"बहीण..... "
" बहीण लहान असो वा थोर ,
बहीण ही बहीणच असते "
बहीण म्हणजे .....
मायेचं साजुक तुप ,
आईचं दुसरं रुप ,
काळजी रुपी धाक ,
प्रेमळ तिची हाक !
कधी बचावाची ढाल ,
तर कधी मायेची उबदार शाल ,
ममतेचं रान ओलंचिंब ,
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब !
दु:खाच्या डोहावरील ,
भक्कम आधाराचा सेतू ,
निरपेक्ष प्रेमामागे ,
ना कुठलाच हेतू !
कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी ,
कधी हक्काने रागावणारी ,
तर कधी लाडाने जवळ घेणारी !
बहीणीचा रुसवा जणु ,
खेळ उन - सावलीचा ,
भरलेले डोळे पुसाया ,
आधार माय - माऊलीचा !
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ,
या नात्यात ओढ आहे ,
म्हणूनच बहीणीचं हे नातं ,
चिरंतन गोड आहे !
भरलेलं आभाळ रितं कराया ,
तिचीच ओंजळ पुढे येई ,
जागा जननीची भरुन काढाया ,
निर्मिली देवाने *" आई "* नंतर *" ताई "*.
======================================
वाचनात आलेली एक छान पोस्ट
*
*मी अजूनही शिकतोय - मुक्तछंद*
आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून पैसा उडवायला शिकतोय.
आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून डिजीटली नवीन नाती जोडायला शिकतोय.
आधीच्या पिढीकडून मन मारुन जगायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून मन भरुन जगायला शिकतोय.
आधीच्या पिढीने,'युज अँड युज अँड मोअर युज' मधली उपयुक्तता शिकवली;
नंतरच्या पिढीकडून ' युज अँड थ्रो' मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.
आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो;
मुलींकडून घरात असतानाही पिकनीक एंजॉय करायला शिकलोय.
आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिशा उजळून वाढदिवस साजरा केला;
नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करुन वाढदिवस साजरा करायला लागलो.
आधीच्या पीढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम;
नंतरची पिढी पटवून देत आहे ,अमूल बटरला पर्याय नाही.
थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते;
तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते.
*लेखक अज्ञात*
=====================================
पाहीन श्रीरामाचे नवे घर !
भाग्यवान मी किती खरोखर
पाहीन श्रीरामाचे नवे घर!
ज्या भूमीवर राम राहिला
जनतेसाठी जीव वाहिला
तिथेच आता होईल सुंदर
रघुनाथाचे भव्य नवे घर !
जिथे जानकी राम सहचरी
शिरली भूमातेच्या उदरी
राणीपदावर बसण्यासाठी
येईल का ती आज पुन्हा वर ?
पुन्हा एकदा देईल दर्शन
श्रीरामाचे शुभ पंचायतन
प्राणसखे हे बंधू दोघे
हनुमानही सेवातत्पर !
मुहूर्त लाभला शुभफलदायक
करील पूजा देशाचा नायक
भारतभूचा भाग्यविधाता
प्रसन्न ज्याला राम धनुर्धर !
वास्तुविशारद कुशल सर्व हे
उभारतील नवशिल्पस्वप्न हे
भक्तसागरा येईल भरती
कौतुक होईल साऱ्या जगभर !
भरेल आता तो दरबार
देतील दर्शन श्रीरघुवीर
कोटी जनांच्या मनात घुमतील
रामजपाचे संजीवक स्वर !











