Friday, July 1, 2022

श्रीपंचमी


मार्गशीर्ष शुद्ध पंचमी

मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील  पाचवी तिथी आहे.

या दिवसापासून श्रीपंचमी व्रताचा आरंभ होतो

या व्रतात आरंभ मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला होतो. त्यासाठी हाती कमलपुष्प घेतलेल्या, कमलासनावर बसलेल्या आणि दोन गजेंद्रांनी आपल्या सोंडांमधून सोडलेले दूध अगर जल याने स्नान करणार्‍या लक्ष्मीचे चित्तामध्ये ध्यान करावे आणि सुवर्णादिनिर्मित्त मूर्तीसमोर व्रतसंकल्प करावा. 
तीन प्रहर दिवस लोटल्यावर गंगेच्या अगर विहीरीच्या पाण्याने स्नान करावे. नंतर उपर्युक्त मूर्तीची सुवर्णादीच्या कलशावर स्थापना करुन सर्वप्रथम देवगण व पितृगण तृप्त करावे (अर्थात गणपतिपूजन, मातृकापूजन आणि नांदी श्राद्ध करावे). नंतर ऋतुकालोभ्दव फलपुष्पादी घेउन उपलब्ध उपचारद्रव्यांनी लक्ष्मीचे पूजन करावे. गंधविलेपनापूर्वी

१) चंचला,
२) चपला,
३) ख्याती,
४) मन्मथा,
५) ललिता,
६) उत्कंठिता,
७) माधवीं,
८) श्री

अशा अष्टनामोच्चारांनी
१) पाद,
२) जंघा,
३) नाभी,
४) स्तन,
५) भुजा,
६) कण्ठ,
७) मुख,
८) मस्तक
अशा अष्टांगांची पूजा करावी, नैवेद्य अर्पण करावा आणि सवाष्ण स्त्रिला कुंकू लावून तिला जेवू घालावे.
तिच्या पतीला
*'श्रीर्मे प्रीयताम् '*
म्हणून एक शेर तांदूळ व तूप देऊन भोजन करावे. अशा तर्‍हेने
मार्गशीर्ष
 श्री,
पौष
 लक्ष्मी,
माघ
 कमला,
फाल्गुन
 सम्पद,
चैत्र
 पद्मा,
वैशाख
 नारायणी,
ज्येष्ठ
 धृती,
आषाढ
 स्मृती,
श्रावण
 पुष्टी,
१०
भाद्रपद
 तुष्टी,
११
आश्‍विन
 सिद्धी,
१२
कार्तिक
 क्षमा
याप्रमाणे बारा महिन्यांत बारा देवींची यथासांग व यथाक्रम पूजन करावे, मंडप उभारावा. त्यात वस्त्रे, भूषणे व पात्रे यांनी युक्त शय्येवर लक्ष्मीचे पुन्हा पूजन करून ती सवत्स धेनूसह ब्राह्मणास द्यावी. नंतर भोजन करावे. असे व्रत केले असता पुत्र-सुख, सौभाग्य आणि अचल लक्ष्मी प्राप्त होते.
याच दिवशी कार्तिकेयाचा देवसेनेशी विवाह झाला. याच दिवशी शरीरिणी श्री त्याच्या आश्रयाला आली. ज्या दिवशी हे श्री-कार्तिकेय यांचे मीलन झाले, तो महातिथी लोकांत 'श्री-पंचमी' म्हंणून प्रसिद्ध पावली
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...