एक होती ठमाबाई
तिला सोशल वर्कची घाई
रात्रंदिवस हिंडत राही
पण वर्कच कुठे उरले नाही
वर्क थोडे बाया फार
प्रत्येकीच्या घरची कार
नोकर शोफर बेरा कुक
घरात आंबून चालले सुख
घराबाहेर दुःख फार
करीन म्हणते हलका भार
कार घेऊन निघते रोज
हरेक दुःखावरती डोज
पाजीन म्हणतेः पिणार कोण?
सगळ्या जणींना करते फोन
"मला कराल का हो मेंबर?"
"अय्या! सॉरी, राँग नंबर"
"सगळ्या मेल्या मारतात बंडल"
म्हणून स्वतःच काढते मंडळ!
आया होऊन येतात इथे
त्यांच्या मागून मागून फिरतात त्यांच्या तारुण्याची भुते
No comments:
Post a Comment