Tuesday, August 16, 2022

--कळलेच नाही--


*वर्षानुवर्षे निघुन गेली*
*धकाधकीच्या जीवनात*
*वय कधी वाढले*
*कळलेच नाही !!*

*खांद्यावर खेळवलेली मुलं*
*खांद्याला खांदा लावून कधी ऊभी राहीली*
*कळलेच नाही !!*

*भाड्याच्या घरात सुरु केलेला संसार,*
*स्वतःच्या घरात कधी रुळला*
*कळलेच नाही. !!*

*सायकलचे पेडल मारून दमत होतो*
*केव्हा कारमधे फिरायला लागलो*
*कळलेच नाही !!*

*कधी मुलांची जबाबदारी होती,*
*आपली त्यांच्यावर केव्हा गेली*
*कळलेच नाही!!*

*एकेकाळी दिवसापण ढाराढूर झोपायचो*
*रात्रीची झोप केव्हा कमी झाली*
*कळलेच नाही!!*

*ज्याकाळ्या केसांवर भाव मारत होतो*
*ते पांढरे केव्हा झाले*
*कळलेच नाही!!*

*वणवण भटकत होतो एका नोकरीसाठी,*
*रिटायर्ड सुद्धा झालो*
*कळलेच नाही !!*

*मुलांसाठी आयुष्यभर जगत होतो*
*मुलं त्यांच्या आयुष्यात कधी रुळली*
*कळलंच नाही !!*

*आता ठरवलं की स्वतःसाठी जगावं*
*पण शरीराची साथ हळूहळू कमी होत आहे*
*कळलेच नाही!!*

🙏🙏


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...