आपल्या मराठीची एक गम्मत आहे. यात वस्तूंना नावं खूप सुंदर दिली आहेत. साधारण पणे मोठ्या वस्तूंना पुल्लिंगी आणि त्याच्याशी संबंधित लहान, नाजूक आणि हालचाल जास्त करणाऱ्या वस्तूंना स्त्रीलींगी नावं दिलेली आहेत. तसेच बहुतेक वेळा या वस्तू एकमेकांना पूरक आहेत.
बघा वाचून मजा येईल.



°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*जराशी गम्मत* 
ती कैरी आंबट ,
तो आंबा गोड 



ती चांदणीलुकलुकणारी ,

तो चंद्र तेजोमय 

ती वेल नाजूक,

तो वृक्ष मोठा 

ती फांदी छोटीशी , 

तो बुंधा जाड

ती झुळूक सुखावणारी,
तो वारा सोसाट्याचा
ती माळ नाजुकशी,
तो हार मोठा.
ती साखळी नाजुकशी ,
तो साखळदंड मोठा
ती बांगडी नाजुकशी,
तो कडा जाड

ती कविता गोड ,

तो धडा रटाळ 

ती घागर , कळशी ,
तो माठ , रांजण, घडा आणि हंडा
ती सुरी ,तो सुरा

ती ओळ ,तो परिच्छेद
ती नदी वाहणारी,
तो सागर अथांग

ती झोपडी , माडी लहान


तो महाल , बंगला महान


ती खिचडी साधीशी,
तो मसाले भात आणि पुलाव 

ती मीटिंग,तो परिसंवाद
ती खिडकी,तो दरवाजा
ती टेकडी छोटीशी , 

तो डोंगर भलामोठा



ती जखम लहान,
तो घाव मोठा
ती दोरी बारीकशी,
तो दोर जाडसर
ती डबी छोटीसी ,
तो डबा मोठा
ती थाळी ,तो थाळा
ती पोळी , भाकरी साधी,
तो मात्र पराठा आणि ब्रेड

ती सायकल , स्कुटी , रिक्षा , बस



तो ट्रक, रणगाडा बडा


ती पाटी छोटी
तो फळा मोठा
ती वाटी ,तो कुंडा
जीवनाचा पण हाच आहे ना फंडा.....




विजया चिंचोळी
=====================
गावाची किंमत लोकांका आता कळाक लागली
कोरोना इलो भारतात तशी
माणसांका जाग येऊक लागली
झोपेतून उठल्यासारखी माणसा
रस्त्यावर सैरावैरा धावत सुटली
भेटात ती गाडी पकडुन लोका
गावात पळाक लागली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
गावाक काय हा, त्यापेक्षा शहरच बरा
असा म्हणणार्या लोकांका
आता मरान समोर दिसाक लागला
जिवाच्या आकांतान तेंचा
काळीज धडधडाक लागला
बायका पोरांका घेऊन माणसा
गावची वाट धरुक लागली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
आज्या पंज्याची, पिढ्यानपिढ्यांची जमिन
एका क्षणात विकुन टाकलास
तेंच्या घामाच्या मेहनतीच्या पैशान
शहरात लय मजा मारलास
जमिनी विकताना तुमका
कशी काय लाज नाही वाटली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
जी माणसा घरा बंद करुन गेली
तीच माणसा पहीली गावी ईली
आम्ही गाव सोडलो सांगणारी
गावी फोन करुक लागली
पुन्हा पाटी फिरान बघणार नाय म्हणनारी
पाय ढुंगनाक लावुन परत इली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
माणुस किती पण मोठो झालो तरी
अंत्यविधी साठी गावीच येवचा लागता
शहरात जरी मोठो झालो असलो तरी
माणसाक गावा शिवाय पर्याय नसता
उरलेला म्हातारपण घालवुक
सगळ्यांकाच येवचा लागता गावी
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
गावची वरसल इली की माणसा
तेवढ्यापुरती दहा बारा दिवस गावी येतत
वरसल झाली की दोन तीन वर्षा
गावाक शापच विसरान जातत
गावच्या माणसांका भेटताना आता
तेंची तेंकाच लाज वाटाक लागली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
आई मरणाच्या दारात येऊन टेपली
तरी तिका बघुक नाय इलास
काम धंदो टाकुन कसे येणार म्हणून
ही ती कारणा देऊक लागलास
आपलो अंत जवळ दिसलो तसो
आईच्या आश्रयाची गरज वाटाक लागली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
गावची शेती विकुन
मुंबईत घर घेतलास
गुरा ढोरा संसार विकुन
शहरात जाऊन बसलास
गावी जाऊन लोकांकडे आता
हात पसरुची वेळ इली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
एका वायरसनेे माणसांंका
माणसाची खरी जिंदगी दाखवल्यान
स्वार्थाच्या दुनियेत जगण्यापेक्षा
गावची माणुसकी शिकवल्यान
शहरातल्या विषारी धुरा पेक्षा
गावची शुद्ध हवाच हा चांगली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
गावाक कधी फोन केलास नाय
कोणाची विचारफुस कोणाची चौकशी केलास नाय
कधी कोणाच्या सुखात नाय
कधी कोणाच्या दुखात नाय
आई वडील आपल्या मुलांका सांभाळतत
तसो गावच शहरी माणसांका घेता छायेखाली
गावाची किंमत लोकांका, आता कळाक लागली...
===========================
मालवणीका
*आडनाव*
वाघांकडे बी-हाडाला, आसत दोन कोले. भांडण झाला तर, मधे पडतत गोडबोले.
घर सगळा भरला तरी, नावाने आसत कोरे.
जंगल सोडून शहरात, रवतत वाघमारे.
रंगपंचमीच्या दिवशी, लाल झाले काळे.
आवळ्यांचा रंग संपला तरी, रंगवित होते कावळे.
गरुडांच्या गाडीवरून, जातत रोज लांडगे.
बँकेत शेजारीच रवतत, पोपटराव चोरगे.
अत्रे आणि धोत्रे पुस्तकातसून येतत भेटीला . नागडेनीही लग्नासाठी, कपडेवाला शोधला.
राजेंचेही नाव यंदा दारिद्ररेषेत आले.
हिरव्या सोबत भागीदारी, करत आहेत जांभळे.
ट्राफिक पोलीस म्हणान नोकरेक आसत वनवे.
नावातील ह्या गमतीजमती, माना शेलापागोटे.
संदीप साळसकर
मु.पो. वालावल
तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
=================================
*सुख माझ्या नजरेतून*
- मंगेश पाडगांवकर
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं,
सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं,

नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

साधीशी कढी
सुद्धा मनाजोगी जमणं,
हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं,
डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं,
वाटेत पडलेलं केळीच साल आपणच उचलणं,
टपरी वरच्या चहाचा
बिनदिक्कत आस्वाद घेणं,
बिनदिक्कत आस्वाद घेणं,सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....

एखाद्या चिमणीला जवळून बघणं,
हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं,
एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....

खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं,

रातराणीचा सुगंध उरात साठवणं,
पलंगावर पाठ टेकली की
क्षणात डोळा लागणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं...




=========================================
कवी कोण माहीत नाही.. कॉपी पेस्ट पण मनाला भावणारी कविता
- : वारी विठठलाची : -
बातमी ऐकुन चकित झाली,
विठ्ठलाकडे धावत रखुमाई आली
अहो ऐकलंत का ?? वारी रद्द झाली
कोरोना ची बघा कुठपर्यंत मजल गेली
दु:खामधे पूर्ण बुडाला आहे वारकरी
ईतक्या वर्षांची परंपरा आता मोडणार आहे खरी
ज्ञाना, तुका, निवृत्ती, नामदेव आणि मुक्ताई
यांना आता कशी भेटेल बरे विठाई ??
ऐकुन सारा प्रकार स्तब्ध झाला विठ्ठल
सारा विचार करून, म्हणाला रखुमाईला
चल ह्या वेळी आपणच करू वारी
ह्या वर्षी देवच जाईल भक्ताच्या घरी
ज्ञानाची आळंदी अन् तुकोबांचे
देहू
अजानवृक्ष आणि इंद्रायणी आपणही पाहू
भेटीची माझ्या त्यांना लागली असेल आस
त्यांच्यासाठी मीही तितकाच व्याकुळ आणि उदास
आषाढी च्या मुहूर्तावर पोहोचू भक्तांच्या घरी
प्रत्येक भक्ताचे घरंच होऊ दे पंढरी !!
|| जय जय राम कृष्ण हरी ||
====================================
तुला शिकविन चांगला धडा!(ती हिंदुस्थानी)*
असं काय लालतोंडया? गधडा! नालायक! हरामखोर!नाक बसक्या!
थांब ......
थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा!
मोटा समजतो सोताला ड्रॅगन!
तुजं गटारात घाल मशीनगन!
तुला भलताच चढलाय माज!
तुला युद्धाची सुलटलिया खाज!
तुजा हॉंगकॉंग , तुजा तैवान
तुला हवाय आता लडाख!
त्यातच होशील बेचिराख!
तू पेटवलस गलवान खोर!
आता येऊंतर बघ पाउलभर म्होर!
का उगा करशील कुरापती!
नाय लागनार कायपन हाती!
तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुझी चांगलीच जिरविन रग!
माझ्या पाठीशी सगळं जग!
साऱ्या जगात एकटा पाडीन!
तुला तुझ्याच भूमीत गाडीन!
नको बासष्ट च्या मिजाशीत जाऊ!
तुला आताची ताकत दाऊ!
तुला शिकविन चांगला धडा!
तुजी,उतरीन सगळी मस्ती!
नको चायनीज आमाला सस्ती!
मग घासत येशील टाचा,
मी म्हनन,
तुझ्या कर्माला फोडीन वाचा!
हात पसरून मागशील भीक,
मी म्हनन
तुझं तुझ्याच देशात इक!
मग सांगीन उडवून हात!
धर मुकाट शांततेची वाट!
तुझा भूमीवर माझ्या डोळा!
न समजण्या एवढा का मी भोळा!
जर घेशील इथली माती!
मग समज खाल्लीस माती!
तुझ्या इशाऱ्यावर नेपाळचा बोले पोपट!
साला विसरला उपकार सारे पटपट!
तुझ्या संगतिन संबंध पाकड्या ताणी!
त्याच्या तोंडचं पळवीन पाणी!
उगं वळवळ करतोय किडा!
तुझ्या पापाचा भरलाय घडा!
तुला शिकवीन चांगलाच धडा!
*_अवि बोडस_*
No comments:
Post a Comment