*************************************************
संदिप खरेंची संयम शिकविणारी कविता...
"मी सुद्धा चुकलो असेन",
एवढं मनात आणा!
धनुष्य मग हातातलं,
जरा संयमानंच ताणा!
बाणच हळू कानात सांगेल,
'ठेव मला भात्यात!
एवढं ऊन, एवढा पाऊस,
असणारच की नात्यात!'
वादा जवळ गप्प बसून,
संवाद करू, मारू गप्पा!
तुटण्या किंवा उसवण्याचा,
येणारच नाही टप्पा!
'अन्याय झाला' वाटेल तेव्हा,
पहिलं प्रेम आठवा!
आठवणीतलं ऐश्वर्य मग,
आतल्या खणात साठवा!
तेवढाच क्षण टळल्यावर
आकाश होतं साफ!
दंव होऊन गारवा देते,
तीच गरम गरम वाफ!
एक क्षण आवेगाचा,
फुटण्यापुर्वी अडवा!
डोळे सुद्धा राग बोलतात,
पापण्यांमागे दडवा!
थोडी गुदमर, थोडी घुसमट,
उंबरठ्यावर दाटेल!
राख झाली तरी चालेल,
असं वाटेल, ...पटेल!
दिवस रात्र असणारच,
तेव्हा आपण पूर्व बघू!
प्रकाशाचे वारकरीच की!
आपण उगवतीला निघू!
पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी!
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी!
कधीकधी आठवण्याहून,
विसरण्यातच मजा!
बेरजेपेक्षा कधीकधी ,
जोडून देते वजा!
बाकी उरणं महत्वाचं,
तेवढीच श्री शिल्लक!
कविता असेल साधी,
पण् विचार मात्र तल्लख!
संदीप खरे
********************************************************************
*गणपतीचे दिवस* ईले
गावाक जावचा तरी कसा
वरच्या मनान म्हणतत गाववाले..
येवा कोकण आपलोच आसा !!
*ईमानदारीचो पास* रिजेक्ट होता दलालांचो होता पटकन पास
राजकारण्यांची घरा भरली मात्र गरीबांचो गेलो घास !!
*सायबीनीची नोटीस* आसा
चौदा दिवसांचो मांगरवास
सरपंचाचो येगळोच आदेश
अजून चौदा दिवस घरात बास !!
*गणपती यंदा* लहान आसा
दोन माणसा पुरतो श्रीमंताचा चलान जाता गरीबांच्या मानेर कोयतो !!
*भजनाक यंदा* कोण नाय
घरच्या घरी आरती खासदारान म्हणे लग्न केल्यान हजार होते वराती !!
*कडू काढो* गरम वाफ
सगळा करून झाला
हाॅस्पिटलच्या पंगलगावरचा
पाच लाख बिल ईला !!
*बाळगो म्हणता* सर्दी झाली
डाॅक्टर म्हणता हाॅस्पिटल गाठ
सगळा ईकून बाळग्याची
मात्र रस्त्यार ईली खाट !!
*श्रीमंत खाता* ठेवणीतला
गरीबांचो वाली सरकार
मध्यम मेलो मधल्यामधी
कोणच घेईना कैवार !!
*कोरोनापैक्षा भंयकर भ्रष्टाचाराचो* राक्षस निर्माण झालो देव मानलो जेंका तेचो
खाटीक होऊन गेलो !!
*_येकच सांगतय बाप्पा तुका कोरोनाचो नायनाट कर... जग चलला रसातळाक तुझ्या सोंडेवरती धर_*....



