Friday, July 1, 2022

*पादुका दर्शन, हा दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव.*


*दत्त संप्रदायात गुरुचरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त संप्रदायात चरणपादुकांचे पुजन केले जाते. श्रीगुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजनाचा प्रकार फार पूर्वीपासून आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.*

*अतिशय प्रिय, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवीशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते.*

*संसारसागरातून तरुन नेणारे किंवा संसारभयाचे हरण करणारे तसेच ज्यामध्ये सर्व तीर्थ सामावलेले आहेत. तसेच तन आणि मन निर्विकार करण्याचे ज्यामध्ये सामर्थ्य आहे असे हे स्थान अर्थात चरण..!*

*गिरनार येथे दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंहसरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते.*

*विष्णुचा जसा शाळीग्राम; तसे दत्तोपासनेत दत्त महाराजांच्या पादुका..! दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच  मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥' असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते.*

*पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असते. डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...