलेक्ट्रॉनिक यंत्र मिळते. त्यावर मंत्रांचा अविरत जप सुरू असतो. ते यंत्र मंद आवाजात घरात लावून ठेवावे. आपल्याकडून नकळतपणे मंत्रजप होत राहतो आणि वाईट विचार दूर राहतात...!!!*
 
*कोणीही कितीही वाईट वागले तरी त्याचे वाईट चिंतू नका. ज्याला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते. परंतु दुसऱ्याचे वाईट चिंतून त्याच्याबद्दल अपशब्द काढला, तर वास्तू तथास्तू म्हणून त्या परिणामांना आधी आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणून कोणाबद्दल कधीही वाईट बोलूच नका...!!!*

*ज्याप्रमाणे चेंडू एखाद्या भिंतीवर जोरात फेकून मारला, तर तो तितक्याच वेगाने आपटून मागे येतो, तीच बाब आपल्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांच्या बाबतीत घडते. म्हणून सतत चांगलेच बोला. कधी काय घडेल, हे आपण सांगू शकत नाही. कधी कोणते शब्द शेवटचे ठरतील सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीभेला चांगले बोलण्याची सवय आणि वळण लावून घ्या...!!!*

*परदेशातील वास्तुशास्रज्ञांनीदेखील वास्तू तथास्तू संकल्पनेला दुजोरा दिला आहे. नकारात्मक बोललात तर नकारात्मक घडेल, सकारात्मक बोला सकारात्मक घडेल. म्हणून घरात वादविवाद टाळा, संवाद साधा, एकमेकांना समजून घ्या, घरात आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा, वास्तूपुरुषाची कृपादृष्टी कायमस्वरूपी राहिल...!!!*



🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...