Tuesday, August 16, 2022

_केले कुणास्तव ते किती,_*

*_हे कधी मोजू नये,_*
*_होणार त्याची विस्मृती,_*
*_त्याला तयारी पाहिजे._*

_डोक्यावरी जे घेऊनी_
_आज येथे नाचती,_
_घेतील ते पायातळी;_
_त्याला तयारी पाहिजे._ 

*_सत्यास साक्षी ठेवुनी_*
*_वागेल तो, बोलेल जो,_*
*_तो बोचतो मित्रांसही!_*
*_त्याला तयारी पाहिजे._* 

_पाण्यामध्ये पडलास ना?_
_पाणी कसेही ते असो-_
_आता टळेना पोहणे;_
_त्याला तयारी पाहिजे._

*_सुखात सर्व सोबती_*
*_दुःखात ना कोणती_*
*_समोर जाण्या एकटा_*
*_त्याला तयारी पाहिजे_*

_तोंडावर गोड जे बोलती_
_पाठीमागे निंदा करीती_
_तोंड देण्या निंदकास_
_त्याला तयारी पाहिजे_

   *_~विंदा करंदीकर_*

_ही कविता पचवली की आयुष्य जमलंच ! 🌹🌷🌹
============================================
*“मैत्री नको तोडूस”*
  (..डॉ. स्वप्नील मानकर )

हा आहे खूप फटकळ !
तो आहे फारच खडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

नातेवाईकांसारखा तो !
आयता नसतो मिळत !!
मित्र कमवावा लागतो !
असंच मन नसते जुळत !!
हृदय वेगळे असले तरी !
स्पंदने सोबत धडकतात !!
दोघांच्या ही मनामध्ये !
समान विचार चालतात !!
सॉरी,थँक्सला थारा नसे!
मानाकरिता नको अडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

तू जातो निराशेत कधी !
भकास वाटते सारे रान !!
रडण्यास मिळता खांदा !
निवळतो मनावरील त्राण !!
जिथे कुणी कामी पडेना !
तिथे मित्र हजर असतो !!
आपल्यावर होणारे वार !
लीलया झेलत दिसतो !!
कठीण संकटांना मुळी !
तू एकटा नको भिडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

वादविवाद जेव्हा होतो !
स्वतःहून सॉरी म्हणावे !!
चूक कुणाचीही असो !
आपणच नमते घ्यावे !!
वाद करून जिंकल्यास !
बक्षीस थोडीच मिळते !!
अबोला जास्त लांबला !
की त्याचे महत्व कळते !!
छोड ना यार जाने दे !
चिंध्या नको फाडुस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

जीवन एकदाच मिळते !
मनसोक्त घ्यावे जगून !!
मैत्रीला मात्र काळजात !
आजन्म ठेवावे जपून !!
जात, पात, धर्म, लिंग !
या पलिकडले हे नाते !!
सर्व नात्याहूनी जगात !
सर्वश्रेष्ठ समजले जाते !!
तोडण्यापूर्वी कर विचार !
नंतर एकटा नको रडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*
👬👭👫🙋🏻‍♂️💕🙋🏻‍♀️👫👭👬

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...