======================================
*मंदीराचे कळस गगनाला भिडले*
*शाळेचे बांधकाम देणगीवाचुन अडले*
*दुधाचा अभिषेक दगडाच्या देवाला*
*शालेय पोषण आहार नुसताच नावाला*
*देवाचा दरवाजा चांदीने मढला*
*शाळेचा दरवाजा पाण्याने सडला*
*मंदीरातील झुबंराला हि-या मोत्यांचे खडे*
*शाळेच्या भिंतीना पडु लागलेत तडे*
*मंदीरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात*
*शाळेच्या ग्रथांलयात ऊंदीर मामा नाचतात*
*मंदीराच्या दानपेटीत गुप्तदान करतात*
*शाळेच्या देणगीची मात्र पावती मागतात*
*दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा*
*पालक मेळाव्यात पालक फक्त सतरा*
*पुजा-यांच्या गळ्यात सोन्या चांदीचे हार*
*कंत्राटी शिक्षकांची होऊ लागली उपासमार*
*न खाणाऱ्या देवाला पंचपक्वनांचा घास*
*शाळेत खीचडी भाताचा अहो येईना वास*
*आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास*
*नवीन पिढीला समर्पित* 
========================================
मी शिक्षक आहे.....
मला धडा समजूनपण घ्यायचायं ,
मला तो समजावूनपण द्यायचायं.
मला पेपर काढायचायं ,
मला पेपर तपासायचायं.
बाजूला कितीही नकारात्मक परिस्थिती येवो ,
मला कितीही अडचणी येवोत ,
मला लढायचंय. मला सकारात्मक राहायचंय ,
कारण मला हसायचंय मला हसवायचंय .
भावी पिढीची जबाबदारी माझ्यावर आहे, याची मला जाणीव आहे .
हो ......... मला त्यांना घडवायचंय
आणि....... मला देश घडवायचाय.
या लाॅकडाऊनच्या काळात मी वापरतोय माझा डेटा ,
कारण प्रिय पालकांनो
तुम्ही
आत्मविश्वासाने सोपविला आहे तुमचा बेटा.
मी HARDWARE वापरतोय ,
मी SOFTWARE शिकतोय ,
मी ZOOM , MEET वापरतोय ,
मी PPT तयार करतोय
आणि मी CAMERA ADJUST करतोय .
मी मानलंच आहे , आव्हानांना संधी
आणि म्हणूनच मी आहे तुफान में आंधी.
मी SOUND SET करतो , LIGHT ADJUST करतो .
माझ्या घराचा कोपरा झाला आहे STUDIO ,
मीच SPOT BOY , माझाच चेहरा आणि माझाच AUDIO
माझ्याही पेक्षा अधिक ध्येयनिष्ठने जगतोयं .
जगाचा अन्न निर्माता आणि पेरतोय सृष्टीत विश्वासार्हता .
त्याची पेरणी मातीतली आणि माझी .......हो मुलांच्या मनातली .
त्याचे कष्ट देतात फळ आणि माझे जगण्यासाठी बळ.
असे सर्व घडत असताना तुम्हीही राहा सकारात्मक .
धडा ..... नक्की शिकवला जाईल ,
गणित....... नक्की समजेल ,
विज्ञान........नक्की भविष्य घडवेल ,
भूगोल...... नक्की करेल सृष्टी सुंदर ,
भाषा..... नक्की करतील आपल्यातील कमी अंतर
कारण
माझा तुमच्यावर विश्वास आहे .
माझा निसर्गावर विश्वास आहे ,
माझा फुलांवर विश्वास आहे ,
माझा मुलांवर विश्वास आहे
आणि म्हणूनच माझा प्रत्येक संकटातील संधीवर पण विश्वास आहे .
कारण......
कारण मी शिक्षक आहे .आणि म्हणूनच मी जीवनभराचा विद्यार्थी आहे ,
जीवनभराचा विद्यार्थी आहे.
अभ्यासक्रम बदलतो आणि मीही बदलतो .धडा बदलतो मग मीही बदलतो वर्ग बदलतो तेंव्हाही मी बदलतो .
वर्ष बदलते आणि नव्याने मीही बदलतो .नव्या विचारांनी सळसळून वर येतो,
खंबीरपणे बदलांना सामोरे जातो.
कारण....
कारण मी शिक्षक आहे .
आणि म्हणूनच मी जीवनभराचा विद्यार्थी आहे
जीवनभराचा विद्यार्थी आहे.
सगळं काही झालंय SET.
Now two minutes wait ,
आत्ताच आणून ठेवतो पाण्याची बाटली कारण तात्पुरता नट झालोय .तरी
स्वावलंबी व्हा , आत्मनिर्भर बनो
हिच शिकवण गेली अनेक वर्ष वाटली.
मी शिकणार आहे, मी शिकवणारआहे.
Empowering Education and Creating Happiness या PURPOSE प्रमाणे जगणार आहे .
कारण .......
कारण मी शिक्षक आहे .
आणि म्हणूनच मी जीवनभराचा विद्यार्थी आहे
जीवनभराचा विद्यार्थी आहे.









=======================================
कृष्ण भेटायलाच पाहिजे
कृष्ण भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे.
मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला,
अन् कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे
मुळात नात्यांच्या पलिकडचे भावबंध जोडणारा.....
एक हक्काचा सवंगडी पाहिजे.....
लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वयं वाढत असतात
त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलंत असतात
तस्संच....ते...पूर्वीचं...निर् व्याज, अबोध नातं पुन्हा जमायला पाहिजे
आणि याकरताच आयुष्यात कृष्ण भेटायला पाहिजे......
"तो" कृष्ण "ती" ही असु शकते. आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते
कधीही आपलं खोलवर मन रीतं करता आलं पाहिजे
असा हक्का , विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे........
आपल्या आजुबाजुला तो सापडेलंच असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच असंही नाही
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे....
सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा पाहिजे
आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटला पाहिजे......
खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का?
की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती अश्वस्त मैत्री होती का?
त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी
अाणि त्यांचीच ऐकु येत असावी रुंजणारी मुरली
अनेकांच्या मनामधे मुरणारा तो मुरलीमनोहर प्रत्येकाला भेटायला पाहिजे
आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायला पाहिजे......
============================================
जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:

*कृष्णा*,
तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!
तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा 'सखा' झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. 'बाईचा मित्र' ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, 'तो' स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.
पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला 'नटनागर गिरिधारी' म्हणत साद घातली.
एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.
गीतेत 'यदा यदा हि धर्मस्य' म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!
आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.
कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!
*दुर्गा भागवत*.
==========================================
" विडंबन "
" वृद्धावस्था "
दिवस आता हे मोजायचे
संवादावाचुन जगायचे
मनात कुढत रहाणे
मधेच भेटते दुखणे
दुखण्यात शरीर दुखायचे
मोजावी छताची खोली
साधावी शांतीची बोली
श्वासात समाधान भरायचे
थरथरे हडकुळा हात
सोसेना कपाचा भार
पडुन जखमी बनायचे
माझ्या या बिछान्यापाशी
थांब गडे तू जराशी
डोळ्यांत औषध घालायचे
पापण्या मिटुन झोपायचे









No comments:
Post a Comment